ठाण्यात किरीट सोमय्यांच्या निषेधार्थ भारतीय जयहिंद पार्टीचा चक्का जाम

By ऑनलाइन लोकमत | Published: September 30, 2021 05:18 PM2021-09-30T17:18:40+5:302021-09-30T17:21:10+5:30

Chakka Jaam : प्रतिमेला जोडे मारून केले निषेध आंदोलन:तिघांना पाेलीसांनी घेतले ताब्यात

Chakka Jam of Bharatiya Jayhind Party in Thane to protest Kirit Somaiya | ठाण्यात किरीट सोमय्यांच्या निषेधार्थ भारतीय जयहिंद पार्टीचा चक्का जाम

ठाण्यात किरीट सोमय्यांच्या निषेधार्थ भारतीय जयहिंद पार्टीचा चक्का जाम

Next
ठळक मुद्देतीन आंदोलकांना नौपाडा पोलिसांनी ताब्यात घेतले. नंतर त्यांची सुटका करण्यात आली. किरीट सोमय्या यांच्या घरात घुसून आपण लवकरच बाहेर आणू, असा इशाराही भोसले यांनी दिला.

ठाणे : जरंडेश्वर साखर कारखाना आणि पाटबंधारे खात्यातील कथित भ्रष्टाचाराबद्दल भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर जोरदार टीका केली होती. त्याच्याच निषेधासाठी गुरुवारी भारतीय जय हिंद पार्टीतर्फे ठाण्यात चक्का जाम आंदोलन करण्यात आले. तसेच सोमय्या यांच्या प्रतिमेला जोडे मारून निषेध नोंदविण्यात आला. दरम्यान, यावेळी तीन आंदोलकांना नौपाडा पोलिसांनी ताब्यात घेतले. नंतर त्यांची सुटका करण्यात आली.

भारतीय जयहिंद पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष बाळासाहेब भोसले यांच्या नेतृत्वाखाली ठाण्यातील तीन हात नाका येथील पूर्व द्रुतगती मार्गावर हे आंदोलन झाले. प्रश्न व भ्रष्टाचार बाहेर काढायचे असेल तर गुजरात आणि दिल्ली येथे जाऊन भाजप नेत्यांचे काढा, असे आवाहन भासले यांनी केले. उपमुख्यमंत्री पवार यांना कथित सिंचन घोटाळयामध्ये आधीच क्लीनचिट दिली आहे. तरीही केवळ सूडबुद्धीने भाजप नेत्यांकडून त्यांच्यावर टीका करण्यात येत असल्याचा आरोप त्यांनी केला. भारतीय जयहिंद पार्टीचे पूर्ण समर्थन पवार यांना असल्याचे सूतोवाचही यावेळी भोसले यांनी केले. भाजप पक्षात सगळेच आलबेल नसून त्यांच्या नेत्यांचे देखील मोठमोठे घोटाळे आहेत. ते किरीट सोमय्या यांच्या घरात घुसून आपण लवकरच बाहेर आणू, असा इशाराही भोसले यांनी दिला.

Web Title: Chakka Jam of Bharatiya Jayhind Party in Thane to protest Kirit Somaiya

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.