ठाणे - गद्दारी ही एकाने केली तर समजू शकतो परंतु अनेक लोक येत आहेत, आता ते का येत असतील हे आरोप करणाऱ्यांनी बघावे असा टोला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांना लगावला. निवडणूक आयोगात कायद्याने निर्णय घेतले जातात, पंरंतु ज्यांच्याकडे मेजोरीटी नाही ते लोक असे बोलत असतात अशी टीकाही त्यांनी केली.
शनिवारी ठाणे येथील एका हॉटेलमध्ये पूणे आणि ठाणे ग्रामीण मधील अनेकांनी बाळासाहेबांच्या शिवसेनेत प्रवेश केला. यात उद्धव ठाकरे गटातील माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या शेकडो पदाधिकारी यांनी शिंदे यांच्या गटात प्रवेश केला. तसेच ठाणे ग्रामीण मधील मुरबाड मधील १७० सरपंच पैकी पैकी ७० टक्के सरपंच या ठिकाणी सामील झाले आहे. दिवसभरात पूणे जिल्ह्यामधले ठाणे जिल्हा पालघर जिल्हा मोठ्या प्रमाणावर आणि वेगवेगळ्या तालुक्यातून निवडून आलेले सदस्य पदाधिकारी यांनी बाळासाहेबांच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे, मी त्यांना मनापासून शुभेच्छा देतो असे शिंदे यांनी सांगितले. गेल्या तीन चार महिन्यापासून प्रवेशाची प्रक्रिया सातत्याने सुरु आहे.
सरकारने लोकहिताचे घेतलेलं निर्णय, हे लोक पाहून विविध जिल्ह्यातून सहभाग वाढत असल्याचे ते म्हणाले. यात समाधानाची गोष्ट म्हणजे कुठल्याही पक्षातून जाताना विकास करण्याची क्षमता असते त्याच ठिकाणी लोक जात असतात असंही ते म्हणाले. जे पदाधिकारी आपल्या बाळासाहेब शिवेनेत येणार आहे त्यांची हकालपट्टी केली जात आहे. २३ तारखेला बाळासाहेब यांची जयंती आहे त्या दिवशी मोठा उत्साह आहे, विधान भवनाच्या प्रमुख सभागृहात बाळासाहेब यांचे तैल चित्र लावण्यात येणार असल्याचे ते म्हणाले.