शहरं
Join us  
Trending Stories
1
उमेदवारी न मिळाल्याने शिंदे गटाचा आमदार आत्महत्या करण्याच्या विचारात; कुटुंबाचा दावा
2
आई सांगत होती, माझ्या दादाविरोधात फॉर्म भरू नका, पण तरीही...; बारामतीत अजितदादांना अश्रू अनावर!
3
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : सांगलीत महायुतीला धक्का! भाजपा उमेदवाराविरोधात भरला अपक्ष अर्ज,माघार घेणार नसल्याचेही केले जाहीर
4
बोरिवलीच्या उमेदवारीवरून भाजपात नाराजी; माजी खासदार गोपाळ शेट्टी स्पष्टच बोलले
5
Priyanka Gandhi : "जेव्हा मदर तेरेसा माझ्या घरी आल्या..."; प्रियंका गांधींनी सांगितला 'तो' हृदयस्पर्शी क्षण
6
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून चौथी यादी जाहीर; काटोल विधानसभेतून सलील देशमुखांना उमेदवारी
7
शरद पवार गटात बंडखोरी; धनंजय मुंडेंविरोधात 'हा' नेता अपक्ष निवडणूक लढवणार
8
उद्धवसेनेला मोठा धक्का;'औरंगाबाद-मध्य'च्या उमेदवाराची अचानक निवडणुकीतून माघार
9
भाजपाची २५ उमेदवारांची तिसरी यादी जाहीर; बोरिवलीतून विद्यमान आमदारांचा पत्ता कट
10
"जुन्नरमध्ये पुन्हा घड्याळ" राष्ट्रवादीच्या रॅलीत स्टार प्रचारक सयाजी शिंदेंचा उत्साह शिगेला
11
AUS vs IND : किंग कोहलीच्या फॉर्मवर माजी निवडकर्त्यानं मांडल रोखठोक मत
12
नात्याला काळीमा! ८ कोटी न दिल्याने बायकोने काढला नवऱ्याचा काटा; मर्सिडीजने उघड झालं रहस्य
13
लोकसभेचं गणित विधानसभेला जुळत नसल्याने महाविकास आघाडीला ४० जागांवर बसणार फटका?
14
वक्फ बोर्डासाठी आयोजित JPC च्या बैठकीत पुन्हा राडा; विरोधकांचा वॉक आऊट
15
ही दोस्ती तुटायची नाय! पराभवानंतर रोहित टीकाकारांच्या निशाण्यावर; धवननं मात्र मन जिंकलं
16
गौतम गंभीर नाही! वरिष्ठ खेळाडूच भारताच्या पराभवाला जबाबदार; माजी खेळाडूंचे रोखठोक मत
17
J&K: अखनूरमध्ये सैन्याच्या ताफ्यावर हल्ला; चकमकीत 3 दहशतवादी ठार
18
“आमच्या नादी लागू नका, मर्द होता मग पळून कशाला गेला?”; थोरातांचा सुजय विखेंना सवाल
19
बॉलिवूड निर्मात्याच्या लेकाचा बॅक टू बॅक हिट शो! Ranji Trophyत झळकावलं सलग दुसरं द्विशतक
20
"कधी न चालणारा माणूस..."; अमित ठाकरेंच्या दाव्यावर सदा सरवणकरांचा खोचक टोला

कळव्यात राष्ट्रवादीकडून राम नामाचा जयघोष; आव्हाडांना त्यांच्याच पक्षातील पदाधिकाऱ्यांनी दिले आव्हान

By अजित मांडके | Published: January 18, 2024 4:05 PM

...त्यामुळे एक प्रकार त्यांच्याच पक्षातील माजी नगरसेवकांनी आव्हाडांनाच आव्हान दिल्याची चर्चा सुरु झाली आहे.

