शहरं
Join us  
Trending Stories
1
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजित पवार गटाविरोधात सभा
2
आता महाराष्ट्राला महिला मुख्यमंत्री मिळालेली पाहण्याची माझी इच्छा; शरद पवारांचे पुण्यात मोठे वक्तव्य
3
देवेंद्र फडणवीसांची भर पावसात सभा; म्हणाले- "पावसात सभा घेतली की सीट निवडून येतेच..!"
4
पाकिस्तानला मोठा धक्का! चॅम्पियन्स ट्रॉफी घेऊन PoKमध्ये जायचं नाही, ICCने PCBला ठणकावलं!
5
देव तारी त्याला कोण मारी! चालत्या ट्रेनमधून पडलेल्या प्रवाशाचा आरपीएफ जवानाने वाचवला जीव
6
Raj Thackeray: राज ठाकरे भाषण न करताच भिवंडीतून परतले; प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
7
ट्रम्प विजयाबरोबरच सोन्याचे 'अच्छे दिन' संपले, दिसून आली 3 वर्षातील सर्वात मोठी घसरण! आता खरेदी करायला हवं की नको?
8
'चूक झाली, यापुढे इकडे-तिकडे जाणार नाही', सीएम नितीश कुमारांचा पीएम मोदींना शब्द
9
शशांक केतकर आणि मृणाल दुसानिस तब्बल ४ वर्षांनंतर पुन्हा एकत्र, त्यांची गाजलेली ही मालिका पुन्हा भेटीला
10
Maharashtra Election 2024: राहुल गांधींच्या महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी तीन घोषणा!
11
जाना था जापान, पहुंच गए चीन...! पंकजा मुंडेंसोबत असेच घडले, हेलिकॉप्टर सिडकोऐवजी सायखेड्याला पोहोचले
12
दोन 'गुलाब'रावांच्या हायव्होल्टेज लढतीत विजयाचा 'गुलाल' कोण उडवणार?
13
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्लेनमध्ये तांत्रिक बिघाड, देवघर एअरपोर्टवर थांबलं विमान
14
हाय हाय मिर्ची, उफ़ उफ़ मिर्ची... चहल वहिनींचा वेगळाच तोरा, पाहा धनश्रीचे 'सुपरहॉट' Photos
15
तंत्रज्ञानाची कमाल! WhatsApp चं चॅटिंग मजेशीर करणाऱ्या 'या' सीक्रेट ट्रिक्स माहितीहेत का?
16
पाकिस्तानात शी जिनपिंग यांना चीनी सैन्य का करायचे आहेत तैनात?; भारतासाठी चिंताजनक
17
हिंगोलीत निवडणूक अधिकाऱ्यांकडून अमित शाहांच्या बॅगांची तपासणी;म्हणाले, "लोकशाहीसाठी आपण..."
18
Maharashtra Election 2024: महायुतीतील मैत्रीपूर्ण लढतीच्या साठमारीत अपक्ष करणार का 'विक्रम'?
19
अब्दुल सत्तारांच्या पराभवासाठी सिल्लोडमध्ये उद्धव ठाकरेंची भाजपला साद
20
Ajay Gupta : कल्पकतेला सॅल्यूट! व्हीलचेअरवर असतानाही मानली नाही हार; उभं केलं १०० कोटींचं साम्राज्य

मुख्यमंत्र्यांमुळे भाजपा तोंडघशी, नगरविकास खात्याचा निर्णय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 07, 2018 3:11 AM

तीनहातनाका येथील न्यू वंदना सोसायटीच्या २०० कोटींच्या टीडीआर घोटाळ्यातून मुख्यमंत्र्यांच्या अखत्यारित असलेल्या नगरविकास विभागाने ठामपाला क्लीन चिट दिल्याने ठाण्यातील भाजपाचे नेते तोंडघशी पडले आहेत.

