शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha 2024: उत्तर महाराष्ट्रात ‘महायुती’चे प्राबल्य कायम राहणार का? 
2
PM नरेंद्र मोदी ब्राझीलला पोहोचले, जोरदार स्वागत; जी-२० शिखर परिषदेत सहभागी होणार! 
3
भाजप सरकारचा मुंबई लुटण्याचा डाव, तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डींचा आरोप 
4
Vidhan Sabha election 2024: अचलपूर मतदारसंघात बच्चू कडू इतिहास रचणार का? 
5
श्रीगोंद्यातील राहुल जगतापांना मोठा धक्का; शरद पवारांच्या राष्ट्रवादीतून निलंबन
6
नांदेड लोकसभा पोटनिवडणूक : विधानसभेच्या उमेदवारांवर लोकसभेच्या विजयाचा ‘टेकू’
7
Maharashtra Vidhan Sabha 2024:  उमेदवार किती कोट्यधीश, किती शिकलेले?
8
Success Story : रतन टाटांच्या कंपनीत करायचे नोकरी, एका खोलीतून सुरू केला बिझनेस; आज आहेत १३,५०० कोटींचे मालक
9
घटना बदलण्याचे पाप काँग्रेसचे, त्यांनी शेतकरी, मजुरांकडे दुर्लक्ष केले -नितीन गडकरी
10
'नौटंकी करून मते मिळत नाहीत, मविआकडून दिशाभूल', देवेंद्र फडणवीस यांचे नागपुरात शक्तिप्रदर्शन
11
कोल्हापूरमध्ये जनसुराज्य शक्तीच्या उमेदवारावर जीवघेणा हल्ला, धारदार शस्त्रांनी केले वार 
12
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: धन व प्रतिष्ठेची हानी संभवते, स्त्रीयांशी व्यवहार करताना सावध राहावे!
13
'बिग बॉस मराठी' फेम अभिनेत्याचं शुभमंगल सावधान! लग्नाचे फोटो आले समोर
14
तुम्ही कितीही झेंडे दाखविले तरी मविआच येणार निवडून; प्रियांका गांधी यांचे भाजप कार्यकर्त्यांना प्रत्युत्तर
15
प्रचाराच्या तोफा आज थंडावणार! उमेदवार, मतदारांना आता प्रतीक्षा बुधवारची
16
महागाई नियंत्रणात आणू, मुलांना मोफत शिक्षण देऊ; उद्धवसेनेचे पक्षप्रमुख ठाकरे यांचे आश्वासन
17
Maharashtra Vidhan Sabha 2024: ‘टॉप फाइव्ह’मध्ये मुंबई, ठाणे का नाही?
18
"एमएमआरमध्ये आणले सात लाख कोटींचे प्रकल्प"; देवेंद्र फडणवीस यांचा मुंबई, कोकणातील प्रचारात फोकस
19
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: कोकणात आजी-माजी आमदारांची प्रतिष्ठा पणाला
20
विधानसभा निवडणुकीत पुन्हा महत्त्वाचा मुद्दा; कांद्यामुळे गावाकडे शेतकरी तर शहरात ग्राहक बेजार

मुंबई-बडोदा राष्ट्रीय महामार्गात बिल्डरांच्या हितासाठी केले बदल

By ऑनलाइन लोकमत | Published: May 04, 2019 1:13 AM

एनए जमीन बळकावण्याचा घाट : शेतकऱ्यांमध्ये तीव्र संताप, जिल्हाधिकाऱ्यांना साकडे

सुरेश लोखंडेठाणे : नव्याने होऊ घातलेल्या मुंबई-बडोदा राष्ट्रीय महामार्गाचा मूळमार्ग बदलून तो बदलापूरमधील चांमटोली गावाच्या हद्दीतील अकृषिक (एनए) जमिनीवरून वळवल्याची गंभीर चर्चा सध्या सुरू आहे. राजकारण्यांचे हितसंबंध गुंतलेल्या विकासकाच्या भल्यासाठी व त्यांची शाळा, हॉस्पिटल वाचवण्यासाठी शेतकऱ्यांच्या एनए जमिनीवरून हा राष्ट्रीय महामार्ग वळवण्यात आल्याचा आरोप या परिसरातील शेतकऱ्यांनी केला आहे. प्रशासनाच्या या मनमानीविरोधात ते ठाणे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांना साकडे घालून न्यायालयात धाव घेण्याच्या प्रयत्नात आहेत. 

