सदानंद नाईक
उल्हासनगर : सिंधी समाजाची प्रसिद्ध चेटीचंड यात्रा सोमवारी २ एप्रिल रोजी शहरातून सकाळी निघणार असून यात्रेची सांगता स्वामी शांतीप्रकाश आश्रम येथे होणार आहे. यात्रेने वाहतूक कोंडी होऊ नये म्हणून विभागाने रस्त्यातील वाहतुकीत बदल करण्यात आला आहे.
उल्हासनगरात सिंधी समाजाची संख्या मोठी असून जगातील सिंधी समाजाचा शहराकडे बघण्याचा दृष्टिकोन वेगळा आहे. मराठी नववर्ष उत्सवा प्रमाणे सिंधी समाजाच्या वतीने दरवर्षी चेटीचंड यात्रेचे आयोजन केले जाते. मात्र कोरोनामुळे दोन वर्षात यात्रा रद्द करण्यात आली होती. मात्र यावर्षी कोरोनाचे निर्बंध हटविल्याने, चेटीचंड यात्रा व बाईक रैलीची आयोजन केले. सकाळी ११ वाजता कॅम्प नं-२ येथील झुलेलाल मंदिर येथून यात्रेची सुरवात होणार असून झुलेलाल मंदिर ते साधुबेला चौक, भारत चौक, शिरू चौक, नेहरू चौक, लिंक रोड, शिवाजी चौक, हिराघाट मार्गे श्रीराम चौक येथे मुख्य मार्केट, व्हीनस चौक, नेहरू चौक मार्गे स्वामी शांती प्रकाश आश्रम येथे यात्रेचे संपन्न होणार आहे. यात्रेत विविध रथ, देखावे सजणार आहेत. चेटीचंड यात्रेमुळे शहरात वाहतूक कोंडी होऊ नये म्हणून यात्रेच्या रस्त्यावरील वाहतूक पर्यायी मार्गाने वळविण्यात आली. अशी माहिती पोलीस वाहतूक विभागाचे उपायुक्त बाळासाहेब यांनी दिली आहे.