शहरं
Join us  
Trending Stories
1
"लोकसभेत गुडघ्यावर आणले, आता महायुतीस पाताळात गाडणार"; उद्धव ठाकरेंचा इशारा
2
"मला हलक्यात घेतलं, त्याचे परिणाम आता दिसतायत"; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा राऊतांना इशारा
3
"केंद्र बिंदूच्या बुडाला आग लावायची वेळ आली"; उद्धव ठाकरेंचा ठाण्यातून महायुतीवर घणाघात
4
भविष्यात दोन ठाकरे एकत्र येऊ शकतात का? मनसेसोबत युती होऊ शकते का...? उद्धव ठाकरे म्हणाले...
5
...म्हणून उद्धव ठाकरे यांनी थेट फोनद्वारे घेतली सभा; "नाराज होवू नका एकत्र येवून..."
6
२०१४ ला भाजपाला त्यांची खरी ताकद कळली, अन् त्यानंतर वाढतच गेली!.. जाणून घ्या काय घडलं?
7
"साईबाबांच्या आशीर्वादामुळे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले, अन्यथा..."; दीपक केसरकरांचा पलटवार
8
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'महाराष्ट्रात पैशाच्या जोरावर सरकार चोरले, तुम्ही संविधानाच्या गोष्टी करता'; प्रियांका गांधींचा हल्लाबोल
9
गावाकडे पण, इकडे शहरातपण यादीत नाव ...! राज्यातील दहा मतदारसंघात नवी मुंबईकरांची नावे
10
Champions Trophy Tour: पाकचा डाव फसला! BCCI च्या आक्षेपानंतर ICC नं सेट केला कार्यक्रम
11
मणिपूरमधील जिरीबाममध्ये तीन मृतदेह सापडले, मंत्री आणि आमदारांच्या निवासस्थानाबाहेर गोंधळ; संचारबंदी लागू
12
पाठिंबा दिलेल्या अपक्ष उमेदवाराला वंचितने दिले चाबकाचे फटके, काळेही फासले; असे का घडले...
13
IND vs AUS: टीम इंडियात बदल होणार? संघात या दोघांना मिळू शकते 'वाइल्ड कार्ड' एन्ट्री
14
दिलीप वळसे, मुश्रीफांना पाडण्याचे शरद पवारांचे आवाहन; अजितदादांवर म्हणाले, "तिथं काय बोलणार..."
15
भाजपानं घोषित केलेली 'भावांतर योजना' गेमचेंजर ठरणार?; शेतकर्‍यांची चिंता मिटणार
16
पत्रकार गुलाम आहेत; अमरावतीच्या सभेत राहुल गांधींचं विधान; पत्रकारांनी व्यक्त केला संताप
17
'बंटोगे तो कटोगें'वर कंगना यांचा घुमजाव; आधी म्हणाली, "हा विरोधकांचा मुद्दा" अन् नंतर...
18
भाजपच्या किती जागा येणार? जयंत पाटलांनी सांगितला आकडा; केली मोठी भविष्यवाणी!
19
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : शिराळा विधानसभेत टफ फाईट! सत्यजीत देशमुख की मानसिंगराव नाईक,कोण मारणार बाजी?
20
भारताने ब्रिटनच्या अर्थव्यवस्थेला मागे टाकले! माजी पंतप्रधान लिज ट्रस म्हणाल्या, "पश्चिमात्य देशांची प्रतिष्ठा संकटात"

विकासाच्या घोषणांसाठी मुख्यमंत्र्यांचा २७ ला दौरा

By admin | Published: June 20, 2017 6:33 AM

मीरा-भार्इंदर महापालिका निवडणुकीच्या तोंडावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतलेल्या बैठकीत विकासकामांचा धडाका लावताच त्यावर टीकेची झोड उठली आहे

लोकमत न्यूज नेटवर्कभार्इंदर : मीरा-भार्इंदर महापालिका निवडणुकीच्या तोंडावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतलेल्या बैठकीत विकासकामांचा धडाका लावताच त्यावर टीकेची झोड उठली आहे. तिला उत्तर देण्यासाठी तसेच घोषणा प्रत्यक्षात याव्यात, यासाठी प्रकल्पांचे भूमिपूजन करण्यासाठी मुख्यमंत्री २७ जूनला भार्इंदरमध्ये येणार आहेत. मीरा-भाईंदरचे प्रश्न सोडवण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी आमदार नरेंद्र मेहता, महापौर गीता जैन यांच्या उपस्थितीत मंत्रालयात बैठक घेतली. त्यात मेहता यांच्या सर्व मागण्या मान्य केल्या. त्या मार्गी लावण्यासाठी संबंधित विभाग व अधिकाऱ्यांना निर्देश दिले. पण अशी आश्वासने सव्वा वर्षापूर्वीही देण्यात आल्याची टीका शिवसेनेसह सर्व विरोधी पक्षांनी केली. तोवर निवडणुकीच्या काळात फायदा मिळवण्यासाठी ही आश्वासने पूर्ण केल्याचा प्रचार लगोलग भाजपाने सुरू केला. पण अलिकडेच पार पडलेल्या ठाणे, कल्याण-डोंबिवली, उल्हासनगर, भिवंडी निवडणुकीतही अशाच घोषणा करण्यात आल्याचा मुद्दा विरोधकांनी उपस्थित केल्याने घोषणा सत्यात उतरविण्यासाठी २७ जूनला थेट मुख्यमंत्र्यांनाच पाचारण करण्यात आले आहे. त्या दिवशी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते या विकासकामांचे भूमिपूजन करण्यात येणार आहे. यापूर्वीही विविध विकासकामांचे भूमिपूजन २५ सप्टेंबर २०१५ ला मुख्यमंत्र्यांच्याच हस्ते करण्यात आले होते. त्यातील एकही योजना अद्याप पूर्ण झाली नसल्याचा दावा काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अनिल सावंत, गटनेता जुबेर इनामदार, नगरसेवक प्रमोद सामंत यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत केला. मुख्यमंत्र्यांनी सुरु केलेल्या परिवहन सेवेतील बसची दुरवस्था झाली आहे. पालिकेकडून परिवहन सेवेच्या निधीचा अपव्यय केला जात आहे. ग्रॉस कॉस्ट कॉन्ट्रॅक्ट (जीसीसी) संकल्पनेवर आधारित सेवा अद्याप सुरु करण्यात आलेली नाही. बस पार्किंगच्या जागांची दुरवस्था झाली आहे. आगारासाठी निश्चित केलेल्या जागेवरही कोणतेच काम झालेले नाही. तरी त्यासाठी विविध कामांच्या निविदा काढण्याचा कार्यक्रम सुरु झाला आहे. ७५ एमएलडी पाण्याची योजना सुरु केली. त्यातील केवळ २५ एमएलडी पाणी दिल्याचा दावा सुरू आहे. उरलेल्या ५० एमएलडी पाण्याचा अद्याप पत्ताच नाही. धोकादायक इमारतींच्या पुनर्विकासात तांत्रिक अडचण असतानाही त्याचे गाजर दाखविले जात आहे.