शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025: ७२ खेळाडूंना मिळाला खरेदीदार, ४६७ कोटींची उलाढाल! कोणता खेळाडू कुठल्या संघात? पाहा यादी
2
IPL Auction 2025: डेव्हिड वॉर्नर ते पियुष चावला... 'हे' खेळाडू राहिले UNSOLD! सर्वच संघांनी फिरवली पाठ
3
IPL Auction 2025: पहिल्या दिवसात ७२ खेळाडूंची विक्री, पाहा कोण ठरले Top 10 महागडे शिलेदार
4
TATA IPL Auction 2025 Live: ७२ खेळाडूंचं 'शॉपिंग'; ४६७.९५ कोटींची बोली... पहिल्या दिवशी भारतीय खेळाडूंचा बोलबाला
5
"प्रिय बंधु-भगिनींनो... सप्रेम नमस्कार..."! देवेंद्र फडणवीस यांचं जनतेला पत्र; सांगितले विजयाचे 4 'खरे शिल्पकार'
6
IPL Auction 2025 : RR च्या नाकावर टिच्चून MI नं खेळला मोठा डाव; ६२ धावांच्या 'त्या' इनिंगमुळे हा खेळाडू रात्रीत 'करोडपती'
7
IPL Auction 2025: तब्बल ५ तासांनी Mumbai Indians ने विकत घेतला पहिला खेळाडू, १२.५० कोटींना कोण आलं संघात?
8
'ज्यांनी मला त्रास दिला ते सगळे साफ झाले', अशोक चव्हाणांची थोरात-देशमुखांवर बोचरी टीका
9
IPL Auction 2025: मुंबई इंडियन्सने सोडलेला जोफ्रा आर्चर अखेर राजस्थान रॉयल्समध्ये गेला, किती मिळाली किंमत?
10
शिवसेना मुख्यमंत्री पदावर अडीच वर्षासाठी दावा करणार? केसरकर स्पष्टच बोलले...!
11
'तरुण नेतृत्व उभारणार, घरी बसणार नाही', पराभवानंतर शरद पवार नव्या जोमाने कामाला लागले
12
"सर्वेक्षण करा, जी ज्याची जागा असेल त्याला देऊन टाका..."; संभल जामा मशीद प्रकरणावर काय म्हणाले राकेश टिकैत?
13
IPL Auction 2025 : MI नं दिला नाही भाव; Ishan Kishan साठी काव्या मारन यांनी लावली एवढ्या कोटींची बोली
14
IPL Auction 2025 : बिग सरप्राइज! SRK च्या KKR नं रिलीज केलेल्या खेळाडूसाठी मोजली मोठी किंमत, अनेकांच्या भुवया उंचावणारी बोली
15
IPL Auction 2025: 'अनुभवी' अश्विनसाठी दोन जुने संघ भिडले, अखेर CSK ने RR ला दिली मात, कितीला विकत घेतलं?
16
IPL Auction 2025: Gujarat Titans ची शांतीत क्रांती! ३ मॅचविनर खेळाडूंना 'गपचूप' घेतलं ताफ्यात, पाहा कोण?
17
"योगी आदित्यनाथांच्या 'त्या' घोषणेमुळे...";'बटेंगे तो कटेंगे'वर शरद पवारांचे महत्त्वाचे विधान
18
"...त्यामुळे महिलांनी आमच्या विरोधात मतदान केलं"; निकालानंतर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया
19
IPL 2025 Auction : १८ कोटींच पॅकेज नाकरणाऱ्या KL Rahul साठी DC नं किती कोटी मोजले ?

Eknath Shinde : मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा 30 जुलैला ठाणेकरांकडून नागरी जनसत्कार; गौरवग्रंथाचेही होणार प्रकाशन

By ऑनलाइन लोकमत | Published: July 19, 2022 4:25 PM

Eknath Shinde : डॉ. काशिनाथ घाणेकर येथे संपन्न होणाऱ्या या जनसत्कार सोहळ्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रकट मुलाखतीचे आयोजन करण्यात आले असून यावेळी त्यांच्यावरील गौरवग्रंथाचेही प्रकाशन होणार आहे.

ठाणे : आधुनिक महाराष्ट्राच्या इतिहासात प्रथमच ठाण्याला लोकनेते एकनाथ शिंदे यांच्या रूपात मुख्यमंत्रीपदाचा बहुमान मिळाला आहे. यानिमित्ताने ठाण्यातील विविध क्षेत्रांमध्ये कार्यरत असणाऱ्या सेवाभावी संस्थांच्या तर्फे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा 30 जुलै रोजी नागरी जनसत्कार करण्यात येणार आहे. डॉ. काशिनाथ घाणेकर येथे संपन्न होणाऱ्या या जनसत्कार सोहळ्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रकट मुलाखतीचे आयोजन करण्यात आले असून यावेळी त्यांच्यावरील गौरवग्रंथाचेही प्रकाशन होणार आहे. मंगळवारी, 19 जुलै रोजी मराठी ग्रंथसंग्रहालयात झालेल्या पत्रकार परिषदेत ‘मुख्यमंत्री जनगौरव समिती’कडून ही माहिती देण्यात आली. यावेळी जनगौरव समितीचे अध्यक्ष विलास ठुसे, कार्याध्यक्ष प्रा. डॉ. प्रदीप ढवळ, उपाध्यक्ष मीरा कोरडे, श्रीकांत वाड, सल्लागार डॉ. जालिंदर भोर आणि विद्याधर ठाणेकर हे उपस्थित होते.

