ठाणे: आंबेघोसाळे तलावात बुडून जैहद अजहर शेख (राहणार - गल्ली क्र. एक, अपनानगर, राबोडी, ठाणे) या सात वर्षांच्या मुलाचा मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी रात्री ८ वाजण्याच्या सुमारास घडली. पाण्याचा अंदाज न आल्याने त्याचा बुडून मृत्यू झाल्याची माहिती ठाणे महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाने दिली.
राबोडीतील मीनाताई ठाकरे चौकातील या आंबेघोसाळे तलावात २ सप्टेंबर रोजी रात्रीच्या सुमारास जैहद गणेश मूर्ती विसर्जनासाठी तयार केलेल्या कृत्रिम तलावात पोहण्यासाठी उतरला होता. मात्र, पाण्याचा अंदाज न आल्याने तो बुडाला. आपत्ती व्यवस्थापन विभागाने त्याचा मृतदेह पोस्टमार्टमसाठी जिल्हा रुग्णालयात पाठविला आहे. राबोडी पोलीस याप्रकरणी अधिक तपास करीत आहेत.