शहरं
Join us  
Trending Stories
1
मतदान-मतमोजणीच्या आकड्यात तफावतीचा आरोप; निवडणूक आयोगानं बाजू मांडली, म्हणाले...
2
आग्रा-लखनौ एक्स्प्रेस-वेवर भीषण अपघात, सैफई मेडिकल युनिव्हर्सिटीमधील ५ डॉक्टरांचा मृत्यू   
3
Fengal Cyclone: फेंगल चक्रीवादळाचा बसणार तडाखा! कोणत्या राज्यांना रेड अलर्ट?
4
SIP की FD,पैशांची गुंतवणूक कुठे करायची? फायदा-तोट्याचे गणित समजून घ्या
5
आता १६ वर्षांखालील मुलांना फेसबूक, इन्स्टावर अकाऊंट उघडता येणार नाही, या देशाने घातली बंदी
6
माझा पराभव विरोधकांकडून नव्हे तर...; निकालानंतर राजेंद्र राऊतांनी बोलून दाखवली मनातील सल  
7
"ICU वॉर्डमध्ये क्षमतेपेक्षा जास्त मुलं होती..."; रुग्णालयातील आगीच्या रिपोर्टमध्ये मोठा खुलासा
8
NTPC Green IPO Listing Today: एनटीपीसी ग्रीनचं निराशाजनक लिस्टिंग; मात्र नंतर स्टॉक सुस्साट, पहिल्याच दिवशी अपर सर्किट
9
मुख्यमंत्रि‍पदाच्या स्पर्धेतून एकनाथ शिंदेंची माघार?; भाजप हायकमांडच्या भूमिकेनंतर चर्चांना उधाण
10
मध्यमवर्गीयांमध्ये कोण येतात, किती होते कमाई; सर्वेक्षणातून झाला खुलासा, जाणून घ्या
11
अर्जुन कपूरसोबतच्या ब्रेकअपनंतर पुन्हा एकदा प्रेमात पडली मलायका?, मिस्ट्री मॅनसोबतचा व्हिडीओ व्हायरल
12
'बंडखोरी' रोखण्यासाठी ममता बॅनर्जींनी आपली पकड घट्ट केली; प्रत्येक नेत्याच्या जबाबदाऱ्या निश्चित केल्या
13
Stock Market Highlights: सेन्सेक्स-निफ्टीची फ्लॅट सुरुवात, मिडकॅप इंडेक्समध्ये खरेदी; Adani Ports टॉप लूझर
14
डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतीय वंशाच्या भट्टाचार्य यांच्यावर सोपवली मोठी जबाबदारी
15
'एक'नाथ हैं तो सेफ है' घोषणेवर भाजपचे चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले...
16
युद्ध थांबले! इस्रायल आणि हिजबुल्लामध्ये युद्धविराम, दोन्ही देशात करार झाला; वाचा सविस्तर
17
६५ टक्के आमदारांवर गंभीर गुन्हे, २७७ करोडपती; जाणून घ्या, शिक्षित आमदार किती?
18
तरुणाचा खून, ॲसिड टाकून मृतदेह फेकला; अखेर 'असा' झाला हत्या प्रकरणाचा उलगडा 
19
राज्याचे नवे मुख्यमंत्री कोण? सस्पेन्स अजून कायम; १ किंवा २ डिसेंबरला शपथविधी होणार
20
शुबमन गिलला डेट करण्याची बॉलिवूड अभिनेत्रीची इच्छा, म्हणते- "तो खरंच खूप क्यूट..."

पावसामुळे मध्य रेल्वेचा वेग मंदावला : ठाणे जिल्ह्यातील प्रवाशांचे हाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 09, 2018 4:47 PM

शनिवारी मध्यरात्री दोन वाजल्यापासून पहाटे ६ वाजेपर्यंत कल्याण-डोंबिवलीसह ठाणे जिल्ह्याच्या बहुतांशी भागात वादळी वा-यासह पावसाने हजेरी लावली. त्यामुळे पहाटे कसा-याच्या दिशेने धावणा-या कसारा गाडीसह उपनगरिय लोकल पहाटेपासूनच बाधित झाल्या. काही लोकल ठाणे स्थानकात रद्द केल्यानेही प्रवाशांचे हाल झाले. या गोंधळामुळे वेळापत्रक ४० मिनिटे विलंबाने धावले, पण लोकल सेवा र्पूर्णपणे बंद न झाल्याचे प्रवाशांमध्ये समाधान होते.