ठाण्यातील कला, क्रीडा, शैक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक, साहित्यिक, वैद्यकीय, औद्योगिक आदी विविध क्षेत्रांतील तब्बल 165 संस्थांकडून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा जाहीर नागरी जनसत्कार करण्यात येणार आहे. ठाण्यातील डॉ. काशिनाथ घाणेकर नाट्यगृहात 30 जुलै रोजी सायंकाळी 7 वाजता हा सोहळा आयोजित करण्यात आला आहे. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रकट मुलाखतही घेतली जाणार असून त्यांच्यावरील गौरवग्रंथही प्रकाशित होणार आहे. ‘मुख्यमंत्री जनगौरव समिती’तर्फे आयोजित केलेला हा जनसत्कार सोहळा विविध क्षेत्रांतील ज्येष्ठ मान्यवरांच्या विशेष उपस्थितीत संपन्न होईल. त्याआधी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निवासस्थानापासून कार्यक्रमस्थळापर्यंत मिरवणुकीचेही आयोजन करण्यात येणार असल्याचे, जनगौरव समितीचे कार्याध्यक्ष प्रा. डॉ. प्रदीप ढवळ यांनी सांगितले.

जनगौरव समितीचे अध्यक्ष विलास ठुसे यांनीदेखील यावेळी जनसत्कार सोहळ्यामागील भूमिका विशद केली. एकनाथजी शिंदे यांच्या रूपाने प्रथमच मुख्यमंत्रीपदाचा बहुमान ठाण्याला मिळत आहे. संघर्षातून शिखरापर्यंत झालेली त्यांची वाटचाल सर्वांसाठी प्रेरणादायक आहे. आजवरच्या वाटचालीत ठाण्यातील विविध क्षेत्रांच्या विकासासाठी एकनाथजी शिंदे यांनी भरीव योगदान दिले आहे. या साऱ्याची कृतज्ञता आणि अभिमान व्यक्त करण्यासाठीच ठाण्यातील विविध संस्थांनी एकत्र येत या जनसत्कार सोहळ्याचे आयोजन केले असल्याचे, अध्यक्ष विलास ठुसे यांनी यावेळी सांगितले.

असे आहे जनसत्कार सोहळ्याचे स्वरूप…- यंदा भारतीय स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव संपन्न होत आहे. त्या पार्श्वभूमीवर होणाऱ्या जनसत्कार सोहळ्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची त्यांच्या निवासस्थानापासून कार्यक्रमस्थळापर्यंत मिरवणूक काढण्यात येणार आहे. यात 75 रिक्षा, 75 मोटारसायकल, 75 सायकल आणि ढोल-ताशा पथकांचा समावेश असणार आहे.- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे व्यक्तिमत्त्व आणि आजवरचा प्रवास यांचे दर्शन घडवणारे कवी प्रा. अशोक बागवे लिखित आणि संगीतकार कौशल इनामदार यांनी संगीत दिलेले गौरवगीत यावेळी सादर होणार आहे. ठाण्यातील 75 कलावंत ते सादर करतील.- विविध क्षेत्रांतील ज्येष्ठ मान्यवरांच्या उपस्थितीत मुख्यमंत्र्यांचा नागरी जनसत्कार करण्यात येणार असून यावेळी त्यांची प्रकट मुलाखतही घेतली जाणार आहे.- ठाण्यातील विविध क्षेत्रांतील अभ्यासक, कार्यकर्ते, मान्यवरांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर लिहिलेल्या लेखांचा समावेश असणारा गौरवग्रंथही यावेळी प्रकाशित करण्यात येणार आहे.- पर्यावरणपुरकता जपत पुष्पहार-पुष्पगुच्छ यांऐवजी मुख्यमंत्र्यांना बीजहार देण्यात येणार असून त्यातील बियांची लागवड केली जाणार आहे.- तसेच सहभागी संस्थांनी, व्यक्तींनी शुभेच्छापर पुस्तके भेट देण्याचे आवाहनही जनगौरव समितीकडून करण्यात आले आहे. ही पुस्तके ग्रामीण भागातील शाळा व ग्रंथालयांना भेट दिली जातील.

मुख्यमंत्री गौरवग्रंथासाठी आवाहनगेली जवळपास 30 वर्षे ठाण्याच्या राजकीय-सामाजिक-सांस्कृतिक क्षेत्रात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सक्रीय आहेत. त्यांच्या आजवरच्या या जीवनप्रवासाचे दर्शन घडवणाऱ्या गौरवग्रंथाचे प्रकाशन या जनसत्कार सोहळ्यात करण्यात येणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या व्यक्तिमत्त्वाचे व त्यांच्या नेतृत्वाचे विविध पैलू आणि त्यांचा आजवरचा राजकीय प्रवास यांची ओळख करून देणाऱ्या निवडक लेखांचा समावेश त्यात असेल. त्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा लाभलेला सहवास, त्यांच्या ह्रदयस्पर्शी आठवणी, त्यांच्याकडून झालेली मदत, विविध क्षेत्रांसाठी त्यांनी केलेले महत्त्वाचे कार्य, त्यांचे राजकीय-सामाजिक-सांस्कृतिक योगदान याबद्दलचे लेखन पाठविण्याचे आवाहन गौरवग्रंथ समितीचे प्रमुख विद्याधर ठाणेकर यांनी यावेळी केले. 700 शब्दांतील स्वलिखित लेख आपले नाव व परिचयासह cmjangaurav@gmail.com या ईमेल पत्त्यावर पाठवावे. तसेच अधिक माहितीसाठी 89765 09486 किंवा 90046 74715 या क्रमांकांवर संपर्क साधण्याचे आवाहनही त्यांनी यावेळी केले.

टॅग्स :Eknath Shindeएकनाथ शिंदेthaneठाणे