ठाणे : राज्यातील उपलब्ध पाणी, त्याचा विनीयोग, करण्यासह आगामी उन्हाळ्यात राज्यात ठिकठिकाणी उद्भवणाऱ्या पाणी समस्या , त्यावर संभाव्य उपाययोजनांच्या संकल्पनांवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह प्रधानसचिव आणि संबंधीत मंत्रालयीन अधिकारी यांच्याशी मंत्रालयात पाणी फाऊंडेशनचे संस्थापक अभिनेता आमीर खान चर्चा केली. यावेळी ठाण्यासह राज्यातील सर्व जिल्ह्यांचे जिल्हाधिकारी देखील या बैठकीत व्हीडीओ कॉन्स्फरसद्वारे सहभागी झाले. राज्यात मागील वर्षी जलशिवार व जलसंधारणची कामे मोठ्याप्रमाणात झाले आहेत. जुन्या धरणातील गाळ काढून त्यांची पाणी साठवण क्षमता वाढवण्यामध्ये राज्य शासनाला चांगले यश मिळाले आहे. शासनाच्या पाण्या संबंधातील योजना लोकचळवळ म्हणून राज्यात राबवण्यात आल्या. ठाणे जिल्ह्यात या चळवळीत नागरीक मोठ्यासंख्येने सहभागी होऊन पाणी समस्येवर मात केली आहे. मुंबईला पाणी पुरवठा करणारा ठाणे जिल्हा पाणी टंचाईने ग्रासलेले असताना जलशिवारच्या लोकचळवळीने त्यावर बऱ्यापैकी मात करणे शक्य झाले. भाजीपाल्यासारख्या रब्बी पिकांसह गुरांसाठी उन्हाळ्यातील काही महिने राणावणात पाणी उपलब्ध झाले. ग्रामीण आदिवासी, दुर्गमभागातील पाणी समस्या दूर करण्यासाठी आणि शहरातील उपलब्ध पाणी वाचवण्यासाठी आवश्यक उपाययोजना सुचवून लोकांमध्ये त्या रूजवण्यासाठी आमीर खान यांच्यासह त्यांच्या फाऊंडेशनचे काम वाखण्याजोगे आहे. देशभरात कार्यकर्त्यांचे जाळे असलेल्या या फाऊंडेशनच्या आजवरच्या अनुभवातून राज्यात आणखी काही करणे शक्य करण्यासाठी या बैठकीतून नक्कीच चांगले फलित होण्याचा अपेक्षा जलसंधारणात व जलशिवारसाठी काम करणाऱ्या कार्यकर्त्यांमध्ये व्यक्त केली जात आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अभिनेता आमीर खान यांच्यात रंगली पाण्यासंदर्भात चर्चा !
By ऑनलाइन लोकमत | Published: November 22, 2017 3:53 PM