डोंबिवली- बदलापूरवासीय रेल्वे प्रवाश्याना नको बम्बार्डियर लोकल..ही लोकल दिल्यापासून संध्याकाळच्या वेळेला नाहक त्रास प्रवाश्याना सहन करावा लागत आहे.बदलापूरला गुरुवारी संध्याकाळी एरव्ही ७.२२ ला येणारी लोकल ७.४५ ला पोहचली. शुक्रवारी तर कहरच केला छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस इथून ५.५९ ला सुटणारी लोकल २५ मिनिटे उशिराने सुटली.पाठीमागून सुटणाऱ्या सर्व लोकल सुटल्या.एखाद्या दिवशी प्रवासी समजू शकतात.हे रोजच असे चालले आहे.लोकल फलाटावर लावताना इंडिकेटर सुध्दा वेळेवर व्यवस्थित लावले जात नाहीत, शेवटची एक मिनीट असताना इंडिकेटर लावले जातात,कधी फलाट क्र.५ चा इंडिकेटर लावला जातो आणि लगेच फलाट क्र.७ चा अशामुळे अपंग,महिला वर्ग,वृध्द यांना नाहक त्रास सहन करावा लागत असल्याची खोचक टीका बदलापूरचे प्रवासी संजय मेस्त्री यांनी सोशल मीडियावर व्यक्त केली. ती लोकल डोंबिवली ला ४० मिनीटे उशीराने संध्याकाळी 7.25 ला आली असून आता डोंबिवली आणि ठाकुर्लीच्या मध्ये उभी असल्याचे ते म्हणाले.
मध्य रेल्वेचा खेळखंडोबा, बदलापूरचे प्रवाशी म्हणतात आम्हाला बम्बार्डिअर लोकल नको
By ऑनलाइन लोकमत | Published: December 22, 2017 7:39 PM