ठाणे : मुख्यमंत्रीएकनाथ शिंदे यांनी आपल्या ठाणे येथील निवासस्थानी धुळवडीचा सण माेठ्या उत्साहात साजरा केला. नातू रुद्रांक्षकडून रंग लावून घेत त्यांनी या सणाचा आनंद द्विगुणित केला. धूलिवंदनानिमित्ताने ठाण्यातील शुभदीप या निवासस्थानी मुख्यमंत्री शिंदे यांनी आपले कुटुंबीय तसेच सुरक्षेसाठी तैनात असलेल्या पोलिसांसाेबत हा सण साजरा केला.
राज्यातील जनतेला नैसर्गिक रंगांचा वापर करून तसेच पर्यावरणपूरक होळी साजरी करण्याचे आवाहन करून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यातील जनतेला होळी आणि धूलिवंदनाच्या शुभेच्छा दिल्या. मुख्यमंत्री शिंदे यांच्या कुटुंबाची सुरक्षा पाहणारे पोलिस, सर्व कर्मचारी आणि कार्यकर्त्यांसोबत रंग खेळत त्यांना गोडाचे पदार्थ खाऊ घातले. जनतेचा मुख्यमंत्री हा जनतेत मिसळून धुळवड साजरी करत असल्याचे पाहून पोलिसांनीही त्यांना रंग लावून घेतला. यावेळी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, पत्नी लता शिंदे, वडील संभाजी शिंदे आणि सर्व पोलिस बांधवांसह बंगल्यातील कर्मचारी उपस्थित होते.