मुंबई - वांगणी-शेलू रेल्वे स्थानका दरम्यान रेल्वे रुळाला तडे गेल्याने मध्य रेल्वेची कर्जत, पुण्याच्या दिशेने जाणारी वाहतूक विस्कळीत झाली आहे. सकाळी 9.45 च्या सुमारास रेल्वे रुळाला तडे गल्याचे लक्षात आले. सध्या बदलापूरपर्यंत लोकल वाहतूक सुरु आहे. त्यापुढे कर्जत आणि पुण्याच्या दिशेने जाणारी वाहतूक कोलमडली आहे.
पुणे मार्गे पुढे जाणा-या लांब पल्ल्याच्या गाडयांना याचा फटका बसला आहे. आज भाऊबीजेचा दिवस असून, मोठया प्रमाणावर प्रवासी लोकल सेवेवर अवलंबून आहेत. त्यात कल्याणच्या पुढे मध्य रेल्वेची वाहतूक कोलमडल्यामुळे प्रवाशांना नाहक मनस्ताप सहन करावा लागत आहे. ऐन सणासुदीच्या दिवासतही रेल्वेच्या गलथान कारभाराचा फटका प्रवाशांना सहन करावा लागत आहे.
याआधी सुद्धा मध्य रेल्वेची वाहतूक अनेकदा कोलमडली आहे. सकाळी ऐन कामावर जायच्यावेळी किंवा कामावरुन घरी परतताना अनेकदा लोकल सेवेने प्रवाशांना दगा दिला आहे. आता पुन्हा एकदा प्रवाशांना याच अनुभवातून जावे लागत आहे.