शहरं
Join us  
Trending Stories
1
नालासोपाऱ्यात कॅश ड्रामा! पैसे वाटपाच्या आरोपांवरून विनोद तावडेंना घेरले; तीन गुन्हे दाखल
2
Maharashtra Assembly elections 2024: कोणत्या मुद्द्यांभोवती फिरली प्रचारचक्रे ? 
3
नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीसाठी आज मतदान; काँग्रेस-भाजपमध्ये लढत 
4
झारखंड : दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला; अंतिम टप्प्याचे आज ३८ जागांवर मतदान
5
ज्यांच्या बळावर मतदान, त्यांचाच हिरावला अधिकार; दोन हजार पोलिसांचे बॅलेटच आले नाहीत
6
विधानसभा निवडणुकीसाठी प्रशासन सज्ज; किती वाजता सुरू होणार मतदान? ‘या’ गोष्टी लक्षात ठेवाच
7
हल्ले, मारहाणीच्या घटनांनी राजकीय वातावरण तापले; प्रचारादरम्यान काय-काय घडलं?
8
३५ हजार पोलिसांचा फौजफाटा मुंबईत सज्ज; चार हजार जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई
9
मुंबईकरांना पहाटेच भाजीपाला पोहोचणार; धान्य, मसाला, फळ मार्केट राहणार बंद
10
वरळीतील १,३३९ मतदारांच्या सोयीसाठी; चक्क उड्डाणपुलाखाली दोन मतदान केंद्रे
11
मतदान शांततेत पार पाडा, जबाबदारी निभावा; पोलिस महासंचालक संजय वर्मा यांचे आवाहन
12
सुप्रिया सुळे, नाना पटोलेंनी बिटकॉइन स्कॅम केला, निवडणुकीत परदेशी चलनाचा वापर; भाजपाचा आरोप
13
डहाणूचा बविआ उमेदवार भाजपात आला, त्याचाच राग ठाकूर पिता-पुत्रांनी काढला? चर्चांना उधाण
14
रोहित पवारांच्या कारखान्यातील अधिकाऱ्याला पैसे वाटताना पकडले; पोलिसात गुन्हा दाखल
15
विनोद तावडेंवर पैसे वाटपाचा आरोप, देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
16
भाई ठाकूर यांचे भाऊ ते बविआ प्रमुख; विरारमधील 'राडा' प्रकरणाने चर्चेत आलेले हितेंद्र ठाकूर कोण?
17
“निवडणुकीत भाजपाचा पराभव झाल्यास त्याचे खापर विनोद तावडेंवर फोडले जाईल”: पृथ्वीराज चव्हाण
18
मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत असल्याने कारस्थान रचलं? विनोद तावडे म्हणाले, "मी तिकडे जाणार हे..."
19
Vinod Tawde: त्या हॉटेलात महिला, कोपऱ्या कोपऱ्यात लपलेल्या; क्षितीज ठाकुरांचे खळबळजनक आरोप
20
Maharashtra Assembly Election 2024 : लोकसभेवेळी धक्का देणारा मराठवाडा भाजपाला देणार साथ? हे मुद्दे ठरू शकतात 'मास्टर स्ट्रोक'

मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्याने पोलिसांची त्रेधा, देवेंद्र फडणवीस यांची केवळ तीन मिनिटांची आदरांजली

By ऑनलाइन लोकमत | Published: December 26, 2018 3:54 AM

भाजपाने माजी पंतप्रधान दिवंगत अटलबिहारी वाजपेयी यांच्या जयंतीनिमित्त आयोजित केलेल्या एका कार्यक्रमाकरिता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अगदी ऐनवेळी ठाण्यात येण्याचा निर्णय घेतल्याने फडणवीस यांच्या सुरक्षेकरिता बंदोबस्त लावताना पोलिसांची धावपळ उडाली.

