शहरं
Join us  
Trending Stories
1
पाठिंबा दिलेल्या अपक्ष उमेदवाराला वंचितने दिले चाबकाचे फटके, काळेही फासले; असे का घडले...
2
दिलीप वळसे, मुश्रीफांना पाडण्याचे शरद पवारांचे आवाहन; अजितदादांवर म्हणाले, "तिथं काय बोलणार..."
3
भाजपानं घोषित केलेली 'भावांतर योजना' गेमचेंजर ठरणार?; शेतकर्‍यांची चिंता मिटणार
4
'बंटोगे तो कटोगें'वर कंगना यांचा घुमजाव; आधी म्हणाली, "हा विरोधकांचा मुद्दा" अन् नंतर...
5
भाजपच्या किती जागा येणार? जयंत पाटलांनी सांगितला आकडा; केली मोठी भविष्यवाणी!
6
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : शिराळा विधानसभेत टफ फाईट! सत्यजीत देशमुख की मानसिंगराव नाईक,कोण मारणार बाजी?
7
त्यांना बॅगा, खोके पुरत नाहीत, कंटेनर लागतो; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर हल्ला
8
धारावीची जमीन अदानींना द्यायची होती म्हणून सरकार चोरले; राहुल गांधींचा भाजपवर आरोप
9
'मिस्टर इंडिया'तील ही क्युट टीना आठवतेय का? आता तिला ओळखणं झालंय कठीण
10
महाराष्ट्राचे बेस्ट मुख्यमंत्री कोण? अजित पवारांनी घेतले या नेत्याचे नाव, म्हणाले...'युती-आघाडीच्या युगात...'
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :वाईतील सभेत शरद पवारांना अचानक एक चिठ्ठी आली,पवारांनी वाचूनच दाखवली, म्हणाले,...
12
वडील घरी न आल्याने अमेरिकेतील मुलांनी आयफोनने अहमदाबादचं लोकेशन केलं ट्रॅक अन्...
13
प्रियांका गांधी यांच्याकडून भरसभेत बाळासाहेब ठाकरे यांचा उल्लेख; PM मोदी, अमित शाह यांना मोठं आव्हान
14
काँग्रेसमध्ये बंडखोरी, पण अजित पवारांच्या मंत्र्यासाठी निवडणूक किती कठीण?
15
Lawrence Bishnoi : सलमान ते श्रद्धा वालकरचा मारेकरी आफताबपर्यंत...; लॉरेन्स बिश्नोईच्या हिटलिस्टमध्ये कोण आहे?
16
"केम छो वरली, जिलेबी फाफडा उद्धव ठाकरे आपडा तुम्ही बोलायचं अन्..."
17
टीम इंडियाला मोठा धक्का; दुखापतीमुळं Shubman Gill पहिल्या कसोटीतून 'आउट'?
18
दोन मित्रांमध्ये प्रतिष्ठेची लढत; राजकीय आखाड्यात कोणता पैलवान मारणार बाजी? 
19
मौलाना सज्जाद नोमानींनी जारी केली यादी; मुंबईतील ३६ जागांवर कुणाला दिला पाठिंबा?
20
बंडखोर उमेदवारांमुळे मतविभाजनाची भीती; भाजप, ठाकरेंच्या शिवसेनेसमोर आव्हान

वाहतूक नियंत्रणासाठी ‘नमो सेंट्रल पार्क’ परिसरात वाहतूक मार्गात बदल, कोंडी टाळण्यासाठी उपाययोजना

By जितेंद्र कालेकर | Published: March 01, 2024 11:51 PM

शनिवार, रविवारी लागू राहणार बदल

जितेंद्र कालेकर, लोकमत न्यूज नेटवर्क, ठाणे: येथील कोलशेत भागात उभारलेल्या ‘नमो सेंट्रल पार्क’मध्ये शनिवार आणि रविवार या सुट्टीच्या दिवशी पर्यटकांची मोठी गर्दी होत आहे. त्यामुळे परिसरातील रस्त्यांवर वाहनांची मोठी कोंडी होत आहे. हीच कोंडी सोडविण्यासाठी वाहतूक पोलिसांनी आता शनिवार आणि रविवारी येथील वाहतूक मार्गात प्रयोगिक तत्वावर मोठे बदल केले आहेत. ही वाहतूक शहराबाहेरून बाळकूम येथून भिवंडीकडे जाणार्या मार्गावरील पर्यायी मार्गावरून वळविण्यात येणार असल्याची माहिती उपायुक्त डॉ. विनयकुमार राठोड यांनी दिली.

ठाण्यातील नागरिकांना हक्काचे पार्क मिळावे यासाठी पालिकेने कोलशेत भागात नमो सेंट्रल पार्क हे उद्यान विकसित केले आहे. या सेंट्रल पार्कमध्ये पर्यटक मोठ्या संख्येने येत आहेत. शनिवार आणि रविवार या सुट्टीच्या दिवशी पर्यटकांची मोठी गर्दी होत आहे.त्यामुळ्रे या परिसरात दोन हजार ते अडीच हजार इतकी वाहने उभी राहून मोठी कोंडी होत आहे. पार्कसिटी याठिकाणी येणाºया वाहनांसाठी केवळ २०० ते २५० इतक्याच वाहनांच्या पार्र्किंगची सुविधा आहे.

पर्यटकांच्या वाहनांचा भार वाढल्याने कोलशेत, ढोकाली आणि हायलँड भागात वाहतुक कोंडी होत आहे. या कोंडीबाबत नागरिकांकडून नाराजीचा सूर उमटू लागताच वाहतूक पोलिसांनी या भागातील कोंडीची समस्या सोडविण्यासाठी पाऊले उचलली आहेत. वाहतूक शाखेने दिलेल्या माहितीनुसार कापुरबावडी सर्कल येथून येणारी वाहने बाळकुम नाका सिग्नल येथून दादलानी पार्ककडे जाणाऱ्या चौकातून भिवंडीकडे जाणाऱ्या वाहिनीच्या दिशेने जातील. याच मार्गे कळवा- साकेत येथून येणारी वाहने पार्कच्या दिशेने जातील. काल्हेर-कशेळी-भिवंडी मार्गे येणारी वाहने दादलानी पार्क चौकातून वळण घेऊन ठाणे-भिवंडी वाहिनीवरून पुढे दोस्ती वेस्ट कॉन्ट्री प्रवेशद्वारातून पार्कच्या दिशेने जातील. एका महिन्याच्या प्रायोगिक तत्वावर हे बदल लागू केले असून पार्कमध्ये जाणाऱ्या नागरिकांनी या मागार्चा वापर करावा, असे आवाहन पोलिस उपायुक्त डॉ. राठोड यांनी केले आहे.

कल्पतरू गृहसंकुलामध्ये रहिवाशी राहण्यासाठी आल्यानंतर वाहनांची संख्या २२०० इतकी होणार आहे. तसेच ब्रॉडवे आॅटोमोबाईल्स पेट्रोल पंप ते विहंग इन हॉटेल या सेवा रस्त्यावर मलवाहिनी टाकण्यात येणार असून त्याचबरोबर मलजोडणीची कामे करण्यात येणार आहे. यासाठी खोदकाम करण्यात येणार असल्याने हा रस्ता पूर्णपणे बंद करावा लागणार आहे. या सर्वच पार्श्वभूमीवर येथील मार्गात वाहतूक बदल लागू केले आहेत.

टॅग्स :thaneठाणे