शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025: तब्बल ५ तासांनी Mumbai Indians ने विकत घेतला पहिला खेळाडू, १२.५० कोटींना कोण आलं संघात?
2
'ज्यांनी मला त्रास दिला ते सगळे साफ झाले', अशोक चव्हाणांची थोरात-देशमुखांवर बोचरी टीका
3
IPL Auction 2025: मुंबई इंडियन्सने सोडलेला जोफ्रा आर्चर अखेर राजस्थान रॉयल्समध्ये गेला, किती मिळाली किंमत?
4
शिवसेना मुख्यमंत्री पदावर अडीच वर्षासाठी दावा करणार? केसरकर स्पष्टच बोलले...!
5
'तरुण नेतृत्व उभारणार, घरी बसणार नाही', पराभवानंतर शरद पवार नव्या जोमाने कामाला लागले
6
IPL Auction 2025 : MI नं दिला नाही भाव; Ishan Kishan साठी काव्या मारन यांनी लावली एवढ्या कोटींची बोली
7
IPL Auction 2025 : बिग सरप्राइज! SRK च्या KKR नं रिलीज केलेल्या खेळाडूसाठी मोजली मोठी किंमत, अनेकांच्या भुवया उंचावणारी बोली
8
IPL Auction 2025: 'अनुभवी' अश्विनसाठी दोन जुने संघ भिडले, अखेर CSK ने RR ला दिली मात, कितीला विकत घेतलं?
9
IPL Auction 2025: Gujarat Titans ची शांतीत क्रांती! ३ मॅचविनर खेळाडूंना 'गपचूप' घेतलं ताफ्यात, पाहा कोण?
10
"योगी आदित्यनाथांच्या 'त्या' घोषणेमुळे...";'बटेंगे तो कटेंगे'वर शरद पवारांचे महत्त्वाचे विधान
11
"...त्यामुळे महिलांनी आमच्या विरोधात मतदान केलं"; निकालानंतर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया
12
IPL 2025 Auction : १८ कोटींच पॅकेज नाकरणाऱ्या KL Rahul साठी DC नं किती कोटी मोजले ?
13
"EVM बाबत माहिती नाही, पण लोक सांगतात की..."; पराभवानंतर शरद पवारांचे मोठं विधान
14
महायुतीच्या विजयात CM योगींची किती मोठी भूमिका? चंद्रशेखर बावनकुळे म्हणतात...
15
IPL Auction 2025: युजवेंद्र चहलला १७७ % 'अप्रेझल'! बनला सर्वात महागडा स्पिनर, पंजाब किंग्जने घेतलं संघात
16
"काय झालं हेच आम्हाला कळेना...;" निवडणूक निकालाच्या दुसऱ्या दिवशी काँग्रेसनं सांगितला पुढचा प्लॅन
17
TATA IPL Auction 2025 Live: इशान किशन हैदराबादच्या ताफ्यात; SRH ने लावली 11.25 कोटींची बोली...
18
IPL Auction 2025: व्वा पंत... मानलं ! अवघ्या १५ मिनिटात इतिहास बदलला, रिषभ सर्वात महागडा खेळाडू ठरला!!
19
विधानसभा संपल्या, आता विधान परिषदेवर लक्ष; महायुतीच्या कोणत्या 6 नेत्यांना लागणार लॉटरी?
20
बनावट ASP बनून फिरली, पोलिसांनी केलं सॅल्यूट; एक छोटीशी चूक होताच झाली पोलखोल

औषधफवारणीवरून महासभेत गदारोळ, नागरिकांचा संताप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 06, 2018 5:53 AM

बदलापूर पालिका : नगरसेवकांनी व्यक्त केला संताप, शहरात साथीचे आजार

बदलापूर : शहरात एकीकडे डेंग्यूसदृश रुग्णांची संख्या वाढत असतानाच पालिकेकडून केल्या जाणाऱ्या औषधफवारणीची सत्यस्थिती शुक्रवारी सभागृहात समोर आली. नगराध्यक्ष, उपनगराध्यक्षांसह आरोग्य सभापती आणि सर्वपक्षीय सदस्यांनी पालिकेकडून होणाºया औषधफवारणीच्या कामावर आक्षेप घेतला. अनेक ठिकाणी फवारणीच केली जात नसून काही प्रभागांत फवारणीचे वाहन जातच नसल्याचीही बाब यावेळी समोर आली. फवारणीच्या विषयावर पालिकेतील वातावरण चांगलेच तापले होते.

बदलापूर नगरपालिका क्षेत्रात काही दिवसांपासून डेंग्यूसदृश आजाराचे रुग्ण वाढत असल्याची बाब समोर आल्यानंतर त्याचे पडसाद शुक्र वारी झालेल्या सर्वसाधारण सभेत पाहायला मिळाले. सभा सुरू होताच प्रश्नोत्तराच्या तासात आरोग्य सभापती श्रीधर पाटील यांनी औषध आणि धूरफवारणीची कामे बंद करा. त्यांच्याकडून योग्य प्रकारे काम होत नसल्याचा आरोप केला.फवारणीचा कोणताही उपयोग होत नसून इतर पद्धतींचा वापर करून फवारणी करण्याचा सल्ला दिला. तर, औषधफवारणी दिखाव्यासाठी फक्त नगरसेवकांच्या घराशेजारी होते, असे सांगत भाजपा गटनेते राजेंद्र घोरपडे यांनीही फवारणीच्या प्रक्रि येवर आक्षेप घेतला.तर, नगराध्यक्षा विजया राऊत यांनीही आपल्याही प्रभागात फवारणीचे वाहन येत नसल्याची तक्र ार केल्यावर फवारणीबाबत नगरसेवकांची नाराजी समोर आली. त्याचवेळी उपनगराध्यक्ष सुनील भगत यांनीही फवारणीचा काहीही उपयोग होत नसल्याचे स्पष्ट केले.शीतल राऊत आणि जयप्रकाश टांकसाळकर यांनी यावेळी प्रभागानुसार व्यक्तीची फवारणीसाठी नेमणूक करण्याची मागणीकेली.तसेच आरोग्य विभागात मदतनीस असलेल्यांची मदत घेऊन डबके तिथे फवारणी अशा पद्धतीने काम करण्याची गरज यावेळी आरोग्य सभापतींनी केली. त्यामुळे पालिकेकडून होत असलेली औषध आणि धूरफवारणी योग्यरीत्या होत नसल्याची बाब समोर आली.प्रशासनाच्या कारभारावर प्रश्नचिन्हयावर बोलताना मुख्याधिकारी प्रकाश बोरसे यांनी लवकरच एक बैठक घेऊन यावर कशा पद्धतीने काम करता येईल, ते ठरवले जाईल, असे स्पष्ट केले. मात्र नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष आणि सत्ताधारी नगरसेवकांच्याच प्रभागात फवारणी होत नसल्याने पालिका प्रशासनाच्या कारभारावरही प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. 

टॅग्स :badlapurबदलापूरthaneठाणे