ठळक मुद्देलोकल रद्द केल्याने प्रवासी हैराण गोंधळामुळे वेळापत्रक ४० मिनिटे विलंबाने धावले,

डोंबिवली: शनिवारी मध्यरात्री दोन वाजल्यापासून पहाटे ६ वाजेपर्यंत कल्याण-डोंबिवलीसह ठाणे जिल्ह्याच्या बहुतांशी भागात वादळी वा-यासह पावसाने हजेरी लावली. त्यामुळे पहाटे कसा-याच्या दिशेने धावणा-या कसारा गाडीसह उपनगरिय लोकल पहाटेपासूनच बाधित झाल्या. काही लोकल ठाणे स्थानकात रद्द केल्यानेही प्रवाशांचे हाल झाले. या गोंधळामुळे वेळापत्रक ४० मिनिटे विलंबाने धावले, पण लोकल सेवा र्पूर्णपणे बंद न झाल्याचे प्रवाशांमध्ये समाधान होते.मुंबईमध्ये पावसाची जोर कायम होता, त्यामुळे कुर्ला-सायन भागात रेल्वे रूळांमध्ये पाणी साठल्याने त्याचा परिणाम ठाणे जिल्ह्यातील लोकल सेवेवर झाला. ठाणे, दिवा मार्गावर लोकलचे बंचिंग( एकामागोमाग रांग) झाले होते. त्यामुळे सकाळपासून मुंबईला जाणा-या चाकरमान्यांचे हाल झाले. कल्याण-ठाणे प्रवासाला ऐरव्ही २५ मिनिटे धीम्या तर १८ मिनिटे जलद मार्गावरील अप-डाऊन लोकल प्रवासाठी लागतात, पण शनिवारच्या गोंधळामुळे सकाळच्या पहिल्या सत्रात अर्धा ते पाऊण तास लागला. वेळापत्रक कोलमडल्याने ठाणे स्थानकात काही लोकल रद्द करण्यात आल्या होत्या. त्यामुळे ठाणे, दिवा, डोंबिवली कल्याण, अंबरनाथ, बदलापूर तसेच टिटवाळा, आसनगाव स्थानकात प्रवाशांची गर्दी झाली होती.हीच स्थिती दुपारी, संध्याकाळ चार पर्यंत उद्भवली. सायन-कुर्ला मार्गावर पाणी साठल्याने मुंबई-दादरहून निघालेल्या लोकल डाऊनमार्गे कासवगतीने धावल्या, घाटकोपर-ठाण्यापर्यंत गाड्यांचा वेग मंदावलेला होता. ठाणे स्थानकात दुपारी ३ ते ४ या वेळेत केवळ धीम्या मार्गावरील फलाट क्रमांक ४ वरुनच मुंबईच्या दिशेने धावल्या, तर फलाट १ वरुन मुंबईसाठी लोकल सोडल्याच नाहीत अशी माहिती प्रत्यक्षदर्शी जितेंद्र विशे या प्रवाशाने दिली. लोकल गाड्या रद्द होणे, वेग मंदावणे यामुळे दुपारनंतर घरी परतणा-या चाकरमान्यांमुळे गाड्यांना प्रचंड गर्दी झाली होती. मुंबईच्या पावसाचा जोर वाढण्याची शक्यता लक्षात घेत प्रवाशांनी दुपारनंतर तातडीने घरी परतण्याचा निर्णय घेतला, त्यामुळेही दुपारच्या वेळेत गर्दी झाली होती. सकाळी मुंबईला काही लोकल न पोहोचल्याचा परिणाम संध्याकाळच्या वेळापत्रकावर झाला. रात्रीपर्यंत दोन्ही मार्गावरील लोकल १५ ते २० मिनिटे विलंबाने धावत होत्या. ट्रान्स हार्बर मार्गावरील लोकल सेवा वेळेनूसार धावत होती. या गोंधळामुळे लांबपल्याला जाणा-या गाड्यांच्या वेळापत्रक फारसे प्रभावित झाले नाही. अप-डाऊन मार्गावर गाड्या शनिवारी वेळेत धावल्याने त्या गाड्यांनी जाणा-या प्रवाशांना दिलासा मिळाला.* मुंबईत होणा-या पावसासंदर्भात नागरिकांना आधीपासूनच कल्पना होती, त्यातच दुसरा शनिवार असल्याने लोकल प्रवाशांची सकाळपासूनच गर्दी कमी होती. लोकलचा वेग मंदावलेला असला तरी लोकल सुरु होत्या. - माणिक साठे, पोलीस निरिक्षक-कल्याण

टॅग्स :thaneठाणेkalyanकल्याणdombivaliडोंबिवली