शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha 2024: उत्तर महाराष्ट्रात ‘महायुती’चे प्राबल्य कायम राहणार का? 
2
PM नरेंद्र मोदी ब्राझीलला पोहोचले, जोरदार स्वागत; जी-२० शिखर परिषदेत सहभागी होणार! 
3
भाजप सरकारचा मुंबई लुटण्याचा डाव, तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डींचा आरोप 
4
Vidhan Sabha election 2024: अचलपूर मतदारसंघात बच्चू कडू इतिहास रचणार का? 
5
श्रीगोंद्यातील राहुल जगतापांना मोठा धक्का; शरद पवारांच्या राष्ट्रवादीतून निलंबन
6
नांदेड लोकसभा पोटनिवडणूक : विधानसभेच्या उमेदवारांवर लोकसभेच्या विजयाचा ‘टेकू’
7
Maharashtra Vidhan Sabha 2024:  उमेदवार किती कोट्यधीश, किती शिकलेले?
8
Success Story : रतन टाटांच्या कंपनीत करायचे नोकरी, एका खोलीतून सुरू केला बिझनेस; आज आहेत १३,५०० कोटींचे मालक
9
घटना बदलण्याचे पाप काँग्रेसचे, त्यांनी शेतकरी, मजुरांकडे दुर्लक्ष केले -नितीन गडकरी
10
'नौटंकी करून मते मिळत नाहीत, मविआकडून दिशाभूल', देवेंद्र फडणवीस यांचे नागपुरात शक्तिप्रदर्शन
11
कोल्हापूरमध्ये जनसुराज्य शक्तीच्या उमेदवारावर जीवघेणा हल्ला, धारदार शस्त्रांनी केले वार 
12
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: धन व प्रतिष्ठेची हानी संभवते, स्त्रीयांशी व्यवहार करताना सावध राहावे!
13
'बिग बॉस मराठी' फेम अभिनेत्याचं शुभमंगल सावधान! लग्नाचे फोटो आले समोर
14
तुम्ही कितीही झेंडे दाखविले तरी मविआच येणार निवडून; प्रियांका गांधी यांचे भाजप कार्यकर्त्यांना प्रत्युत्तर
15
प्रचाराच्या तोफा आज थंडावणार! उमेदवार, मतदारांना आता प्रतीक्षा बुधवारची
16
महागाई नियंत्रणात आणू, मुलांना मोफत शिक्षण देऊ; उद्धवसेनेचे पक्षप्रमुख ठाकरे यांचे आश्वासन
17
Maharashtra Vidhan Sabha 2024: ‘टॉप फाइव्ह’मध्ये मुंबई, ठाणे का नाही?
18
"एमएमआरमध्ये आणले सात लाख कोटींचे प्रकल्प"; देवेंद्र फडणवीस यांचा मुंबई, कोकणातील प्रचारात फोकस
19
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: कोकणात आजी-माजी आमदारांची प्रतिष्ठा पणाला
20
विधानसभा निवडणुकीत पुन्हा महत्त्वाचा मुद्दा; कांद्यामुळे गावाकडे शेतकरी तर शहरात ग्राहक बेजार

