ठाणे : ठाणे आणि मुलुंडदरम्यान होणारे नवीन ठाणे हे रेल्वेस्थानक लवकरात लवकर मार्गी लागावे, अशी मागणी ठाण्याचे खासदार राजन विचारे यांनी गुरुवारी रात्री मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली. निमित्त ठरले, ते कोकणातील नाणार प्रकल्पावरील बैठकीचे. ही बैठक वर्षा बंगल्यावर झाली. त्यावेळी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेही उपस्थित होते.या भेटीदरम्यान, खासदार विचारे यांनी दिल्ली रेल्वे बोर्ड तसेच मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक यांच्याकडून आवश्यक असलेल्या सर्व परवानग्या ३० मार्च २०१७ रोजी मिळाल्याचे निदर्शनास आणून दिले. तसेच ठाणे महापालिकेकडून स्मार्ट सिटीअंतर्गत २८९ कोटी निधीची तरतूद केलेली आहे. तर, आरोग्य खात्याची १४.८३ एकर जागेपैकी ४.७० एकरवर झालेले झोपड्यांचे अतिक्रमण काढून त्यांच्या पुनर्वसनाची जबाबदारी महपालिकेने उचललेली आहे. अशी एकूण १४.८३ एकर जागा मिळवून घेण्यासाठी आरोग्य खात्याचे प्रधान सचिव प्रदीप व्यास यांच्याकडे असलेला प्रलंबित निर्णय आपल्या स्तरावरून तातडीने घ्यावा, अशी मागणी खासदारांनी मुख्यमंत्र्यांकडे केली. त्याचबरोबर ऐरोली-कळवा एलिव्हेटेड या नवीन रेल्वेमार्गाचे भूमिपूजन डिसेंबर २०१६ मध्ये देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होऊन दोन वर्षे उलटली, तरीसुद्धा कामाला सुरु वात झाली नसल्याची खंतही त्यांनी यावेळी व्यक्त केली. तसेच या मार्गातील बाधित होणाºया झोपड्यांचे पुनर्वसन करण्यासाठी शासकीय आदेश प्राप्त होत नसल्याने त्या कामाला सुरु वात करता येत नसल्याचेही निदर्शनास आणून एमएमआरडीएला पुनर्वसन करण्याचे आदेश तत्काळ द्यावेत, अशी विनंती त्यांनी यावेळी केली.
नवीन ठाणे रेल्वे स्थानकासाठी ठाण्याच्या खासदारांचे मुख्यमंत्र्यांना साकडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 16, 2018 7:20 PM
ठाणे : ठाणे आणि मुलुंडदरम्यान होणारे नवीन ठाणे हे रेल्वेस्थानक लवकरात लवकर मार्गी लागावे, अशी मागणी ठाण्याचे खासदार राजन विचारे यांनी गुरुवारी रात्री मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली. निमित्त ठरले, ते कोकणातील नाणार प्रकल्पावरील बैठकीचे. ही बैठक वर्षा बंगल्यावर झाली. त्यावेळी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेही उपस्थित होते.या भेटीदरम्यान, खासदार विचारे ...
ठळक मुद्दे ऐरोली-कळवा एलिव्हेटेड मार्ग, बाधित झोपड्यांच्या पुनर्वसन आदेशाची प्रतीक्षाकोकणातील नाणार प्रकल्पावरील बैठकी दरम्यान केली मागणी