ठाणे: देशात आणि राज्यात सर्रासपणे बेकायदेशीररित्या इंटरनेट फॉर्मसी माध्यमातून ऑनलाइन औषध विक्री व ई पोर्टलबाबत शासनाच्या सकारात्मक असलेल्या भूमिकेविरोधात शुक्रवारी (28 सप्टेंबर) ठाणे जिल्ह्यातील 3 हजार मेडिकल दुकानदारांनी सहभाग नोंदवला आहे. अखिल भारतीय औषधी विक्रेते संघटनेने पुकारलेल्या बंदमध्ये स्वतःची दुकाने बंद ठेवून त्यांनी समर्थन दिले आहे. दरम्यान, नागरिकांची गैरसोय होऊ नये म्हणून रुग्णालयातील मेडिकल सुरु ठेवण्याचा निर्णय संघटनेने घेतला आहे. तसेच गुरुवारी रात्री 12 वाजल्यापासुन सुरु झालेला मेडिकल दुकानदारांचा बंद शुक्रवारी रात्री 12 वाजेपर्यंत सुरु राहणार आहे. तर शासनाच्या या भूमिकेविरोधात सलग पाच दिवस यापूर्वी मेडिकल दुकानदारांनी काळ्या फिती बांधून निषेध नोंदवला असल्याची माहिती ठाणे जिल्हा मेडिकल असोसिएशनचे ठाणे शहराध्यक्ष संजय धनावडे यांनी दिली.
औषध विक्रेत्यांचा देशव्यापी संप, ठाण्यातील 3 हजार दुकानदार संपात सहभागी
By ऑनलाइन लोकमत | Published: September 28, 2018 11:06 AM