ठाणे : भाजपाने माजी पंतप्रधान दिवंगत अटलबिहारी वाजपेयी यांच्या जयंतीनिमित्त आयोजित केलेल्या एका कार्यक्रमाकरिता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अगदी ऐनवेळी ठाण्यात येण्याचा निर्णय घेतल्याने फडणवीस यांच्या सुरक्षेकरिता बंदोबस्त लावताना पोलिसांची धावपळ उडाली. मंगळवारी मुख्यमंत्री येत असल्याचा निरोप जेमतेम काही तास अगोदर नियंत्रण कक्षातून पोलिसांना मिळाला. त्यामुळे नाताळचा बंदोबस्त व पोलिसांच्या सुट्यांमुळे अगोदरच कामाच्या ताणाखाली असलेल्या पोलिसांची दमछाक झाली. ज्या कार्यक्रमात मुख्यमंत्री हजर राहिले तेथे त्यांनी वाजपेयी यांना आदरांजली अर्पण करणारे केवळ तीन मिनिटांचे भाषण केले.नौपाडा पोलीस ठाण्याच्या कार्यक्षेत्रात येणाºया शिवसमर्थ मैदानावर भाजपाचे माजी पंतप्रधान स्व. अटलबिहारी वाजपेयी यांच्या जयंतीनिमित्त ‘स्वरवंदना’ आणि ‘अटल ज्येष्ठ सन्मान सोहळा’ या कार्यक्रमाचे मंगळवारी सायंकाळी ६ वा. भाजपाच्या ठाणे शहर शाखेतर्फे जिल्हाध्यक्ष संदीप लेले यांनी आयोजन केले होते. या कार्यक्रमाचा निरोप भाजपा मीडियाच्या व्हॉटसअ‍ॅप ग्रुपवर दुपारी एक वाजता दिला गेला. त्यामध्ये मुख्यमंत्री ठाण्यात येणार असल्याचा उल्लेख नव्हता. परंतु, दीड वाजता दिलेल्या निरोपात ‘मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांचे ठाणे नगरीत हार्दिक स्वागत’ असे पोस्टर संदेशासोबत प्रसृत करण्यात आले. त्यानंतर दुपारी दोन वाजता नौपाडा पोलीस आणि ठाणे नियंत्रण कक्षालाही मुख्यमंत्री नौपाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत सायंकाळी ७ वाजता येत असल्याचा वायरलेस मेसेज आला. हा मेसेज मिळताच ज्यांच्या हद्दीत कार्यक्रम होणार होता त्या नौपाडा पोलिसांबरोबरच ठाण्याच्या वेशीवरील कोपरी तसेच वागळे इस्टेट, ठाणेनगर, राबोडी या सर्वच पोलीस ठाण्यांमधील अधिकाºयांची बंदोबस्त लावताना तारांबळ उडाली. नाताळनिमित्त अनेक अधिकारी व पोलीस यांच्या अगोदरच ड्युट्या लावण्यात आल्या होत्या. शिवाय नाताळ व वर्षअखेर असल्याने काही अधिकारी व कर्मचाºयांनी सुट्या घेतल्याने स्टाफची चणचण होती. गणेशोत्सवाच्या दरम्यान मुख्यमंत्री एका ज्येष्ठ पत्रकाराच्या घरी येणार असल्याचा निरोप असाच ठाणे पोलिसांना रात्री ९ वा. मिळाला व त्यानंतर रात्री १२ वाजता ते ठाण्यात दाखल झाले होते. तो खासगी कार्यक्रम होता. हा सार्वजनिक कार्यक्रम असल्यामुळे मुख्यमंत्री कार्यालयाने तसेच आयोजकांनीही कार्यक्रमाचे नियोजन करणे अपेक्षित असल्याचेही एका अधिकाºयाने खासगीत सांगितले. वेगवेगळ््या जातीय संघटनांकडून दिले जाणारे इशारे, राज्याच्या काही भागातील नक्षलवादी कारवाया तसेच मुंबईवर यापूर्वी झालेले दहशतवादी हल्ले या बाबींचा विचार भाजपाच्या नेत्यांनीही ऐनवेळी मुख्यमंत्र्यांना बोलावताना करायला हवा, असे मत पोलिसांनी खासगीत व्यक्त केले.मंगळवारी सायंकाळी ६.४५ वाजता दाखल झालेले मुख्यमंत्री सायंकाळी ७.३० वा. मुंबईला रवाना झाले आणि पोलिसांनी सुटकेचा नि:श्वास सोडला.दोन ते तीन दिवस आधी पोलिसांना दिला जातो दौºयाचा तपशीलमुख्यमंत्री येणार असल्यास प्रोटोकॉलनुसार किमान एक दिवस आधी संबंधित जिल्हयाच्या पोलीस यंत्रणेला रितसर निरोप देण्याची व्यवस्था केली जाते.हा निरोप नियंत्रण कक्षाकडे किंवा विशेष शाखा सांभाळणाºया उपायुक्त अथवा पोलीस निरीक्षकांकडे येत असतो. कधीकधी तर दोन ते तीन दिवस आधी पोलिसांकडे निरोप येतो.त्यानुसार मुख्यमंत्री ज्या भागातून जाणार त्या भागातील पोलीस ठाण्यांना त्या मार्गावरील बंदोबस्तासाठी दोन तास अगोदर आणि मुख्यमंत्री परत जाईपर्यत तैनात केले जाते. 

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस