शहरं
Join us  
Trending Stories
1
भाषण करताना सुरू झाला पाऊस, निवडणुकीचा निकाल चांगला लागणार, शरद पवारांचं विधान
2
Mumbai Metro 3 Fire BREAKING: मेट्रो-३ च्या बीकेसी स्टेशनला आग, सर्व फेऱ्या रद्द; प्रवासी सुखरुप
3
“राहुल गांधींच्या सभांना प्रचंड प्रतिसाद, PM मोदींची हवा संपली, रिकाम्या खुर्च्यांना संबोधन”
4
भाजपकडून मुख्यमंत्रिपदासाठी विनोद तावडे, पंकजा मुंडे, चंद्रशेखर बावनकुळेंचीही चर्चा
5
एकदम कडक! WhatsApp वर येणार दमदार फीचर; मेसेजची 'ही' मोठी समस्या होणार दूर
6
शेअर बाजारातील घसणीचा टप्पा हा तात्पुरता, परदेशी गुंतवणूकदार बाजारात परतणार : रामदेव अग्रवाल 
7
तेल, तूप, साखर, मीठ... खच्चून महिन्याला ५०० रुपये खर्च, वर १००० उरतात; कोल्हापुरात उमेदवाराच्या सुनेचे वक्तव्य 
8
विधेयक फाडलं अन् संसदेत केला आगळावेगळा डान्स; महिला खासदाराचा व्हिडिओ व्हायरल
9
भाजपाशी मतभेद, पण कुणी बोलायला तयार असेल तर...; उद्धव ठाकरेंनी घातली साद
10
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा रद्द, पालिकेची परवानगी मिळूनही असा निर्णय का? वाचा कारण
11
तिसरी बार, १०० पार; भाजपाला 'ही' हॅटट्रिक जमेल? नेमकं कसं आहे समीकरण
12
जातनिहाय जनगणनेवर भाजपा आणि नरेंद्र मोंदीनी भूमिका जाहीर करावी, काँग्रेसचं आव्हान
13
"लादीवर झोपवायचे म्हणता, तुमच्या वडिलांना विचारा, तेव्हा...;" रामदास कदम यांची आदित्य ठाकरेंवर जहरी टीका 
14
श्रद्धा वॉकर हत्याकांडातील आरोपी आफताब बिश्नोई टोळीच्या हिटलिस्टवर, तिहार प्रशासन सतर्क
15
भाजपाचा अमित ठाकरेंना पाठिंबा, महायुतीचे समर्थन का नाही? फडणवीसांनी काय घडले, ते सांगितले
16
“छत्रपती शिवरायांची मंदिरे बांधण्यापेक्षा गड-किल्ल्यांचे संवर्धन करा”; राज ठाकरे थेट बोलले
17
कॅनडातील पंजाबी गायकांच्या भागात १०० राऊंड फायरिंग; योगायोगाने पोलिसही तिथेच अडकलेले...
18
ज्या व्हॅनने शाळेतून घरी सोडलं तिनेच चिरडलं; वडिलांच्या कुशीतच ६ वर्षीय लेकीने सोडला जीव
19
पुन्हा एकदा महागणार Vodafone-Idea चे रिचार्ज प्लॅन्स? कंपनीच्या अधिकाऱ्यानं सांगितली 'ही' बाब

आव्हाडांसमोर युतीच्या गनिमीकाव्याचे आव्हान, शिवसेनेची नवी रणनीती

By ऑनलाइन लोकमत | Published: May 29, 2019 12:50 AM

कल्याण लोकसभा मतदारसंघात असलेल्या कळवा-मुंब्रा या विधानसभा मतदारसंघात शिवसेनेला मागील निवडणुकीपेक्षा जास्तीची मते मिळाली

