ठाणे : माहिती अधिकाराचा दुरुपयोग करणाऱ्या माहिती अधिकार (आरटीआय) कार्यकर्त्यांचे अटकसत्र ठाण्यात सुरू झाले आहे. माजी नगरसेवक सुधीर बर्गे याला शुक्रवारी अटक केल्यानंतर त्याच्याकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी सोमवारी प्रदीप पाटील याला अटक केली. या प्रकरणात अटक केलेला प्रदीप पाटील हा चौथा आरटीआय कार्यकर्ता आहे.सुधीर बर्गे, अश्रफ मुलानी आणि इराकी या तिघांना ठाण्याच्या खंडणीविरोधी पथकाने अटक केली होती. माहिती अधिकाराचा वापर खंडणी उकळण्यासाठी केल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. हिरानंदानी बिल्डर्सने अनधिकृ त बांधकाम केल्याचा आणि जागा हडपल्याचा अर्ज माहिती अधिकारात देऊन बर्गे याने ५० लाखांची मागणी केली. मुंब्य्रातील शौकत मुलानी आणि अरीफ इराकी यांनाही पोलिसांनी अशाच प्रकरणात अटक केली होती. सोमवारी या आरोपींमध्ये प्रदीप पाटीलची भर पडली. त्याने माहिती अधिकारातून मिळवलेल्या माहितीच्या आधारे काही जनहित याचिका दाखल केल्या आहेत. त्यानंतर, त्याने कंत्राटदारांना धमकावून खंडणी उकळल्याची पोलिसांची माहिती आहे. यासंदर्भात ठोस माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी त्याला बेड्या ठोकल्या. प्रदीप पाटील हा कुणासाठी तरी काम करत असावा, अशी पोलिसांची माहिती आहे. त्याच्या बोलवत्या धनीची माहिती काढली जाईल, असा दावा पोलिसांनी केला.तक्रारदारांची धावमाहिती अधिकाराचा दुरुपयोग करणाºया आरटीआय कार्यकर्त्यांची यादी महापालिकेने खंडणीविरोधी पथकास दिली होती. आरटीआय कार्यकर्त्यांविरोधातील कारवाईसाठी पोलीस या यादीचाही आधार घेत आहेत. पोलिसांकडून कारवाई सुरू असल्याचे वृत्त पसरल्यानंतर खंडणीविरोधी पथकाकडे अनेक तक्रारदार धाव घेत आहेत. आरटीआयमुळे त्रासलेल्या डोंबिवलीतील तक्रारदारांनी सोमवारी खंडणीविरोधी पथकाच्या अधिकाºयांची भेट घेतली.प्रदीप पाटील याच्याविरोधात ठोस माहिती मिळाल्यानंतर त्याला बेड्या ठोकण्यात आल्या. या प्रकरणाशी संबंधित महत्त्वाचे मुद्दे सध्या तपासले जात आहेत. यातून येणाºया माहितीच्या आधारे अन्य आरोपींना अटक केली जाईल. आरोपींची संख्या वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही.- राजकुमार कोथमिरे,पोलीस निरीक्षक,खंडणीविरोधी पथक, ठाणे
आरटीआय कार्यकर्त्यास ठोकल्या बेड्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 30, 2018 12:30 AM