अनिष्ट परंपरा हेच संविधानापुढील आव्हान- मुक्ता दाभोलकर

By ऑनलाइन लोकमत | Published: January 30, 2019 12:02 AM

संविधानाची मूल्ये मानणारा समाज घडविण्याची गरज

डोंबिवली : आपल्या समाजात, जातीच्या काही परंपरा आहेत. तोच कायदा आहे, अशी समजूत आहे. त्यामुळे त्या परंपरा तोडणाऱ्याला भावकी शिक्षा सुनवते. हेच भारतीय संविधानासमोरील मोठे आव्हान आहे, असे मत अंधश्रद्धा निमूर्लन समितीच्या कार्यकर्ता मुक्ता दाभोलकर यांनी व्यक्त केले.‘अनुभूती संस्थे’ने संविधानावर आधारित स्पर्धा घेतली होती. त्याचा पारितोषिक वितरण समारंभ डॉ. बाबासाहेब आंबडेकर सभागृहात मंगळवारी झाला. यावेळी दाभोलकर बोलत होत्या. यावेळी कवी व स्तंभलेखिका दिशा शेख, युवा कार्यकर्त्या आरती कडे, संस्थेच्या दीपा पवार उपस्थित होत्या.दाभोलकर म्हणाल्या, ‘संविधानाचा आधार घेऊन अनेक गोष्टींचा उच्चार तुम्ही समाजात करू शकता. या समाजातील अनेकांना आंतरजातीय, आंतरधर्मीय विवाह करणे गुन्हा वाटतो. गावकीतील लोकांना माणसाच्या आयुष्यातील सर्व गोष्टींचे नियमन करण्याचा अधिकार आहे, असे वाटते. व्यक्ती स्वातंत्र्य भारतीय राज्यघटनेचा मूलभूत आधार आहे, तरीही लोक त्याला विरोध करतात. आपल्याला सर्वांना संविधानाचा आधार घेऊनच या आव्हानाला तोंड द्यायचे आहे.’दाभोलकर यांनी सांगितले की, ‘मुलामुलींना आयुष्याचा निर्णय घेण्याचा अधिकार आहे, हे संविधानाच्या आधारावर सांगायचे आहे. संविधानाची मूल्ये मानणारा समाज घडविण्याचा प्रयत्न आपल्याला करायचा आहे. संविधानातील शब्द गूढ व गंभीर आशय घेऊन आलेले आहेत. कलम २१ च्या नव्याने कायदा आला तेव्हा भिन्न लिंग व्यक्तींनी लग्न करायचे, असे कायदा होता. पण समलैंगिकतेला मान्यता कशी मिळाली? एखाद्या व्यक्तीने जगायचे ते आपल्या इच्छेनुसार. त्यामुळे हा कायदा बदलला गेला. ब्रिटिशांनी समलैंगिकतेचा कायदा ठरविला होता. त्यांच्याकडे हा रद्द झाला. तो जुना कायदा भारतात सुरू होता. १९९३ मध्ये उन्नीकृष्णनविरोधात मद्रास अशी एक केस झाली तर त्यात शिक्षण मिळाले तर सन्मानाने जगता येईल, असे सांगितले. त्यानंतर भारतात २००९ मध्ये ‘राईट टू एज्युकेशन’ हा कायदा आला. त्यात ही ० ते ६ आणि १४ वर्षांपुढील मुलांचे शिक्षण त्यात येत नाही. १७ वर्षांची लढाई संविधानातील एक मूल्य प्रत्यक्षात येण्यासाठी आली.’दाभोलकर म्हणाल्या, ७३ व्या घटना दुरुस्तीनुसार महिलांना ३० टक्के आरक्षण मिळाले. आज ते ५० टक्के आहे. ज्यांना देशाच्या सत्तेत वाटा नव्हता त्यांना कायदेशीर वाटा संविधानातून निर्माण झाला. सत्तेवर आलेल्या माणसाने ही सत्ता राबविण्यासाठी सक्षम बनणे, ही पुढील सामाजिक चळवळीची जबाबदारी आहे. संविधानाचा मोठेपणा बाबासाहेबांच्या संविधानाचा अवलंब करू इच्छिणाºयांच्या मोठेपणावर आहे. संविधाननुसार देश चालतो, याचा उच्चार झाला पाहिजे. कारण परंपरेचा पगडा आपल्या देशात आहे. राजस्थानात एक स्त्री सतीबंदी कायद्यानंतर सती गेली. कायदा अस्तित्वात असूनही त्यांची अमंलबजावणी करणे कठीण असते. फक्त कायदा झाल्याने समाजात बदल होणार नाही. संविधानाची ताकद दैनंदिन जीवनात वापरली गेली पाहिजे. प्रत्येक गटाने सणाप्रमाणे संविधान दिन साजरा केला पाहिजे. संविधानाचा विचार हा देश चालवेल हे पुढील पिढीच्या मनावर बिंबवण्यासाठी संविधान दिन साजरा झाला पाहिजे.... तरीही महिलांना मंदिर प्रवेश नाहीदिशा शेख म्हणाल्या, गौरी लंकेश, दाभोलकर यासारख्या विचारवंताच्या हत्या समाजात होतात. संविधान नसते तर त्या गोष्टी कुठेपर्यंत गेल्या असत्या. संविधान असताना महिलांना मंदिर प्रवेश रोखला जात आहे.बाबासाहेबांनी तळागाळापासून उच्चभ्रूसाठी संविधानात लिहिले आहे. नागरिकांना मूलभूत सुविधा न देता वायफ ाय सारख्या सुविधामध्ये गुंतवून ठेवले आहे. स्थानकात आज नळ नाही, पण वायफाय सुविधा आहेत.