ठाणे : दिवा-मुंंब्रा या धावत्या लोकल प्रवासात दिव्यातील सुधीर मंडल (२१) या तरुणावर चाकूने हल्ला करणा-या अमोल दलजित सिंग (२०) याला रविवारी ठाणे लोहमार्ग पोलिसांनी कल्याण रेल्वे न्यायालयात हजर केले. न्यायालयाने त्याला २३ जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.दिव्यात बिगारी काम करणारा सुधीर हा शुक्रवारी दोन साथीदारांसह पाणी भरत होता. त्या वेळी रिक्षाचालक अमोलही तेथे पाणी भरण्यासाठी आला होता. या वेळी त्यांच्यात पाणी भरण्यावरून वाद झाला. त्यातून सुधीर व त्याचे दोन साथीदार अमोलच्या घरावर लाक डी दांडे घेऊन मारायला गेले होते. त्या वेळी त्याने दिवा स्थानकात धाव घेतली. तो लोकलमध्ये चढल्याचे पाहून सुधीर व त्याचे साथीदारही त्याच डब्यात चढले. तेथेही भांडण झाल्यानंतर अमोलने सुधीरच्या पोटात चाकू खुपसून जीवे मारण्याचा प्रयत्न केला. शनिवारी दुपारी अमोलला लोहमार्ग पोलिसांनी साठेनगर, वागळे इस्टेट परिसरातून अटक केली. रविवारी त्याला न्यायालयात हजर केले. या वेळी पोलिसांनी त्यालातीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली.
चाकूहल्ला करणाऱ्यास बुधवारपर्यंत पोलीस कोठडी
By ऑनलाइन लोकमत | Published: January 21, 2019 4:19 AM