सदानंद नाईक, उल्हासनगरहे महानगर व्हायरल फिव्हरने फणफणले असून प्रत्येक घरात या तापाचा रूग्ण आहे. सुभाष टेकडीवरील महात्मा फुले कॉलनीतील २३ वर्षीय तरूणाचा डेग्यूने मृत्यू झाल्या नंतरपालिका आरोग्य विभागाने साफसफाई अभियाना जोरात सुरू केले आहे.उल्हासनगरातील मध्यवर्ती, शासकिय प्रसूतीगृह, रूग्णालयासह शहरातील खाजगी रूग्णालये व दवाखान्यात व्हायरल फिव्हरच्या रुग्णांत वाढ झाली आहे. दवाखान्यात प्रचंड गर्दी असून बहुतांश रुग्ण हे व्हायरल फिव्हरचे असल्याची माहिती डॉ विजय वासनिक यांनी दिली आहे. बालरोग तज्ज्ञ डॉ चंद्रकांत साळवे यांनीही लहान मुले व्हायरल तापाने फणफणल्याची माहिती दिली आहे. दीड महिन्याच्या पावसाळयात १७०० पेक्षा जास्त रुग्ण व्हायरल फिव्हरचे आढळले असून डेंग्यूचे २७ , मलेरियाचे ५६ तर स्वाईन फ्ल्यूच्या ८ रूग्णांची नोंद पालिकेच्या दफ्तरी झाली आहे. व्हायरल फिव्हरसह विविध तापाच्या रुग्णांच्या संख्येत वाढ झाल्याने महापौर अपेक्षा पाटील यांनी तातडीची बैठक बोलावून उपाययोजना करण्याचे आदेश आरोग्य विभागाला दिले. यावेळी आयुक्त मनोहर हिरे यांनी जंतुनाशके,किटकनाशके, मलेरिया आॅईल आदीच्या खरेदीला हिरवा कंदील दिला आहे. मध्यवर्ती पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरिक्षक अभय सायगावकर, नगरसेवक राजेंद्रसिंग भुल्लर यांचे भाऊ पिंकी यांच्यावर डेंग्यूचे उपचार सुरू आहेत. तर प्रत्येक घरात एकाला व्हायरल फिव्हरने पछाडले आहे. त्यामुळे चिंतेचे वातावरण आहे.
उल्हासनगरला व्हायरलचा विळखा
By admin | Published: August 30, 2015 11:29 PM