- अजित मांडकेकल्याण लोकसभा मतदारसंघात असलेल्या कळवा-मुंब्रा या विधानसभा मतदारसंघात शिवसेनेला मागील निवडणुकीपेक्षा जास्तीची मते मिळाली असल्याचे लोकसभेच्या निकालावरून दिसून आले आहे. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणूक ही राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांना अतिशय अवघड जाणार असल्याचे दिसत आहे. या मतदारसंघातून शिवसेनेचे उमेदवार डॉ. श्रीकांत शिंदे यांना ६७ हजार ४५५ मते मिळाली आहेत. मागील निवडणुकीच्या तुलनेत या मतांमध्ये तब्बल १४ हजार ५५१ मतांची निर्णायक वाढ झाल्याचे दिसून येत आहे. तर या मतदारसंघातून राष्ट्रवादीचे बाबाजी पाटील यांना ७७ हजार ३३६ मते मिळाली असून मागील वेळेस राष्ट्रवादीला ६५ हजार १६० मते मिळाली होती. त्यात यंदा केवळ १२ हजार १७६मते जास्तीची मिळाली आहेत. परंतु, शिवसेनेच्या मतांमध्ये राष्ट्रवादीच्या मतांच्या तुलनेत काहीशी वाढ झाल्याने ही शिवसेनेसाठी जमेची बाजू असून मागील वेळेप्रमाणे पुन्हा एमआयएमला येथे उमेदवारी देऊन मतांचे विभाजन करून शिवसेना येथून शिवसेना आव्हाडांना आव्हान देऊ शकते. तशी रणनीती आतापासूच सुरू झाली असून असे झाल्यास राष्टÑवादीला कळवा-मुंब्य्राचा गड राखणे कठीण जाणार आहे.कळवा-मुंब्रा या विधानसभा मतदारसंघात राष्टÑवादीचे कळव्यातून ८, मुंब्रा, दिवा भागातून २१ नगरसेवक निवडून आले. तर कळव्यातील आणि मुंब्य्रातील दोन अपक्ष नगरसेवकांनीही राष्टÑवादीबरोबर घरोबा केला आहे. यामुळे राष्टÑवादीकडे ३१ नगरसेवकांचे पाठबळ येथे आहे. तर शिवसेनेला मात्र कळवा आणि मुंब्य्रात फटका बसल्याचे दिसून आले. कळव्यात शिवसेनेच्या नगरसेवकांमध्ये एकने घट होऊन त्यांची संख्या सात आली आहे. तर मुंब्य्रात शिवसेनेला भोपळाही फोडता आलेला नाही. दिव्यात मात्र भाजपची लाट असतानाही त्याठिकाणी आठही जागा शिवसेनेने आपल्या ताब्यात घेतल्या. त्यामुळे ही शिवसेनेसाठी जमेची बाजू ठरली.२०१४ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत एकट्या राष्टÑवादीला ८६ हजार ५३३ मते मिळाली होती. तर काँग्रेसला अवघी तीन हजार ८४७ मते मिळाली होती. शिवसेनेला येथून ३८ हजार ८५० मते मिळाली होती, तर एमआयएमला येथून १६ हजार ३७४ आणि भाजपला १२ हजार ८१८ मते मिळाली होती. शिवसेना आणि भाजपची मते मिळून ५१ हजार ६६८ मते मिळाली होती. यंदा लोकसभा निवडणुकीत यात शिवसेनेला या मतदारसंघातून ६७ हजार ४५५ मते मिळाल्याचे दिसून आले. त्यामुळेच शिवसेनेच्या मतांमध्ये वाढ झाल्याचेच दिसत आहे. राष्टÑवादीचे उमेदवार बाबाजी पाटील यांना या मतदारसंघातून ७७ हजार ३३६ मते मिळाली. पण विधानसभेला आव्हाडांना मिळालेल्या मतांच्या तुलनेत त्यात नऊ हजार १९७ मतांची घट झाल्याचे दिसून आले. त्यामुळे राष्टÑवादीला हा धक्का मानला जात आहे. ंशिवाय, या निवडणुकीत या पट्ट्यात वंचित आघाडी चालली नसली तरी आगामी विधानसभा निवडणुकीत तिचा उमेदवार हा निर्णायक भूमिकेत असणार आहे. मागील निवडणुकीत मनसे लढली असली तरी यंदा मात्र त्यांच्या मतांचा फायदा हा राष्टÑवादीच्या उमेदवाराला होईल, असा अंदाज होता; पण तसे काही या मतदारसंघात घडल्याचे दिसले नाही. त्यामुळे ही राष्टÑवादीसाठी धोक्याची घंटा मानली जात आहे. त्यामुळे मागील वेळेस जी खेळी शिवसेनेने केली होती, तशीच काहीशी खेळी आगामी विधानसभा निवडणुकीत खेळली जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. मुंब्य्रातून एमआयएमचे कार्ड चालवायचे आणि राष्टÑवादीच्या मतांमध्ये फूट पाडायची आणि कळव्यातून पुन्हा शिवसेनेचा उमेदवार उभा करून त्याने कळव्यातील मते घ्यायची अशी रणनीती आखण्याचा शिवसेनेचा प्रयत्न होता. पण औरंगाबाद पॅर्टनही येथे चालला तर एमआयएमला त्याचा फायदा होऊनसेनेचा उमेदवार पडूही शकतो.>की फॅक्टर काय ठरला?या विधानसभा मतदारसंघात राष्टÑवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांची मजबूत पकड असल्याचे मान्य केले असले तरी शिवसेना आणि भाजप येथे एकत्रपणे काम करताना दिसली. त्याचाच परिणाम म्हणून येथून १४ हजार ५५१ मतांची निर्णायक आघाडी शिवसेनेला घेता आली. या पट्ट्यात कळवा आणि मुंब्रा हा भाग येत असला तरी दिव्यावर शिवसेनेचे वर्चस्व असल्याने त्याचा फायदा शिवसेनेच्या वाढीव मतांवर झाल्याचे दिसले.या मतदारसंघात आव्हाडांनी मागील पाच वर्षांत केलेल्या कामांचा परिणाम म्हणूनच बाबाजी पाटील यांना ७७ हजाराहून अधिकची मते या मतदारसंघातून घेता आली आहेत.>विधानसभेवर काय परिणाममागील विधानसभा निवडणुकीत राष्टÑवादीच्या जितेंद्र आव्हाडांना घेरण्याचा प्रयत्न शिवसेनेकडून झाला होता. पण त्याचा फारसा परिणाम त्यांच्या मतांवर झाल्याचे दिसून आले नाही. उलट त्यांच्या मतांमध्ये वाढ झाल्याचे दिसून आले. आता वंचित आघाडीचा फॅक्टर हा इतर ठिकाणी चालल्याने विधानसभा निवडणुकीत त्याचा फायदा कसा घेता येईल यासाठी शिवसेनेचे प्रयत्न असणार आहेत. तसे झाल्यास राष्टÑवादीला हा गड राखण्यासाठी कसरत करावी लागेल.

टॅग्स :Jitendra Awhadजितेंद्र आव्हाड