ठाणे : तीनहातनाका येथील न्यू वंदना सोसायटीच्या २०० कोटींच्या टीडीआर घोटाळ्यातून मुख्यमंत्र्यांच्या अखत्यारित असलेल्या नगरविकास विभागाने ठामपाला क्लीन चिट दिल्याने ठाण्यातील भाजपाचे नेते तोंडघशी पडले आहेत. या विकास प्रस्तावांच्या मंजुरीची प्रक्रिया सरकारची सुधारित टीडीआर नियमावली येण्यापूर्वी सुरू झाली होती. त्यामुळे नवे टीडीआर धोरण या ठिकाणी लागू नसल्याचे सांगून जुन्या धोरणानुसार या भूखंड क्षेत्रफळाच्या १.४० पट टीडीआर अनुज्ञेय असल्याचे स्पष्टीकरण नगरविकास विभागाने केले आहे. याबाबत, भाजपा पदाधिकाऱ्याने पालिका प्रशासनावर हा आरोप केला होता. मात्र, नगरविकासच्या स्पष्टीकरणाने त्यांच्या आरोपातील हवा निघाली असून भाजपा तोंडघशी पडली आहे.न्यू वंदना सोसायटीबाबत बेकायदा पद्धतीने शहर विकास विभागाने टीडीआर देऊन २०० कोटींचा टीडीआर घोटाळा केल्याचा आरोप भाजपाचे संजय घाडीगावकर यांनी केला होता. या सोसायटीला सुधारित टीडीआर नियमावलीनुसार म्हणजेच सर्व्हिस रोडच्या रुंदीनुसारच (०.६५ पट) देणे अपेक्षित होते. मात्र, पालिकेने तसे न करता १.४० पट टीडीआर दिल्याने विकासकाला ५५ हजार चौरस फूट अतिरिक्त बांधकामाची परवानगी दिल्याचा आरोप त्यांनी केला होता. त्यांचा हा दावा फुसका ठरला आहे.विकास हस्तांतरणीय हक्काबाबत शासनाने २९ जानेवारी २०१६ व २ मे २०१६ रोजीच्या अधिसूचनेतील तरतुदीनुसार रस्त्याच्या रुंदीप्रमाणे टीडीआर अनुज्ञेय केलेले आहे. तसेच प्रस्तावांतर्गतचा भूखंड हा सेवारस्ता व पूर्व द्रुतगती महामार्ग यांना लागून असल्याने रस्त्याची एकूण रुंदी विचारात घेऊन या प्रस्तावांतर्गत २३ डिसेंबर २०१६ रोजीच्या तत्त्वत: मान्यतेनुसार २८ फेबु्रवारी २०१७ रोजी बांधकाम आराखडे मंजूर करण्यात आले. त्यानुसार, या प्रस्तावांतर्गत पोटेन्शिअल टीडीआर केवळ मंजूर नकाशामध्ये दर्शवलेला असल्याचे यापूर्वीच ठाणे महापालिकेने स्पष्ट केले होते. त्यानंतर, सरकारने आपल्या टीडीआर धोरणात २९ डिसेंबर २०१६ रोजी बदल केले. त्या बदलानुसार हायवेलगत सर्व्हिस रोडची रु ंदी ग्राह्य धरून टीडीआर द्यावा, असे स्पष्ट केले होते. दरम्यान, यासंदर्भात पालिकेने राज्य सरकारकडून मार्गदर्शनही मागवले होते. त्यानुसार, नगरविकास विभागाने याबाबत नुकतेच पालिकेला लेखी उत्तर दिले आहे. वंदना सोसायटी ११ डिसेंबर २००३ रोजी धोकादायक घोषित झाली आहे. त्यानंतर तेथील रहिवाशांनी विकासकाशी पुनर्विकासाचा करारनामा २७ जून २०१६ रोजी केला. ३० जून, २०१६ रोजी विकास प्रस्ताव पालिकेच्या मंजुरीसाठी दाखल केला. त्यावेळी नगरविकास विभागाने तत्कालीन टीडीआर धोरणानुसार १.४० पट टीडीआर अनुज्ञेय असल्याची बाब नमूद केली आहे. त्याशिवाय एमआयटीएस आरक्षणाने बाधित क्षेत्राचा टीडीआर (४०७.०४ चौ. मी) तसेच अतिरिक्त चटईक्षेत्र निर्देशांक (१२५७.३८ चौ. मी.) असे अतिरिक्त बांधकाम दर्शवून विकास प्रस्तावाला २३ जानेवारी, २०१६ रोजी पालिका आयुक्तांनी तत्त्वत: मंजुरी दिली आहे. तर, २८ फेब्रुवारी, २०१७ रोजी बांधकामे आराखडे मंजूर करण्यात आले होते.>नवीन निकष लागू नाहीया विकास प्रस्तावाच्या मंजुरीची प्रक्रि या २९ जानेवारी २०१६ रोजीच्या सुधारीत टीडीआर नियमावलीपूर्वी झालेली आहे. त्यामुळे तेथे नवीन निकष लागू होणार नसल्याचे नगरविकास विभागाने लेखी उत्तरात कळविले आहे. त्यामुळे पालिकेवर केलेला २०० कोटींच्या टीडीआर घोटाळ्याचा आरोप फुसका निघाला आहे.>आम्ही जी भूमिका यापूर्वी स्पष्ट केली होती, त्याच भूमिकेला शासनाने पुष्टी दिली आहे.- संजीव जयस्वाल, आयुक्त ठामपा

टॅग्स :BJPभाजपा