शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्याचे नवे मुख्यमंत्री कोण? सस्पेन्स अजून कायम; १ किंवा २ डिसेंबरला शपथविधी होणार
2
निवडून येतात तेव्हा गपगार, पराभवानंतर EVM ला दाेष; काेर्टाने याचिकाकर्त्यांना फटकारलं
3
कुजबुज! एका छताखाली कोणता झेंडा हाती?; पराभूत उमेदवार आता देवदर्शन करणार
4
प्रत्येक निवडणुकीनंतर EVM विरोधात घोंघावणारे हे वादळ कायमस्वरूपी शमविण्याची गरज
5
...तर महाराष्ट्रात खळबळ उडेल; उद्धव - राज यांनी एकत्र येण्याला आणखी कुठला मुहूर्त हवा?
6
गुजरात ते मुंबई प्रवासात हत्येचा थरार?; तीन वर्षांनी हत्येचा गुन्हा, तपास सुरू
7
...तोपर्यंत कांजूर डम्पिंग बंद करणे अशक्य; मुंबई महापालिका पर्यायी जागेच्या शोधात
8
पश्चिम रेल्वेवर वाढणार एसी लोकलच्या १३ फेऱ्या; वातानुकूलित फेऱ्यांची संख्या ९६ वरून १०९
9
इन्फ्लुएंझामुळे मुंबईकर ‘आजारी’, राज्यात ५७ रुग्णांचा मृत्यू; काय आहेत लक्षणे?
10
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
11
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
12
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
13
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
14
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
15
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
16
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
17
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
18
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
19
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
20
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले

कामापूर्वीच दिले बिल, आशीष दामले यांचा आरोप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 30, 2017 6:47 AM

बदलापूरमधील भुयारी गटार योजनेचे काम पूर्ण झालेले नसतानाही कंत्राटदाराला २७ कोटी ९० लाखांचे बिल दिल्याचा प्रकार समोर आला आहे.

बदलापूर : बदलापूरमधील भुयारी गटार योजनेचे काम पूर्ण झालेले नसतानाही कंत्राटदाराला २७ कोटी ९० लाखांचे बिल दिल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी राष्ट्रवादीचे गटनेते कॅप्टन आशीष दामले यांनी नगरविकास राज्यमंत्र्यांकडे तक्रार केली होती. या तक्रारीची दखल घेत सरकारने या भुयारी गटार योजनेच्या कामाचा सविस्तर अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत. या भुयारी गटार योजनेच्या झालेल्या कामाचा सविस्तर अहवाल आयआयटीकडून करण्यात आला होता. त्या अहवालातील तरतुदींकडे पालिकेने दुर्लक्ष करून हे बिल दिल्याचा आरोप दामले यांनी केला आहे.कुळगाव-बदलापूर नगर परिषदेच्या भुयारी गटार योजनेचे काम २०१० मध्ये मंजूर केले होते. १५० कोटींची ही योजना पूर्ण करत असताना त्या योजनेवर तब्बल २२५ कोटी खर्च करण्यात आले. एवढा मोठा खर्च होऊनही प्रत्यक्षात मात्र या योजनेचे काम अद्यापही अपूर्णच आहे. योजनेचा खर्च वाढत गेला असला, तरी प्रत्यक्षात काम मात्र अपूर्णच ठेवले आहे. अनेक ठिकाणी अद्यापही भुयारी गटारांचे पाइप टाकलेले नाही. या योजनेच्या पूर्णत्वाचा दाखला जून २०१७ मध्ये सरकारने मागवला होता. मात्र, योजनेच्या पूर्णत्वाचा दाखला दिलेला नसतानाही पालिकेने त्या कंत्राटदाराचे बिल देण्याची घाई केलेली आहे. या भुयारी गटार योजनेच्या कामाची तांत्रिक तपासणी आयआयटीकडून करण्यात आली आहे. त्यात त्यांनी काही सूचनाही केल्या आहेत.प्रशासनाचे कंत्राटदाराला झुकते मापतब्बल २७ कोटी ९० लाखांचे बिल देऊन पालिकेने कंत्राटदाराला झुकते माप दिले आहे. भुयारी गटार योजनेचे काम करत असताना कंत्राटदाराने प्रत्येकवेळी कामात विलंब केला आहे. त्या बिलंबाचा आर्थिक लाभही मिळवला आहे.प्रत्येक वेळी पालिकेकडून मुदतवाढ मिळवण्याचा यशस्वी प्रयत्न या कंत्राटदाराने केला आहे. २२५ कोटी खर्च करूनही प्रत्यक्षात भुयारी गटार योजनेतून प्रकल्पावर पाणीच जात नसल्याचे समोर आले आहे.या योजनेचा लाभ अजूनही नागरिकांना मिळत नसल्याचा आरोप दामले यांनी केला आहे. सरकारने योजना पूर्णत्वाचा दाखला मागवलेला असतानाही या कंत्राटदाराला बिल दिले आहे. योजना पूर्ण झालेली नसताना त्यांना बिल दिलेच कसे, असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.नियमबाह्य पद्धतीने कोट्यवधींची बिले दिली, असा आरोप त्यांनी केला आहे. या प्रकरणाची तक्रार नगरविकास राज्यमंत्री डॉ. रणजित पाटील यांच्याकडे करण्यात आली आहे.योजनेचे काम पूर्ण नसतानाही कंत्राटदाराला मोठी रक्कम देणे चुकीचे आहे. कंत्राटदाराकडून काम पूर्ण करून घेण्याची गरज होती. ते न करता बिलाची घाई प्रशासनाने केली. कंत्राटदाराला संरक्षण देण्याचे काम पालिका प्रशासन करत आहे.- कॅप्टन आशीष दामले, गटनेतेभुयारी गटार योजनेची कोणतीच चौकशी लावण्यात आलेली नाही. कामाचा अहवाल सरकारने मागवला असून तो अहवाल आम्ही सरकारकडे पाठवला आहे. तसेच कंत्राटदाराला त्याचे बिल नियमानुसार देण्यात आले आहे.- प्रकाश बोरसे, मुख्याधिकारी

टॅग्स :thaneठाणे