शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'मी पुढील निवडणूक पाहणार की नाही..."; रोहिणी खडसेंसाठी एकनाथ खडसेंची भावनिक साद
2
दादर-माहीमची निवडणूक अटीतटीची होईल की एकतर्फी? अमित ठाकरे म्हणाले, "मी तुम्हाला..."
3
विधानसभेसाठी सूक्ष्म नियोजन... लोकसभेनंतर वेगळी स्ट्रॅटेजी; भाजप महाराष्ट्रात 'कमबॅक' करणार?
4
विलंबामुळे वाढले टेन्शन, हुकणार होती लग्नाची गाडी; मुंबईवरून निघालेल्या नवरदेवासाठी थांबविली रेल्वे!
5
जळगाव शहर मतदारसंघातील अपक्ष उमेदवाराच्या घरावर गोळीबार 
6
कैलाश गहलोत भाजपात जाणार, रविवारी दिला होता मंत्रिपदासह आपचा राजीनामा
7
संजय निरुपम यांनाच वोट करा! जान्हवीचा व्हिडिओ पाहून चाहत्यांचा संताप, म्हणाले- "किती पैसे मिळाले?"
8
एकावर ४ बोनस शेअर्स देणार 'ही' कंपनी; शेअरमध्ये तुफान तेजी, कोणता आहे हा स्टॉक?
9
Maharashtra Vidhan Sabha 2024: उत्तर महाराष्ट्रात ‘महायुती’चे प्राबल्य कायम राहणार का? 
10
"ती कोणाची तरी पत्नी आहे...", सलमानने ऐश्वर्या-अभिषेकच्या लग्नावर सोडलं होतं मौन
11
PM नरेंद्र मोदी ब्राझीलला पोहोचले, जोरदार स्वागत; जी-२० शिखर परिषदेत सहभागी होणार! 
12
हातात कोयता, भिंतींवर रक्त अन्..; 'सिंघम अगेन'नंतर टायगर श्रॉफच्या Baaghi 4 ची घोषणा, रिलीज डेटही जाहीर
13
तेलंगणा सरकारच्या नोटीसवर दिलजीत दोसांझचं भर कॉन्सर्टमध्येच खरमरीत उत्तर, म्हणाला...
14
जगभर: अमेरिकेत गर्भनिरोधक गोळ्या खरेदीचा सपाटा! विक्री पाहून कंपन्यांचेही डोळे पांढरे
15
Ruturaj Gaikwad वर अन्याय? Devdutt Padikkal नं कशाच्या जोरावर मारली बाजी? जाणून घ्या सविस्तर
16
भाजप सरकारचा मुंबई लुटण्याचा डाव, तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डींचा आरोप 
17
रस्ते फुलले, प्रचंड उत्साह आणि देवाभाऊंचा जयजयकार; नागपुरात देवेंद्र फडणवीसांचं शक्तिप्रदर्शन
18
Zomato Share Price : ५०० पार जाणार Zomato चा शेअर; ब्रोकरेज बुलिश, पाहा काय म्हटलंय कंपनीनं?
19
War 2 मध्ये हृतिक रोशनसोबत थिरकताना दिसणार ही अभिनेत्री? चाहत्यांची उत्सुकता शिगेला
20
कांद्याचे भाव का वाढले, सोयाबीनच्या किमतीचं काय? कृषिमंत्र्यांनी दिलं असं उत्तर 

मुख्यमंत्री शुक्रवारी मीरा-भाईंदरमध्ये, दोन वास्तूंचे उदघाटन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 01, 2018 2:15 AM

मीरा-भार्इंदर महापालिकेने भार्इंदर पूर्वेकडे बांधलेले प्रमोद महाजन सभागृहासह मीरा रोड पूर्वेकडील रामदेव पार्क परिसरातील मीनाताई ठाकरे मार्केट या दोन वास्तूंचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते शुक्रवारी सायंकाळी सात वाजता होणार आहे.

भाईंदर : मीरा-भार्इंदर महापालिकेने भार्इंदर पूर्वेकडे बांधलेले प्रमोद महाजन सभागृहासह मीरा रोड पूर्वेकडील रामदेव पार्क परिसरातील मीनाताई ठाकरे मार्केट या दोन वास्तूंचे उद्घाटन  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते शुक्रवारी सायंकाळी सात वाजता होणार आहे.भार्इंदर पूर्वेकडील इंद्रलोक परिसरात प्रमोद महाजन सभागृह पालिकेने अत्याधुनिक पद्धतीने विकसित केले असून ते दुमजली इमारतीत साकारले आहे. पहिल्या व दुसºया मजल्यावर एकावेळी ५०० जण समाविष्ट होतील असे वातानुकूलित सभागृह असून तळमजल्यावरही सभागृहासाठी जागा राखीव ठेवली आहे.मीरा रोड येथील रामदेव पार्क परिसरात मीनाताई ठाकरे मार्केट साकारले असून त्यात परिसरातील फेरीवाल्यांना प्राधान्यक्रमाने सामावून घेतले जाणार असल्याचे सांगण्यात येत आहे. बाजाराच्या बाहेरील बाजूस एकूण ९ दुकाने तर तळमजल्यावरील आतील भागात एकूण ६३ गाळे भाजी विक्रेत्यांसाठी बांधले आहेत.पालिकेकडुन फेरीवाल्यांना कायमस्वरुपी सामावून घेण्यासाठी ठाकरे मार्केट पहिलेच ठरणार असले तरी त्याचे धोरण अद्याप ठरवलेले नाही. परंतु, मीरा रोडमधील नागरिकांना मंगलकार्यासाठी एकूण पाच सभागृह खाजगी सभागृहांच्या तुलनेत माफक दरात उपलब्ध होणार असल्याचे पालिकेचे कार्यकारी अभियंता दीपक खांबित यांनी सांगितले.

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसMira Bhayander Municipal Corporationमीरा-भाईंदर महापालिका निवडणुक