ठाणे, दि. 14 - शहरातील प्रमुख दहीहंडी फोडण्यासाठी मुंबई, ठाण्यातील ३०० हून अधिक गोविंदा पथके ठाण्यात येतात. या पार्श्वभूमीवर शहरातील वाहतुकीच्या मार्गांमध्ये बदल केल्याची माहिती ठाणे शहर वाहतूक नियंत्रण शाखेचे पोलीस उपायुक्त अमित काळे यांनी दिली.दहीहंडीसाठी होणारी गर्दी लक्षात घेता वाहतूककोंडी होऊ नये, म्हणून काही मार्गांमध्ये बदल केले असून काही मार्ग तात्पुरते बंद केले आहेत. पूर्व द्रुतगती महामार्गावरून कोपरी ब्रिज, तीनहातनाका, धर्मवीरनाका, नितीन कंपनीनाका येथून ठाणे शहरात (वंदना डेपो-स्टेशन बाजूस) येणाºया एसटी, टीएमटी, बेस्ट आणि खासगी बसना या नाक्यावरून ठाण्यात येण्यास आणि ठाणे स्टेशनकडून वरील नाक्यामार्गे जाण्यास मनाई केली आहे. त्याऐवजी या बस कॅडबरीनाका-खोपटनाका-आंबेडकर रोडने जी.पी. ओकडे तसेच गोल्डन डाइजनाकामार्गे मीनाताई ठाकरे चौकाकडून जीपीओ नाक्यावरून कोर्टनाका-आंबेडकर पुतळा-जांभळीनाका भाजी मार्केटमार्गे ठाणे स्टेशनकडे जातील.ठाणे स्टेशन सॅटीस ब्रिजवरून टॉवरनाक्याच्या दिशेने जाणा-या सर्व टीएमटी, एसटी बसना सॅटीस ब्रिज येथेच प्रवेश बंद केला आहे. त्याऐवजी या बस ठाणे रेल्वे स्टेशनकडून सॅटीसवरून दादा पाटीलवाडीमार्गे गोखले रोडने टेलिफोननाका-तीनहातनाक्याकडून इच्छित मार्गाकडे जातील. तसेच सर्व गोविंदा पथकांच्या वाहनांना कोपरी ब्रिजनाका, तीनहातनाका, धर्मवीरनाका-नितीन कंपनी, कॅडबरीनाका येथून ठाणे शहरात आणि स्टेशन बाजूला जाणाºया वाहनांना या नाक्यांवर प्रवेश बंद केला आहे. त्याऐवजी पर्यायी मार्ग म्हणून ही सर्व वाहने पूर्व द्रुतगती महामार्गाजवळच्या सेवारस्त्यावर पार्किंग करण्याचे आवाहन केले आहे.नो पार्किंग :* ठाणे महापालिका भवन ते अल्मेडा चौक तसेच महापालिका भवन ते ओपन हाउस-आराधना क्रॉस, ओपन हाउस ते भक्ती मंदिर यादरम्यान रस्त्याच्या दोन्ही बाजूंना सर्व प्रकारची वाहने उभी करण्यास मनाई आहे.* टॉवरनाका-गडकरी रंगायतन-बोटिंग क्लबपर्यंत मासुंदा तलाव रोडच्या दोन्ही बाजूंना सर्व प्रकारची वाहने उभी करण्यास मनाई केली आहे.ही अधिसूचना पोलीस, अग्निशमन दलाची वाहने, रुग्णवाहिका तसेच इतर अत्यावश्यक सेवेच्या वाहनांसाठी लागू राहणार नाही. १५ आॅगस्ट रोजी सकाळी ७ ते रात्री ११ पर्यंत तात्पुरत्या स्वरूपात वाहतूक मार्गात हे बदल राहणार असल्याचे या अधिसूचनेत म्हटले आहे.
दहीहंडीसाठी ठाणे शहरातील वाहतुकीत बदल, पर्यायी मार्गाचा वापर करण्याचे आवाहन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 14, 2017 10:03 PM