मुंबई ते बडोदा हायवेसाठी कल्याणमधील १३ आणि अंबरनाथ तालुक्यातील १३ गावांतील जमिनी संपादित केल्या आहेत. बदलापूरसमवेत काही गावांच्या जमिनी अधिग्रहण करण्यासाठी प्रांत कार्यालयासह तहसीलदार आणि तलाठी मंडळ अधिकारी कार्यालयातून माहिती मागवण्याची प्रक्रिया जोरात सुरू आहे. विशेष म्हणजे, ज्या जमिनींचे अधिग्रहण करण्यात येत आहे, त्यापैकी अधिकांश जमिनींचे ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयाकडून सुमारे सात वर्षांपूर्वीच अकृषिक (एनए) दाखले देण्यात आलेले आहेत; मात्र आता मूळच्या मार्गात बदल करून हा मुंबई ते बडोदा राष्ट्रीय महामार्ग बदलापूरजवळील चांमटोली गावाच्या हद्दीतील याच एनए जमिनींवरून वळवण्याचा घाट घातल्याचा आरोप शेतकºयांनी केला. अकृषिकच्या (एनए) दाखल्यावरून संबंधित शेतकºयांच्या बेरोजगार मुलांनीकर्ज काढून लग्नाचे हॉल, हॉटेल व अन्य व्यवसाय उभे केले असून, आता त्या जमिनींवर बडोदा राष्ट्रीय मार्गाचे नोटिफिकेशन आल्याच्या चर्चेमुळे शेतकरी व व्यावसायिक चिंतातुर झाले आहेत.

राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या काही अधिकाऱ्यांना हाताशी धरून या मुंबई-बडोदा या राष्ट्रीय महामार्गाचा आधीच्या नियोजनातील मूळमार्ग जाणीवपूर्वक विकासकांच्या भल्यासाठी वळवल्याचा आरोप या शेतकºयांनी केला आहे. विशेष म्हणजे भल्या मोठ्या नैसर्गिक नाल्यातून हा महामार्ग वळवण्यात येत असल्याची चर्चाही शेतकºयांमध्ये आहे. पण, आधीच तत्कालीन ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयातून बदलापूरमधील चांमटोली हद्दीत सर्व्हे नंबर १२/११ मधील भाग ९/४ या जमिनीचा एनए दाखला १३ फेब्रुवारी २०१२ रोजी देण्यात आल्याचे या शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. नोव्हेंबर २०१८ मध्येदेखील रो-हाउससाठी एनए दाखले दिल्याचे त्यांनी निदर्शनास आणून दिले आहे.

व्यवसाय बुडण्याची भीतीआश्चर्य म्हणजे मुंबई-बडोदा राजमार्गासाठी अधिसूचना निघाली असून ज्या शेतकऱ्यांच्या जमिनी राष्ट्रीय महामार्गात बाधित होत आहेत, त्या जमिनींवर तत्कालीन ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयातून अकृषिक दाखले कसे देण्यात आले, असा सवालही या शेतकऱ्यांनी केला आहे.हा अकृषिक परवानगी दाखला मिळाल्याने सुशिक्षित तरुण बाळाराम जाधव याने बँकेतून कर्ज घेऊन लग्नाचा मोठा हॉल बांधला आहे. हॉटेलही उभारले आहे. त्यास अनुसरून इतरांनीही अन्य बांधकामे केली आहेत. परंतु, आता या जमिनींवरून हा राष्ट्रीय महामार्ग वळवल्यामुळे त्यांच्यात तीव्र संताप व्यक्त होत आहे.

... तर नागरी वस्ती जलमय होणारयेथील सर्व्हे नंबर-११ लगत असलेल्या भल्यामोठ्या नाल्याला पावसाळ्यात पूर येतो. या नाल्याच्या पाण्याचे नैसर्गिक स्त्रोत वळवल्यामुळे या परिसरात महाप्रलय होण्याची भीती शेतकºयांनी व्यक्त केली आहे. बाराही महिने वाहत असलेल्या या नाल्याचा उगम सह्याद्री पर्वतातून होतो.

नैसर्गिक स्त्रोत असलेला हा नाला चांगलाच मोठा आहे. परिसरातील कोपरेचीवाडी, चिचेवली, बॅडशीळ, चिकनेचीवाडी, ताडवडी, दहिवली, वराडेभोज या गावांतून तो रेल्वेलाइन ओलांडून उल्हास नदीत विलीन होतो.

भोज धरणातून होणाºया विसर्गाचे पाणी वाहून नेल्यासाठी तो उपयोगात येत आहे. त्याच्यावर हा महामार्ग वळवल्यास पाण्याचे नैसर्गिक विसर्गस्त्रोत बंद होऊन नागरीवस्तीत महापुराचा धोका संभवण्याची शक्यता या शेतकºयांनी वर्तवली आहे. यास वेळीच आळा घालण्यासाठी ते एकवटले असून हा राष्ट्रीय महामार्ग मूळच्या नियोजित मार्गानेच पुढे न्यावा, त्यास अन्यत्र वळवू नये, यासाठी ते उग्र आंदोलनाच्या तयारीत आहेत.

टॅग्स :Mumbaiमुंबईhighwayमहामार्गFarmerशेतकरी