भिवंडी : राज्य सरकारने एमएमआरडीएच्या माध्यमातून ठाणे- कापूरबावडी -भिवंडी - कल्याण या मेट्रो -५ मार्गिकेला मंजुरी देऊन कामाला सुरूवात केली आहे. मात्र शहरातील राजीव गांधी चौक ते टेमघर नाक्यापर्यंतच्या मेट्रो प्रकल्पाने बाधित होणाºया नागरिकांनी मेट्रोचा मार्ग बदलण्यासाठी शुक्रवारी पालिका कार्यालयावर मोर्चा काढत विरोध केला.आॅक्टोबर २०१६ मध्ये कल्याण खाडीपुलाचे व मोठागाव पुलाचे उद््घाटन करताना केलेल्या भाषणात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मेट्रो रेल्वे - ५ या प्रकल्पाची घोषणा केली. या प्रसंगी खासदार कपिल पाटील यांनी मुख्यमंत्र्यांच्या या निर्णयाचे स्वागत केले होते. त्यानंतर एमएमआरडीएच्या बैठकीत ठाणे-भिवंडी-कल्याण या मेट्रो- ५ या मार्गाला मंजुरी देण्यात आली. एकूण २४ किलोमीटर लांबीच्या या प्रकल्पासाठी अपेक्षित खर्च ८ हजार ४१६ कोटी येणार आहे. या बैठकीत मेट्रो - ५ प्रकल्पासह मेट्रो - ६ च्या विस्तारीकरणाला परवानगी देण्यात आली आहे. त्यामुळे हे दोन्ही प्रकल्प डीपीआरच्या मान्यतेसाठी राज्य मंत्रिमंडळाकडे पाठवून मंजूर करण्यात आले आहे. मेट्रो - ५ मध्ये एकूण १७ स्थानके आहेत. त्या स्थानकातील गोपाळनगर कल्याण नाका ते टेमघर मार्गावरील लोकवस्ती व दुकाने बाधित होत आहेत. त्यांचे प्रथम पुनर्वसन करणे आवश्यक आहे.परंतु या बाधित नागरिकांना निव्वळ नोटीसा बजावून संबंधित अधिकारी बेघर करण्याच्या मार्गावर असल्याचा आरोप कल्याण रोड संघर्ष समितीने केला आहे. तसेच या मार्गावरील रेल्वेबाबत महासभेत घेतलेला ठराव रद्द करून या रेल्वेचा मार्ग बदलावा, अशी मागणी बाधितांनी केली आहे. सेनेचे नगरसेवक मदन बुवा नाईक, नासिर सय्यद, शादाब उस्मानी, राम शिगवण आदी सहभागी झाले होते. महापौर जावेद दळवी व पालिका आयुक्त डॉ. योगेश म्हसे यांना निवेदन दिले.
मेट्रोचा मार्ग बदलण्यासाठी भिवंडीमध्ये निघाला मोर्चा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 18, 2017 1:13 AM