ठाणे/मुंब्रा : अल्प दराने सोनेविक्रीचे आमिष दाखवून अंधेरीतील एका व्यापाऱ्याची सुमारे सात लाखांची फसवणूक करणाऱ्या हमजा नाखुदा (रा. कौसा), प्रदीप राठोड (रा. कळवा) आणि विश्वनाथ पेडणेकर (रा. विटावा) या तिघांना शीळ-डायघर पोलिसांनी अवघ्या काही तासांत अटक केली. त्यांना ठाणे न्यायालयाने दोन दिवसांची पोलीस कोठडी दिली आहे.अंधेरीतील रिनो नायर आणि हमजा यांची वाहन खरेदीविक्रीच्या व्यवसायातून दीड वर्षापूर्वी एकमेकांची ओळख झाली. वाहन खरेदीऐवजी मालमत्ताविक्रीचा व्यवसाय सुरू करण्याचा त्यांचा बेत होता. त्याच वेळी आपला आणखी एक मित्र राठोड याचा झवेरी बाजारात सोनेचांदीच्या दागिन्यांचे दुकान असून ते विकून त्याला गावी जायचे आहे. त्यामुळे बाजारभावापेक्षा अल्प दरात म्हणजे तीन हजार रुपये कमी दराने सोने विकण्याचे आमिष हमजाने नायरला दाखवले. सुरुवातीला तो १०० ग्रॅम सोने घेऊन आला. त्या वेळी नायरकडे पैसेही नव्हते. नंतर, ३ मार्च रोजी दुपारी ३ वा. मुंब्रा-पनवेल रोडवरील हॉटेल विसावा येथे नातेवाईकांकडून जमा केलेले सात लाख रुपये घेऊन नायर आला. त्या वेळी त्याला सात लाखांच्या बदल्यात ३०० ग्रॅम सोने देण्यात येईल, असे हमजाने सांगितले. नायरकडे सात लाख रुपये असले तरी प्रत्यक्षात आपण एक किलो सोने आणल्याचे हमजाने सांगितले. पुरेशी रक्कम नसली तरी सर्वच्या सर्व एक किलो सोने घेऊन जा आणि उर्वरित ७०० ग्रॅम सोन्याचे पैसे नंतर दे, असे नायरला सांगितले. एकाच वेळी सोन्याची इतकी बिस्किटे पाहून नायरचे डोळे दिपले. त्यामुळे त्याने पैसे नसतानाही सर्व सोने बरोबर नेण्याची तयारी दाखवली. नायरकडील सात लाख मिळाल्यावर ही इतकी मोठी रक्कम आमचा एक माणूस घेऊन पुढे जाईल, असे हमजाने त्याला सांगितले.
सोनेविक्रीचे आमिष दाखवून फसवणूक
By admin | Published: March 21, 2016 1:30 AM