शहरं
Join us  
Trending Stories
1
दिलीप वळसे, मुश्रीफांना पाडण्याचे शरद पवारांचे आवाहन; अजितदादांवर म्हणाले, "तिथं काय बोलणार..."
2
भाजपानं घोषित केलेली 'भावांतर योजना' गेमचेंजर ठरणार?; शेतकर्‍यांची चिंता मिटणार
3
भाजपच्या किती जागा येणार? जयंत पाटलांनी सांगितला आकडा; केली मोठी भविष्यवाणी!
4
त्यांना बॅगा, खोके पुरत नाहीत, कंटेनर लागतो; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर हल्ला
5
धारावीची जमीन अदानींना द्यायची होती म्हणून सरकार चोरले; राहुल गांधींचा भाजपवर आरोप
6
'मिस्टर इंडिया'तील ही क्युट टीना आठवतेय का? आता तिला ओळखणं झालंय कठीण
7
महाराष्ट्राचे बेस्ट मुख्यमंत्री कोण? अजित पवारांनी घेतले या नेत्याचे नाव, म्हणाले...'युती-आघाडीच्या युगात...'
8
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :वाईतील सभेत शरद पवारांना अचानक एक चिठ्ठी आली,पवारांनी वाचूनच दाखवली, म्हणाले,...
9
वडील घरी न आल्याने अमेरिकेतील मुलांनी आयफोनने अहमदाबादचं लोकेशन केलं ट्रॅक अन्...
10
प्रियांका गांधी यांच्याकडून भरसभेत बाळासाहेब ठाकरे यांचा उल्लेख; PM मोदी, अमित शाह यांना मोठं आव्हान
11
काँग्रेसमध्ये बंडखोरी, पण अजित पवारांच्या मंत्र्यासाठी निवडणूक किती कठीण?
12
Lawrence Bishnoi : सलमान ते श्रद्धा वालकरचा मारेकरी आफताबपर्यंत...; लॉरेन्स बिश्नोईच्या हिटलिस्टमध्ये कोण आहे?
13
"केम छो वरली, जिलेबी फाफडा उद्धव ठाकरे आपडा तुम्ही बोलायचं अन्..."
14
टीम इंडियाला मोठा धक्का; दुखापतीमुळं Shubman Gill पहिल्या कसोटीतून 'आउट'?
15
दोन मित्रांमध्ये प्रतिष्ठेची लढत; राजकीय आखाड्यात कोणता पैलवान मारणार बाजी? 
16
मौलाना सज्जाद नोमानींनी जारी केली यादी; मुंबईतील ३६ जागांवर कुणाला दिला पाठिंबा?
17
बंडखोर उमेदवारांमुळे मतविभाजनाची भीती; भाजप, ठाकरेंच्या शिवसेनेसमोर आव्हान
18
आगीचा भडका, किंकाळ्या, चेंगराचेंगरी, पालकांचा आक्रोश...; मन हेलावून टाकणारा Video
19
पुन्हा बाबा झाल्याचा आनंद! रोहित शर्मानं पत्नी रितिकाला टॅग करत शेअर केला खास फोटो
20
वाढत्या महागाईत व्हिलेन बनताहेत भाज्या; टोमॅटो, कांदा, बटाट्याच्या वाढत्या किंमतींनी बिघडवलं किचनचं बजेट

चातुर्मास म्हणजे श्रवण, चिंतन आणि ध्यानाद्वारे स्वतःला जाणून घेण्याची अनोखी संधी- राज्यपाल रमेश बैस

By सुरेश लोखंडे | Published: August 26, 2023 8:35 PM

ठाणे नंदनवन येथे तेरा पंथ प्रोफेशनल फोरमच्या १६ वे राष्ट्रीय अधिवेशन पार पडले.

