भिवंडी : भिवंडी शहरातून वाड्या कडे जाणऱ्या नदी नाका परीसरातील भारतरत्न डॉ ए पी जे अब्दुल कलाम उड्डाणपुला लगत बनविण्यात आलेले डिव्हायडर हे अपघातास कारणीभूत ठरत आहे. याच डिव्हायडरचा अंदाज न आल्याने वाड्याकडे जाणाऱ्या टँकर उलटल्याने झालेल्या अपघातात सहा वाहनांचे नुकसान झाले आहे.
हा टँकर वाशी येथून घातक केमिकल घेऊन वाड्याच्या दिशेने उड्डाण पुला वरून ओरियंटल कंपनीत घेऊन जात असताना सकाळी या डिव्हायडर चा अंदाज न आल्याने टँकर डिव्हायडर वर चढल्याने जागेवरच उलटला.या टँकर खाली पाच दुचाकी एक रिक्षा दबल्याने त्यांचे नुकसान झाले.सकाळची वेळ असल्याने रहदारी व वर्दळ कमी असल्याने सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही.
पालिका हद्दीत असलेल्या भारतरत्न डॉ ए पी जे अब्दुल कलाम उड्डाणपुल नदीनाका दिशेने जेथे उतरतो त्या ठिकाणीच रस्ता दुभाजक आहे त्याचा कोणताही फायदा वाहनांसाठी होत नसतात तो तसाच ठेवण्यात आला आहे.एवढेच नव्हे तर त्या ठिकाणी कोणतेही रिफ्लेक्टर लावले नसल्याने या डिव्हायडर ला धडकून अनेक अपघात होत असल्याने तो काढून टाकावा अशी मागणी नागरीकांकडून होत असतानाही पालिका प्रशासन अजून कोणतीही कारवाई करीत नसल्याने नागरीकांमधून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत.