लोकमत न्यूज नेटवर्कठाणे : नवीन सदनिका देण्याच्या नावाखाली व्हीआरपी चॅरिटेबल ट्रस्टच्या पदाधिकारी मेधा गवारे आणि विक्रम सपाटे यांनी, वर्तकनगर येथील असलम मसलत यांची तीन लाख ९५ हजारांची फसवणूक केली. या प्रकरणी वर्तकनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.गवारे यांना ठाणे महापालिकेने जुन्या रहिवाशांच्या बायोमेट्रिक सर्वेक्षणाचे काम दिले होते. कोणतेही आर्थिक व्यवहार करण्याचे अधिकार दिलेले नसताना, त्यांनी वर्तकनगरच्या भीमनगर भागातील असलम यांच्या घराचे सर्वेक्षण करताना, ठाणे महापालिकेने राबविलेल्या शासकीय योजनेतून त्यांच्या कच्च्या घराऐवजी नवीन पक्के घर मिळवून देऊ, अशी बतावणी केली. त्यासाठी त्यांच्याकडून २००८ ते २०१० या कालावधीत ३ लाख ९५ हजारांची रक्कमही घेतली. त्यानंतर, त्यांना ठाणे महापालिकेचा लोगो असलेली आणि त्यावर ठाणे महापालिका गृहसर्वेक्षण प्रश्नावली असा मजकूर असलेली बनावट पावती देऊन, त्यांची फसवणूक केली.
नवीन सदनिकेच्या नावाखाली फसवणूक
By admin | Published: July 03, 2017 4:50 AM