शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025: 'अनुभवी' अश्विनसाठी दोन जुने संघ भिडले, अखेर CSK ने RR ला दिली मात, कितीला विकत घेतलं?
2
'ज्यांनी मला त्रास दिला ते सगळे साफ झाले', अशोक चव्हाणांची थोरात-देशमुखांवर बोचरी टीका
3
IPL Auction 2025: मुंबई इंडियन्सने सोडलेला जोफ्रा आर्चर अखेर राजस्थान रॉयल्समध्ये गेला, किती मिळाली किंमत?
4
शिवसेना मुख्यमंत्री पदावर अडीच वर्षासाठी दावा करणार? केसरकर स्पष्टच बोलले...!
5
IPL Auction 2025 : MI नं दिला नाही भाव; Ishan Kishan साठी काव्या मारन यांनी लावली एवढ्या कोटींची बोली
6
IPL Auction 2025 : बिग सरप्राइज! SRK च्या KKR नं रिलीज केलेल्या खेळाडूसाठी मोजली मोठी किंमत, अनेकांच्या भुवया उंचावणारी बोली
7
'तरुण नेतृत्व उभारणार, घरी बसणार नाही', पराभवानंतर शरद पवार नव्या जोमाने कामाला लागले
8
IPL Auction 2025: Gujarat Titans ची शांतीत क्रांती! ३ मॅचविनर खेळाडूंना 'गपचूप' घेतलं ताफ्यात, पाहा कोण?
9
"योगी आदित्यनाथांच्या 'त्या' घोषणेमुळे...";'बटेंगे तो कटेंगे'वर शरद पवारांचे महत्त्वाचे विधान
10
"...त्यामुळे महिलांनी आमच्या विरोधात मतदान केलं"; निकालानंतर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया
11
IPL 2025 Auction : १८ कोटींच पॅकेज नाकरणाऱ्या KL Rahul साठी DC नं किती कोटी मोजले ?
12
"EVM बाबत माहिती नाही, पण लोक सांगतात की..."; पराभवानंतर शरद पवारांचे मोठं विधान
13
महायुतीच्या विजयात CM योगींची किती मोठी भूमिका? चंद्रशेखर बावनकुळे म्हणतात...
14
IPL Auction 2025: युजवेंद्र चहलला १७७ % 'अप्रेझल'! बनला सर्वात महागडा स्पिनर, पंजाब किंग्जने घेतलं संघात
15
"काय झालं हेच आम्हाला कळेना...;" निवडणूक निकालाच्या दुसऱ्या दिवशी काँग्रेसनं सांगितला पुढचा प्लॅन
16
TATA IPL Auction 2025 Live: इशान किशन हैदराबादच्या ताफ्यात; SRH ने लावली 11.25 कोटींची बोली...
17
IPL Auction 2025: व्वा पंत... मानलं ! अवघ्या १५ मिनिटात इतिहास बदलला, रिषभ सर्वात महागडा खेळाडू ठरला!!
18
विधानसभा संपल्या, आता विधान परिषदेवर लक्ष; महायुतीच्या कोणत्या 6 नेत्यांना लागणार लॉटरी?
19
बनावट ASP बनून फिरली, पोलिसांनी केलं सॅल्यूट; एक छोटीशी चूक होताच झाली पोलखोल
20
"नियोजनाप्रमाणे प्रचार केला नाही"; काँग्रेस नेत्याने शरद पवार-ठाकरेंवर फोडलं पराभवाचे खापर

३७ हजार विद्यार्थ्यांना विमा सुरक्षा , माध्यान्ह आहार योजनेसाठी मध्यवर्ती स्वयंपाक केंद्रही उभारणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 01, 2017 1:01 AM

ठाणे महापालिका शाळांमधील तब्बल ३७ हजार ४१ विद्यार्थ्यांना आता विमा सुरक्षा कवच मिळाले आहे. नॅशनल इन्शुरन्स कंपनीच्या सहकार्यातून पालिकेने विद्यार्थ्यांचा हा अपघात विमा काढला आहे.

ठाणे : ठाणे महापालिका शाळांमधील तब्बल ३७ हजार ४१ विद्यार्थ्यांना आता विमा सुरक्षा कवच मिळाले आहे. नॅशनल इन्शुरन्स कंपनीच्या सहकार्यातून पालिकेने विद्यार्थ्यांचा हा अपघात विमा काढला आहे. त्यामुळे अपघाती मृत्यू झाल्यास संबंधितांना दीड लाखांपर्यंत भरपाई दिली जाणार आहे. तर पाच हजार विद्यार्थ्यांच्या मध्यान्ह आहार योजनेसाठी मध्यवर्ती स्वयंपाक केंद्रही पवारनगर भागात सुरु करण्यात आले आहे.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते बुधवारी प्रतिनिधिक स्वरुपात अपघाती विम्याची कागदपत्रे पालिका प्रशासनाकडे सुपूर्द करण्यात आली. देशातच नव्हे तर जगभरात प्रथमच महापालिका शाळांमधील पहिली ते दहावीतील विद्यार्थ्यांचा अपघात विमा काढण्यात येणार आहे. शहरातील आर्थिकदृष्टया दुर्बल, डोंगराळ तसेच खाडीकिनारी वास्तव्यास असलेल्या पालिका शाळांमधील विद्यार्थ्यांना २४ तास हे सुरक्षा कवच देण्याच्या दृष्टीने ही अपघातविमा योजना राबविणार असल्याची माहिती पालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी दिली. याअंतर्गत ५५ बालवाड्या, १२५ मराठी, हिंदी, इंग्रजी आणि उर्दू माध्यंमाच्या प्राथमिक शाळा, १६ माध्यमिक शाळांमधील विद्यार्थ्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे.या योजनेतंर्गत विद्यार्थ्यांचा अपघाती मृत्यू ओढवल्यास तसेच कायमचे अपंगत्व आल्यास दीड लाख रुपये तर अपघातामुळे एखादा अवयव निकामी झाल्यास ७५ हजार, अपघातामुळे उद्भवलेल्या वैद्यकीय खर्चासाठी ३५ हजार इतके अर्थसहाय्य पालकांना दिले जाणार आहे. या विमा कवचामुळे विद्यार्थी आणि पालकांना त्यांचा चांगला फायदा होणार आहे.महापालिका आणि रोटरी क्लब आॅफ ठाणे लेकसिटी यांच्या संयुक्त विद्यमाने अक्षयपात्र फाउंडेशन आणि ठाणे महापालिका यांच्या संयुक्त विद्यमाने पवारनगर येथे महापालिकेच्या २६ शाळांमधील पाच हजार विद्यार्थ्यांसाठी मध्यान्ह भोजन आहार योजनेतून मध्यवर्ती स्वयंपाक केद्र सुरु केले आहे. त्याचेही उद्घाटन मुख्यमंत्र्यांनी बुधवारी केले.

टॅग्स :Thane Municipal Corporationठाणे महानगरपालिका