ठाणे: आचार्य श्री महाश्रमणजी यांनी त्यांच्या चातुर्मासासाठी महाराष्ट्राची निवड केल्याबद्दल मी विशेषतः त्यांचे आभार मानतो. चातुर्मास म्हणजे श्रवण, चिंतन आणि ध्यानाद्वारे स्वतःला जाणून घेण्याची, स्वतःची जाणीव करण्याची अनोखी संधी आहे. आचार्य महाश्रमणजी आज आपल्यामध्ये आहेत,  यासाठी आपण सर्व भाग्यवान आहोत. हे एका धार्मिक संस्थेचे आचार्य असूनही त्यांचे विचार उदारमतवादी आणि धर्मनिरपेक्ष आहेत. त्यांनी जनतेचे प्रबोधन करण्यासाठी तीन देश आणि २३ राज्यांचा पायी प्रवास केला आहे, असे राज्यपाल रमेश बैस यांनी शनिवारी ठाणे येथील तेरा पंथ प्रोफेशनल फोरमच्या १६ व्या राष्ट्रीय अधिवेशनामध्ये स्पष्ट केले.

ठाणे नंदनवन येथे तेरा पंथ प्रोफेशनल फोरमच्या १६ वे राष्ट्रीय अधिवेशन पार पडले. त्यास खास उपस्थिती राहून राज्यपाल यांनी कौतुकोद्गार काडले. ते पुढे म्हणाले की, कोरोना महामारीच्या काळात जैन समाजाने आपल्या दानधर्माने देशातील लाखो लोकांना मदत केली. तेरा पंथ प्रोफेशनल फोरम या संस्थेचे शिक्षण, वैद्यकीय आणि अध्यात्मिक क्षेत्रातील कार्य आदर्शवत आहे,असेही राज्यपाल यांनी यावेळी सांगितले. यावेळी ठाणे जिल्हाधिकारी अशोक शिनगारे, मिरा-भाईंदर आयुक्त  संजय काटकर,‌‌आचार्य श्री  महाश्रमणजी, साध्वी प्रमुखा श्री विश्रुत विभाजी, मुनिवर महावीर कुमारजी, साध्वी वरिया संबुद्ध यशाजी, संस्थेचे राष्ट्रीय अध्यक्ष पंकज ओस्तवाल, तेरापंथ व्यावसायिक मंच मुख्य विश्वस्त चंद्रेश बाफना, गजराज पगारिया, सुशील अग्रवाल, व्यावसायिक नेते, सनदी लेखापाल, कंपनी सेक्रेटरी, व्यापारी, उद्योजक, आदी यावेळी उपस्थित होते.

राज्यपाल पुढे म्हणाले की, ही संस्था  'अहिंसा यात्रे'च्या माध्यमातून व्यसनमुक्ती, नैतिकता आणि सद्भावना यांना प्रेरणा देते, जे एक अद्वितीय राष्ट्रीय काम आहे. संस्थेच्या कष्टाला, तपश्चर्येला माझा सलाम आहे, असे सांगून ते पुढे म्हणाले, चांगले शिक्षण, चांगला व्यवसाय आणि यश मिळाल्यावर लोक धार्मिक कार्याकडे पाठ फिरवतात, असे सर्वसाधारणपणे दिसून येते. त्यांना वाटते, मी आयुष्यात जे काही मिळवले आहे, ते मी माझ्या बळावर मिळवले आहे. मात्र तसे नसून आयुष्यात कर्माला अध्यात्माचीही जोड महत्वाची आहे, असे प्रतिपादन ही राज्यपाल यांनी यावेळी केले. या कार्यक्रमासाठी इतक्या मोठ्या संख्येने तरुण व्यावसायिकांना उपस्थित असल्याचे पाहून व आचार्य महाश्रमणजींच्या पवित्र उपस्थितीत हा परिसंवाद आयोजित केल्याबद्दल राज्यपाल बैस यांनी 'तेरा पंथ व्यावसायिक मंच' चे विशेष कौतुक केले.

