शहरं
Join us  
Trending Stories
1
Vinod Tawde: हे गँगवॉर असू शकते...; विनोद तावडे प्रकरणात उद्धव ठाकरेंनी व्यक्त केला संशय
2
विनोद तावडेंवर पैसे वाटपाचा आरोप; बविआचा राडा, निवडणूक आयोगाची पहिली प्रतिक्रिया काय?
3
Amol Kolhe : "पैशाच्या जोरावर महाराष्ट्र जिंकायचा, गुजरातच्या दावणीला बांधायचा"; अमोल कोल्हेंचा भाजपावर हल्लाबोल
4
'पैशासाठी दिल्ली कॅपिटल्सचा संघ सोडलेला नाही...', IPL 2025 लिलावापूर्वी Rishabh Pant च्या पोस्टने खळबळ
5
मतदान एका दिवसावर! महायुती की मविआ?... हे मुद्दे विचारात घेऊन मतदार मत देणार…
6
Vinod Tawde : भाजप नेते विनोद तावडे यांच्यावर निवडणूक आयोगाची कारवाई, पैसे वाटल्याच्या आरोपावरून FIR दाखल
7
मणिपूरमध्ये वाद वाढला, एनडीएचा प्रस्ताव मैतेई संघटनेने फेटाळला; २४ तासांचा अल्टिमेटम दिला
8
“भाजप अन् विनोद तावडेंवर निवडणूक आयोगाने कठोर कारवाई करावी”: बाळासाहेब थोरात
9
Video - डान्स करतानाच नवरदेवाला आला हार्टअटॅक; वराती ऐवजी निघाली अंत्ययात्रा
10
विनोद तावडेंच्या डायरीत १५ कोटी रुपयांची नोंद; क्षितीज ठाकूर यांचा खळबळजनक आरोप
11
संपूर्ण महाराष्ट्रात २० नोव्हेंबरला सरकारी सुट्टी; शेअर बाजार-बँका बंद, पण...
12
शेत, प्लॉट मोजणीचे शुल्क किती, माहितेय का?
13
...अन् शेवटी तावडे आणि ठाकूर एकाच गाडीत बसून गेले; चार तासांत नेमकं काय-काय घडलं?
14
एवढा पैसा आला कुठून? विनोद तावडेंच्या आरोपावरून सुप्रिया सुळेंचा सवाल
15
‘एक है तो सेफ है’ घोषणेवरून लालूप्रसाद यादवांची भाजपासह साधूसंतांवर टीका, म्हणाले...  
16
Vinod Tawde: विनोद तावडे प्रकरणात ९,९३,५०० रुपये रक्कम सापडली; निवडणूक आयोगाची माहिती
17
IPL 2025: मेगा लिलावाआधी १९ वर्षीय मराठमोळ्या खेळाडूची रंगली चर्चा, कोण आहे तो?
18
“गृहखात्याने पाळत ठेवली अन् विनोद तावडे जाळ्यात अडकतील याचा बंदोबस्त केला”; राऊतांचा दावा
19
Vinod Tawde: विनोद तावडे प्रकरण मिटले? हितेंद्र ठाकुरांसोबत एकत्र पत्रकार परिषद होती, पोलिसांनी रोखली
20
कर्तव्यनिष्ठेला सलाम! स्वतःच्या जीवाची पर्वा न करता नर्सने १५ बाळांचा आगीतून वाचवला जीव

शेअर बाजाराकडे बघण्याची दृष्टी बदला - चंद्रशेखर टिळक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 15, 2018 2:40 AM

शेअर बाजार सतत बदलणारे क्षेत्र आहे. सध्या जे बाजारात सुरू आहे त्याचे स्वरूप, त्याचे प्रमाण आणि त्याची कारणमीमांसा ही आधीपेक्षा पूर्णपणे वेगळी आहे.

डोंबिवली - शेअर बाजार सतत बदलणारे क्षेत्र आहे. सध्या जे बाजारात सुरू आहे त्याचे स्वरूप, त्याचे प्रमाण आणि त्याची कारणमीमांसा ही आधीपेक्षा पूर्णपणे वेगळी आहे. त्यामुळे शेअर बाजाराकडे बघण्याचा आपला दृष्टिकोन आणि त्यात सहभागी होताना आपण अवलंबण्याची कार्यपद्धती बदलण्याची नितांत आवश्यकता आहे, असे मत ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ चंद्रशेखर टिळक यांनी व्यक्त केले.फे्रण्ड्स कट्टा आणि पै फ्रेण्ड्स लायब्ररी यांनी ‘बदलत्या बाजारात आम्ही’ या विषयावर व्याख्यान आयोजित केले होते. यावेळी टिळक बोलत होते. शास्त्री सभागृहात हा कार्यक्रम पार पडला. टिळक म्हणाले, मोदी आणि आधीची सरकारे यांच्या अर्थनीतीमुळे आपल्या शेअर बाजाराचे निर्देशांक विक्रमी पातळीवर आहेत. आधीच्या अनेक दशकांच्या तुलनेत हे चित्र पूर्णपणे वेगळे आहे. हा बदल सर्वांनीच आवर्जून लक्षात घेतला पाहिजे.बदलत्या शेअर बाजाराचे तिसरे वैशिष्ट्य म्हणजे निर्देशांक विक्रमी पातळीवर असताना अनेक मोठ्या कंपन्यांच्या शेअर्सच्या किमती त्यांच्या वर्षभरातील सगळ्यात खालच्या पातळीवर आहेत. हा मुद्दा स्पष्ट करताना टिळकांनी अनेक कंपन्यांच्या नुकत्याच जाहीर झालेल्या वार्षिक कामगिरीचे मार्मिक विश्लेषण केले. भांडवलवृद्धी आणि तरलता यांचे बदलते कोष्टक हे बदलत्या बाजाराचे अजून एक वैशिष्ट्य आहे.बाजारातील तेजीचे श्रेय विदेशी वित्तसंस्थांच्या खरेदीला देण्याचा प्रघात होता. त्याच न्यायाने मंदीचे खापर अशा वित्तसंस्थांनी केलेल्या विक्रीवर फोडले गेले आहे. काही महिन्यांत विदेशी वित्तसंस्थांनी ६००० कोटी रुपयांहून जास्त किमतीचे शेअर्स विकले आहेत.उभरत्या बाजारातून बाहेर पडण्याचा न्याय, अशा संस्था आपल्या देशालाही लावत आहेत. तरीही शेअर बाजाराचा निर्देशांक विक्रमी पातळीवर आहे, हे बाजाराचे वैशिष्ट्य आहे. मोदी सरकारच्या यशस्वी विदेशी नीतीचा घोष करताना या गोष्टीचा विसर पडणे परवडणारे नाही, याकडे टिळक यांनी लक्ष वेधले.अनेक देशांतर्गत आणि जागतिक घटना, तेलाच्या किमती, अमेरिकी राष्ट्राध्यक्षांनी अवलंबलेले धोरण, मोदी सरकारच्या धोरणाचे झालेले आणि संभाव्य फलित आणि त्यांचे दूरगामी परिणाम यांची त्यांनी सोदाहरण चर्चा केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आतिश कुलकर्णी यांनी केले.

टॅग्स :Stock Marketशेअर बाजारnewsबातम्या