शहरं
Join us  
Trending Stories
1
रवींद्र वायकर यांना मोठा दिलासा, कथित भूखंड घोटाळा प्रकरण अखेर बंद, गैरसमजातून गुन्हा दाखल केला
2
झाशी मेडिकल कॉलेजच्या NICU वॉर्डमध्ये भीषण आग, १० मुलांचा होरपळून मृत्यू
3
Maharashtra Election 2024: "सगळीकडं जायचं, फक्त भुंकायचं"; आनंदराव अडसूळांचं नवनीत राणांवर टीकास्त्र
4
प्रियंका गांधींची आज कोल्हापुरात 'महाराष्ट्र स्वाभिमान' सभा, सभेची जय्यत तयारी
5
Mutual Funds नं 'या' १५ स्टॉक्समध्ये केली सर्वाधिक खरेदी, तुमच्याकडे आहेत का?
6
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कुंभसाठी काळजीचा दिवस
7
शरद पवारांच्या उमेदवारांना धाकधूक; आधीच ‘ट्रम्पेट’ची धास्ती, त्यात १६ ठिकाणी नामसाधर्म्य अपक्षांची भर!
8
रिझर्व्ह बँक व्याजदरात कपात करणार की नाही? Moodys नं सांगितला काय आहे देशाचा 'मूड'
9
अश्नीर गोव्हरची Bigg Boss 18 मध्ये एन्ट्री; सलमान खानने 'दोगलापना'वर केली टीका म्हणाला- "तुम्ही जे चुकीचं..."
10
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
11
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक
12
महत्त्वाची बातमी: 'ते' २ दिवस शाळांना सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण
13
आजचा अग्रलेख: प्रचारातील काय चालेल हो?
14
मलिकांच्या जामीन रद्दच्या त्वरित सुनावणीस नकार
15
मतदारांच्या सोयीसाठी आयोगाचे रंगीत कार्पेट; कशी असेल व्यवस्था? जाणून घ्या...
16
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत
17
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
18
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
19
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
20
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला

खड्ड्यांविरोधात साखळी; डम्पिंग समस्येकडेही वेधले लक्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 17, 2019 11:21 PM

जागरूक नागरिक संघटनेचे आंदोलन

कल्याण : रस्त्यातील खड्डे बुजवण्याच्या प्रक्रियेत केवळ तात्पुरती मलमपट्टी करून नागरिकांची फसवणूक केल्याच्या निषेधार्थ रविवारी येथील जागरूक नागरिक संघटनेतर्फे मानवी साखळी करून केडीएमसीविरोधात आंदोलन करण्यात आले. मोहम्मद अली चौक ते शिवाजी चौक अशी मानवी साखळी करण्यात आली होती. यात खड्ड्यांच्या मुद्द्यासह आधारवाडी डम्पिंगचा विषयही उपस्थित करण्यात आला होता. दररविवारी मानवी साखळी आंदोलन महापालिका क्षेत्रातील विविध ठिकाणी छेडले जाणार आहे.खड्ड्यांच्या मुद्द्यांकडे जागरूक नागरिक संघटना वर्षभर आंदोलनाच्या माध्यमातून लक्ष वेधत आहे. एकीकडे बहुतांश रस्ते सुस्थितीत नसताना रस्त्यावरील एक खड्डा बुजवण्यासाठी २२ हजार रुपये खर्च केल्याचे महापालिका सांगत आहे. एक वर्ष होऊनही काहीच फरक पडत नसल्याने मानवी साखळी आंदोलन छेडण्यात आल्याचे संघटनेचे श्रीनिवास घाणेकर यांनी सांगितले. कल्याणच्या डम्पिंग ग्राउंडचा प्रश्न आजही निकाली निघालेला नाही. बाहेरील कचरा कल्याण पश्चिममध्ये आणला जात आहे. त्यालाही आमचा विरोध आहे. यासंदर्भात आंदोलन छेडूनही प्रशासनाने ठोस कृती केलेली नाही. कल्याणमधील आंदोलनात नागरिकांसह व्यापारी, डॉक्टर, साहित्यिक, इंजिनीअर, वकील, सैन्यातील अधिकारी आदी विविध क्षेत्रांतील व्यक्तींनीही सहभाग घेतला होता. कल्याणकरांना भेडसावत असलेल्या समस्या तातडीने सोडवा, अशी मागणी करण्यात आली.पुढच्या रविवारी डोंबिवली पूर्वेत आंदोलन१५ कोटी रुपये खर्चूनही रस्ते खड्डेमय राहिले आहेत. दुसरीकडे वारेमाप कर वसूल केला जात आहे. पण सुविधा नागरिकांना मिळत नाहीत. यासाठी एखादे जनआंदोलन उभे राहिले पाहिजे, यातून समस्यांबाबत जनजागृतीही होणे आवश्यक आहे.आठवड्यातील दररविवारी हे आंदोलन छेडण्यात येणार आहे. पुढच्या रविवारी डोंबिवली पूर्वेत हे आंदोलन केले जाणार असल्याची माहितीही घाणेकर यांनी दिली.

टॅग्स :Potholeखड्डेGarbage Disposal Issueकचरा प्रश्नdumpingकचरा