डोंबिवली - डोंबिवली शहराची ख्याती ही वेगवेगळे अभिनव उपक्रम राबवण्यातसाठी म्हणून नेहमीच ओळखली जाते. अश्याच एक अनोख्या खाद्य उत्सवाचे आयोजन डोंबिवलीतील युवा पुरस्कृत संस्था 'रोट्रॅक्ट क्लब ऑफ डोंबिवली मिडटाऊन युथ' यांनी केले आहे. आणि यावेळी मेजवानी आहे ती विविध प्रकारच्या चटण्या, लोणची, पापड, मसाले, फराळी पदार्थ यासर्वांनी परिपूर्ण अश्या 'चटणी महोत्सव'ची, जो डोंबिवलीत प्रथमच होत आहे.
आपल्या जेवणाच्या ताटातली डावी बाजू हिचे अस्तित्व म्हणजे अन्नातील मिठाप्रमाणेच, हे नसेल तर बाकी जेवणाचा आस्वाद नीट घेता येत नाही. २ व 3 जून या 2 दिवसांच्या कालावधीत चालणाऱ्या उत्सवात 70 हुन विविध प्रकारच्या चटण्या, पापड, लोणची, यांचे स्टॉल व त्याचबरोबर उन्हाळ्यातील पन्हे व कैरीचे सर्वांचे लाडके पदार्थ 15 हुन अधिक स्टॉल्स च्या स्वरूपात उत्सवात सहभागी आहेत. हा उत्सव सर्वेश हॉल येथे सायंकाळी 5 ते रात्री 10 या वेळेत सर्वांसाठी खुला आहे.
"लहानपणी आम्ही उन्हाळी सुट्टीत मिटक्या मारीत फस्त करत असलेले लोणचं, चटणी सारखे पदार्थ अजूनही आम्ही त्याच आवडीने खातो! तरुण पिढीने असा उपक्रम राबणे याने आपल्या पारंपरिक खाद्य संस्कृतीला आजही आमची असलेली पसंती आणि त्याद्वारे जनरेशन गॅप कमी करण्याचा आमचा प्रामाणिक प्रयत्न आहे!", असे मनोगत क्लबचे अध्यक्ष श्रीजय कानिटकर, माजी अध्यक्ष हर्षल तांबट, प्रकल्प प्रमुख यश जावकर यांनी व्यक्त केले.