भिवंडी : भिवंडीत चरस व गांजाची विक्री मोठ्या प्रमाणात होत असल्याने चरस व गांजा तस्करांच्या मुसक्या आवळण्यासाठी भिवंडी पोलीस यंत्रणा दक्ष झाली असून भिवंडी पोलिसांनी केलेल्या दोन कारवाईत चार लाख ६० हजार रुपयांचा चरस व गांजा जप्त करत दोघांना अटक केली असल्याची माहिती भिवंडी पोलीस उपायुक्त नवनाथ ढवळे यांनी मंगळवारी सायंकाळी पोलीस संकुल येथे आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत दिली आहे.
शांतीनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या अमन हॉटेल परिसरात एक इसम गांजा घेऊन येणार असल्याची खबर शांतीनगर पोलिसांना मिळतात पोलिसांनी सदर ठिकाणी सापळा रचून संशयित इसम हुनू कुमार वीराना मिस्त्री वय २९ वर्ष रा. गायत्री नगर यास ताब्यात घेतले असता त्याच्याकडे पाच किलो शंभर ग्रॅम वजनाचा एक लाख तीन हजार रुपये किमतीचा प्रतिबंधित गांजा व रोख रक्कम तसेच मोबाईल असे एकूण एक लाख दोन हजार ९४० रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे.
तर दुसऱ्या घटनेत शांतीनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत भादवड येथून संशयीत इसमास सापळा लावुन शफीक मिरासाहेब शेख, वय २६, रा. भिवंडी यास ताब्यात घेतले असता त्याच्याकडून ३५७ ग्रॅम वजनाचा ३ लाख ५७ हजार रुपये किमतीचा चरस शांतीनगर पोलिसांनी जप्त केला असल्याची माहिती उपयुक्त नवनाथ ढवळे यांनी दिली असून हि कारवाई शांतीनगर पोलीस ठाणेचे वरिष्ठ पोलीस निरिक्षक शंकर इंदलकर,पोलीस निरीक्षक निलेश बडाख,पोलीस निरीक्षक विक्रम मोहीते,सपोनि शैलेंद्र म्हात्रे,पोउनि निलेश जाधव, पोउपनिरी भोलासो शेळके,पो.हवा महेश चौधरी, पोहवा चौधरी, सैयद,पो.ना श्रीकांत पाटील, पोना किरण जाधव, पोना सायखिंडीकर, पो.शि रविंद्र पाटील, पो. शि नरसिंह क्षीरसागर, पोशि मुके यांनी केली असल्याची माहिती उपायुक्त ढवळे यांनी दिली आहे.