शहरं
Join us  
Trending Stories
1
लक्ष्मण हाकेंचीही पंकजा मुंडेंना साथ; दसरा मेळाव्याला हजर राहण्याची घोषणा करत म्हणाले...
2
एअर इंडियाच्या विमानात तांत्रिक बिघाड, दोन तास प्रवाशांचा जीव टांगणीला, अखेर सुरक्षित लँडिंग
3
न्यूझीलंड विरुद्धच्या कसोटीसाठी टीम इंडियाची घोषणा; बुमराहला पुन्हा उप कॅप्टन्सीचा मान
4
MPSC विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी; 'या' दोन परीक्षांबाबत आयोगाने घेतला महत्त्वपूर्ण निर्णय!
5
राजेगटाचं अखेर ठरलं! संजीवराजेंच्या नेतृत्वात तुतारी हाती घेणार; रामराजे नक्की काय करणार?
6
अभिनेते सयाजी शिंदे यांचा अजित पवारांच्या राष्ट्रवादीत पक्षप्रवेश, मिळाली मोठी जबाबदारी
7
"माझं केवळ त्याच्या पेन्शनवर प्रेम होतं’’, लव्ह ट्रँगलमधून ३५ वर्षाच्या प्रेयसीने वृद्धाची केली हत्या
8
१२० मिनिटांचा थरार, समोर होता मृत्यू, पण वैमानिकानं दाखवलं प्रसंगावधान, असं उतरवलं विमान 
9
ऑस्ट्रेलियाविरूद्ध कसोटी मालिकेला रोहित शर्मा मुकणार? कर्णधार, सलामीवीरासाठी 'ही' नावं चर्चेत
10
महिलांसाठी दिलासादायक बातमी: 'लाडकी बहीण'साठी अर्ज करण्याची मुदत वाढवली, 'ही' असेल शेवटची तारीख!
11
तू ही जरियाँ.. तू ही मंजिल है...! 'अ‍ॅनिमल' फेम तृप्ती डिमरीच्या फोटोंची सोशल मीडियावर चर्चा
12
पोटच्या मुलाला भेटण्यासाठी धडपडणाऱ्या आईची तिच्या पतीनेच भररत्यात गळा चिरून केली हत्या 
13
क्रिकेटच्या खेळातील ४ महत्त्वाच्या नियमांमध्ये बदल! नव्या हंगामापासून लागू होणार नवे नियम
14
बोपदेव घाट बलात्कार प्रकरण: पोलिसांनी आतापर्यंत किती आरोपींना अटक केलीये?
15
"उभे राहणार का", सयाजी शिंदेंना निवडणुकीबद्दल प्रश्न; अजित पवारांनी दिलं भारी उत्तर
16
७६०० कोटींच्या ड्रग्ज प्रकरणी ईडीची कारवाई, दिल्ली-मुंबईत छापेमारी, गुन्हा दाखल
17
"...म्हणून मी मंत्रिमंडळ बैठकीतून तडकाफडकी निघालो?", अजित पवार यांनी केलं स्पष्ट 
18
भारतीय जवानांचा जीव धोक्यात, इस्रायलच्या 'या' निर्णयावर भारताने व्यक्त केली चिंता; जाणून घ्या काय आहे धोका
19
सैनी सरकारचा १५ ऑक्टोबरला शपथविधी, PM मोदींसह भाजप शासित राज्यांचे मुख्यमंत्री उपस्थित राहणार!
20
नोएडातील एमिटी युनिव्हर्सिटी परिसरात दोन गटांमध्ये गोळीबार, एक विद्यार्थी जखमी

मंत्रालयात नोकरीच्या आमिषाने फसवणूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 09, 2019 12:07 AM

भाऊबहिणीला गंडा : आठ लाख उकळले

ठाणे : मंत्रालयात नोकरी लावण्याचे आमिष दाखवून ठाणे महापालिका परिवहनसेवेतील (टीएमटी) कंत्राटी वाहक व त्याच्या बहिणीची आठ लाखांची फसवणूक केल्याची घटना नोव्हेंबर २०१८ ते जानेवारी २०१९ दरम्यान घडली आहे. याप्रकरणी दिनेश पवार व पत्नी हेमा (रा. कल्याण पूर्व) या दाम्पत्यासह विद्या पवार (रा. मुलुंड चेकनाका) हिच्याविरोधात फसवणुकीचा व दमदाटी केल्याचा गुन्हा श्रीनगर पोलीस ठाण्यात दाखल झाला आहे.

ठाण्यातील किसननगर नं.३ येथे राहणारे सुहास रसाळ हे टीएमटीमध्ये कंत्राटी वाहक आहेत. रसाळ यांचे वडील बेस्टमधून निवृत्त झाले आहेत. त्यांच्या वडिलांचे सहकारी राजेंद्र पवार (रा. मुलुंड चेकनाका) हे बेस्ट कामगार आहेत. पवार यांची पत्नी विद्या (४२) या एके दिवशी रसाळ यांच्या ठाण्यातील घरी आल्या. त्यांनी आपला कल्याण येथील पुतण्या दिनेश पवार याची मंत्रालयात ओळख असून तो पैसे घेऊन सरकारी नोकरी लावतो, असे सांगितल्याने त्यावर विश्वास ठेवला. त्यानुसार, नोकरीसाठी लागणाऱ्या कागदपत्रांच्या झेरॉक्स प्रतींसह सुरुवातीला एक लाख रु पये दिले. त्यानंतर अधिकाऱ्यांना रक्कम देण्याच्या नावाखाली कधी रोख तर, धनादेश व इतर विविध प्रकारे पत्नी हेमा व मित्र मंडळींकरवी साडेपाच लाख उकळले. तसेच बहीण श्रद्धा हिला मुलुंड तहसीलदार कार्यालयात नोकरी लावण्यासाठी एक लाख ६० रुपये हजार दिले. याचदरम्यान, विद्या पवार यांनीही आपला मुलगा शुभम याच्या नोकरीसाठी एक लाख २० हजार रु पये रसाळ यांच्याकडून उसनवार घेऊन आपल्या पुतण्याला दिले.‘ते’ पत्र बोगस दरम्यान, डिसेंबर २०१८ मध्ये दिनेश याने मंत्रालय, प्रशासन विभागाचे पत्र रसाळ याच्या मोबाइलवर व्हॉट्सअ‍ॅपवर पाठवले. परंतु, तीन महिने उलटूनही कुणालाही नोकरी लागली नाही. त्यामुळे व्हॉट्सअ‍ॅपवर पाठवलेल्या पत्राची पडताळणी केली असता ते पत्र बनावट असल्याचे उघडकीस आले. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात रक्कम परत मिळावी, यासाठी तगादा लावला असता पवार हा उडवाउडवीची उत्तरे देऊ लागला. तसेच, दमदाटी करून पोलिसात गेल्यास एक दमडीही परत मिळणार नसल्याचेही त्यांना सांगितले.

टॅग्स :Mantralayaमंत्रालयthaneठाणे