शहरं
Join us  
Trending Stories
1
'मी नेहमी संविधानाच्या मर्यादेचा आदर केला...', संविधान दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे भाष्य
2
“अशा निवडणुका पाकिस्तान, अफगाणिस्तानात होत नसतील, आयोग जिवंत आहे का”; संजय राऊत संतापले
3
मनोज जरांगेंचे ठरले; सरकार स्थापन झाल्यावर तारीख जाहीर करणार, पुन्हा बेमुदत उपोषणाला बसणार
4
"दहशतवादी संघटनांना चोख प्रत्युत्तर देणार"; २६/११च्या हल्ल्याच्या वर्षपूर्तीनिमित्त पंतप्रधान मोदींचे आश्वासन
5
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
6
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
7
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
8
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
9
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
10
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
11
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
12
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
13
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले
14
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतील महायुतीच्या विजयानंतर, काँग्रेसची मोठी घोषणा; देशभरात खास मोहीम चालवणार 
15
"तुम्ही जिंकता तेव्हा ईव्हीएम चांगले अन् पराभूत झाले, तर..."; सुप्रीम कोर्टाने पिळले कान
16
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
17
अपघातानंतर पहिल्यांदाच कश्मिरा शाहने शेअर केला Video; नाकाला झालेली दुखापत
18
TV, OTT, AI सगळं एकाच ठिकाणी; टीव्हीसोबतच मिळणार सगळ्याचं 'सबस्क्रिप्शन'
19
Neha Bhasin : "अंधाऱ्या खोलीत बसते, माझं वजन १० किलोने वाढलं"; नेहा भसीन देतेय गंभीर आजाराशी झुंज
20
OLA चा धमाका! लॉन्च केली नवीन EV स्कूटर रेंज; किंमत फक्त ₹39,999 पासून सुरू...

तळोजा एमआयडीसी- बदलापूर पाइपलाइन रस्त्याच्या कामाला मुख्यमंत्र्यांच्या स्वाक्षरीची प्रतिक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 07, 2018 11:57 AM

शीळ-कल्याण आणि शीळ-तळोजा रस्त्याला उत्तम पर्याय असलेल्या तळोजा एमआयडीसी-उसाटणे-बदलापूर पाइपलाइन रस्त्याची झालेली दुरवस्था खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी वारंवार एमएमआरडीएच्या निदर्शनास आणली होती. त्यानूसार एमएमआरडीएने या रस्त्याचे काम करण्यास सकरात्मक प्रतिसाद दिला असून त्या कामाचा अहवाल मंजुरीसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पाठवला आहे.

ठळक मुद्देमुख्यमंत्र्यांच्या मंजुरीसाठी प्रस्ताव सादर  एमएमआरडीए आयुक्तांनी युपीएस मदान यांची खासदार श्रीकांत शिंदेंना माहिती

डोंबिवली : शीळ-कल्याण आणि शीळ-तळोजा रस्त्याला पर्याय असलेल्या तळोजा एमआयडीसी-उसाटणे-बदलापूर पाइपलाइन रस्त्याची झालेली दुरवस्था खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी वारंवार एमएमआरडीएच्या निदर्शनास आणली होती. त्यानूसार एमएमआरडीएने या रस्त्याचे काम करण्यास सकरात्मक प्रतिसाद दिला असून त्या कामाचा अहवाल मंजुरीसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पाठवला आहे. त्यांची मंजुरी मिळताच या कामाला सुरुवात करण्याची ग्वाही एमएमआरडीए आयुक्त यूपीएस मदान यांनी खा. डॉ. शिंदे यांना सोमवारी झालेल्या बैठकीत दिली.त्याचबरोबर शहाड जंक्शन येथील सुमारे ३०० कोटी रुपयांचे कामही एमएमआरडीएच्या माध्यमातून हाती घेण्यात येणार आहे. शीळ-कल्याण आणि शीळ-तळोजा रस्त्यावर अवजड वाहनांची मोठ्या प्रमाणावर वाहतूक होत असल्यामुळे या रस्त्यांवर वारंवार वाहतूक कोंडी होते. बदलापूर पाइपलाइन-उसाटणे-तळोजा एमआयडीसी हा रस्ता शीळ-कल्याण आणि शीळ-तळोजा रस्त्याला चांगला पर्याय असल्यामुळे त्या मागार्चा वापरही मोठ्या प्रमाणावर होतो. मात्र, गेल्या काही काळापासून या रस्त्याची दुर्दशा झाल्यामुळे त्याची दुरुस्ती करण्यासाठी शिंदे पाठपुरावा आहेत. मुख्यमंत्र्यांकडेही त्यांनी पत्राद्वारे मागणी केली होती.या बैठकीत कल्याण-मुरबाड, कल्याण-बदलापूर आणि कल्याण-पुणा लिंक रोड या तीन महत्त्वाच्या रस्त्यांच्या जंक्शनवर (वाय जंक्शन) उड्डाणपुल करण्यासंदर्भातही चर्चा झाली. त्यानुसार कल्याण-डोंबिवली महापालिकेने या उड्डाणपुलासाठी २९० कोटी रुपयांचा सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करून एमएमआरडीएला सादर केला आहे. हा अहवालही लवकरात लवकर मुख्यमंत्र्यांच्या मंजुरीसाठी सादर करण्यात येईल,असे मदान यांनी अश्वस्थ केल्याचे शिंदे म्हणाले. कल्याण-डोंबिवली महापालिका हद्दीतील २७ गावांपैकी १० गावांमध्ये एमएमआरडीएच्या माध्यमातून ग्रोथ सेंटर विकसित करण्यात येत आहे. मात्र, सध्या या गावांमधील रस्त्यांची दुरवस्था झाल्यामुळे या गावांमध्ये तातडीने रस्त्यांची कामे हाती घेण्याची मागणी खा. डॉ. शिंदे यांनी एमएमआरडीएकडे केली होती. त्यानुसार याबाबतच्या प्रस्तावाला एमएमआरडीएने मान्यता दिली असून अंतिम मंजुरीसाठी हा प्रस्तावही मुख्यमंत्र्यांच्या दरबारी असल्याचे सांगण्यात आले.

टॅग्स :mmrdaएमएमआरडीएShrikant Shindeश्रीकांत शिंदेEknath Shindeएकनाथ शिंदे