ठाणे : रामाच्या मुद्यावरुन सध्या राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यावर चांगलीच टिका होत आहे. परंतु दुसरीकडे त्यांच्याच मतदार संघात त्यांच्या पक्षातील काही माजी नगरसेवकांनी राम नामाचा जयघोष करण्याची मोहीम हाती घेतली आहे. या पट्यात एका माजी नगरसेवकाने थेट ८ हजार झेंड्यांचे वाटप केले आहे. तर काहींनी राम मंदिर दिनाच्या निमित्ताने महाआरतीचे आयोजनही केले आहे. त्यामुळे एक प्रकार त्यांच्याच पक्षातील माजी नगरसेवकांनी आव्हाडांनाच आव्हान दिल्याची चर्चा सुरु झाली आहे.संपूर्ण देशभर सध्या राम नामाचा जयघोष केला जात आहे. ठाण्यातही शिवसेना आणि भाजपकडून या निमित्ताने विविध कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. कुठे महाआरती, कुठे प्रवचन, पाठ पुजा आदींसह इतर कार्यक्रमांची रेलचेल सुरु झाली आहे. तर घराघरात राम मंदिराचे निमंत्रण देखील पोहचविले जात आहे. परंतु दुसरीकडे राम हे मासाहारी होते, असे वक्तव्य राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केल्याने एकच वादंग निर्माण झाला आहे. मागील काही दिवसापासून राज्यात यावरुन अनेक आरोप प्रत्यारोप सुरु झाले आहेत. त्यामुळे त्यांच्या पक्षातील इतर नेते देखील काहीसे अडचणीत आल्याचे चित्र आहे.ठाण्याच्या विविध भागात राम मंदिराच्या निमित्ताने कुठे झेंडे तर कुठे निमंत्रण तर कुठे महाआरतीचे आयोजन करण्यात आले आहे. अशातच कळवा भाग मागील काही दिवस काहीसा अल्पीत होता. परंतु आता येथील इमारतीच्या प्रत्येक घरावर चाळीतील घरांवर प्रभु श्री रामाचे झेंड झळकू लागले आहेत. परंतु हे झेंडे भाजप किंवा शिवसेनेकडून दिले गेले नसून जितेंद्र आव्हाड यांच्याच पक्षातील माजी नगरसेवकांनी येथील रहिवाशांना देऊ केले आहेत. एका पदाधिकाºयाने तर आपल्या कार्यालयातच झेंडे उपलब्ध करुन दिले असून ज्यांना हवे असतील त्यांनी ते मोफत घेऊन जावेत असे आवाहन केले आहे. दुसरीकडे आणखी एका माजी नगरसेवकाने या निमित्ताने महाआरतीचे आयोजन केले आहे. त्याचा व्हिडीओ देखील सोशल मिडियावर प्रसारीत केला आहे.भाजपला संधीच दिली नाहीएकीकडे शहरभर भाजप आणि शिवसेनेकडून झेंडे वाटप आणि इतर कार्यक्रम हाती घेण्यात आले आहेत. त्यानंतर भाजपचा मोर्चा कळवा भागात होता. परंतु राष्ट्रवादीच्या माजी पदाधिकाºयांनी त्यांना ही संधीच दिली नसल्याचीही चर्चा आता होत आहे.राष्ट्रवादीकडून अशा प्रकारे झेंडे वाटप करण्यात आल्याने काहींना आर्श्चय वाटले असेल. परंतु प्रभु श्री राम हे जसे प्रत्येकाच्या मनात आहेत, तसेच ते या दिवसाच्या निमित्ताने प्रत्येकाच्या घरात दिसावे या उद्देशाने झेंडे वाटप करण्यात आले आहेत. तसेच विविध कार्यक्रमांचे देखील आयोजन करण्यात आले आहे.मंदार केणी - माजी अध्यक्ष, राष्ट्रवादी युवक कॉंग्रेस, ठाणे शहर

 

टॅग्स :NCPराष्ट्रवादी काँग्रेसJitendra Awhadजितेंद्र आव्हाडRam Mandirराम मंदिर