यावेळी बोलताना राज्यपाल म्हणाले, भगवान महावीरांच्या अध्यात्मिक शिकवणीचे पालन करून आचार्य तुलसी यांनी अनुव्रत चळवळीच्या झेंड्याखाली स्त्री अत्याचार, हुंडा प्रथा, विधवांचा छळ, अस्पृश्यता आणि महिलांचा बुरखा यांसारख्या सामाजिक वाईट गोष्टींविरुद्ध आवाज उठवला.व्यसनमुक्तीसाठी त्यांनी सामाजिक मोहीम सुरू केली. आचार्यजींच्या प्रेरणेने हजारो लोक यात सहभागी झाले आहेत. व्यसनमुक्ती यशस्वी झाली आहे, असे ही त्यांनी यावेळी आवर्जून सांगितले. राज्यपाल पुढे म्हणाले, भारत देश म्हणजे समृद्ध संस्कृती, तत्वज्ञान आणि अध्यात्म असलेली एक महान सभ्यता आहे. महाराष्ट्र ही थोर संतांची भूमी आहे. आपल्या देशातील ज्ञानदानाच्या महान परंपरेत भगवान महावीरांना महत्त्वाचे स्थान आहे. अहिंसा, अनेकांत आणि अपरिग्रह या आध्यात्मिक शिकवणींद्वारे लोकांची आध्यात्मिक उन्नती हे त्यांचे ध्येय होते. आपण सर्वांनी लहान संकल्पांच्या माध्यमातून स्वयंविकास, सामाजिक विकास आणि राष्ट्र विकासात योगदान देणे आवश्यक आहे, असे आवाहनही  करून राज्यपालांनी यावेळी केले.

महोदय पुढे म्हणाले की, आपले सर्व धर्मग्रंथ आणि पुराण आपल्याला सांगतात, मानवी जीवन ही आपल्याला ईश्वराची सर्वोत्तम देणगी आहे. फक्त एक माणूस बनून तुम्ही इतरांना, गरीब, असहाय आणि गरजू, असहाय आणि उपेक्षितांना मदत करू शकता. जमिनीवर पडलेल्या लोकांना मदत करू शकतो. आपण अनेकदा पाहतो की, झाडावरच्या मांज्यात पक्षी अडकला की, त्याच्याभोवती जमलेले अनेक पक्षी जोरजोरात ओरडू लागतात. अडकलेल्या पक्ष्याला सापळ्यातून सोडवण्याची क्षमता यापैकी कोणाकडेही नाही. पण एक सामान्य माणूस आपल्या समंजसपणाने आणि क्षमतेने झाडावर अडकलेल्या पक्ष्याची तात्काळ सुटका करतो. दुसऱ्यांना मदत करा, हे करण्याची क्षमता देवाने फक्त मानवालाच दिली आहे.

ते पुढे म्हणाले, एक यशस्वी व्यावसायिक असल्याने, तुमच्यापैकी प्रत्येकाकडे आपल्या ग्रामीण गरीब, आदिवासी,  अपंग, अनाथ आणि तुरुंगातील कैदी, बेबंद लोकांना मदत करण्याची शक्ती आणि क्षमता आहे. तुमच्यात असलेली करुणा जागृत करण्याची गरज आहे. आचार्य महाप्रज्ञा जी यांच्या सल्ल्याने सुरू झालेल्या आचार्य महाप्रज्ञा ज्ञान केंद्राद्वारे आयएएस कोचिंग आणि बोर्डिंगची सुविधा उपलब्ध करून दिली जात आहे, हे जाणून आनंद झाला असल्याचे सांगून राज्यपाल श्री. बैस यांनी सर्व समुदायातील विद्यार्थ्यांच्या फायद्यासाठी इतरही शहरे आणि गावांमध्ये अशी केंद्रे उघडण्याचा विचार करावा, असे सूचित केले.  

 

टॅग्स :thaneठाणेRamesh Baisरमेश बैस