विशाल हळदे, ठाणे: यंदा गणेशोत्सव च्या पार्श्वभूमीवर कोकणरेल्वेने प्रथमच दिवा ते रत्नागिरी दिवा अशी मेमू ट्रेन सुरू केलीय. 13 सप्टेंबर पासून सुरू झालेल्या या मेमु सेवेला कोकणातील चाकरमानी यांचा प्रचंड प्रतिसाद मिळताना दिसतोय. सकाळी 7 वाजून 5 मिनिटांनी ही मेमु दिवा स्थानकातून रवाना होण्याआधी फलाटात शिरतानांची ही दृश्य आहेत. रेल्वे फलाटावर तर गर्दी आहेच, मात्र रुळांवर सुद्धा प्रवशी उतरून मेमुत चढण्यासाठी तयार आहेत. कोकण रेल्वे असेल किंवा मध्य रेल्वे विशेष गाड्या सोडण्यात आल्यात, मात्र त्यासुद्धा कमी पडतायत हेच या दृष्यातून दिसून येतंय.
कल्याण डोंबिवली अंबरनाथ बदलापूर ठाणे इथल्या चाकरमान्यांना मेमु सोयीची असल्याने गावी जाण्यासाठी प्रचंड गर्दी केल्याच दिसून येतंय. इतकी गर्दी की पोलिसांना आवरतानाही नाकीनऊ येत होते. अखेर पोलिसांच्या प्रयत्नाने गर्दी नियंत्रित करत प्रवाशांनी खचाखच भरलेली मेमु दिव्यातून रवाना झाली. अजूनही अनेक चाकरमानी अन्य ट्रेनच्या प्रातिक्षेत दिवा स्थानकावर आहेत.