शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमित ठाकरेंना MLC ऑफर दिली, पण राज ठाकरेंनी..."; देवेंद्र फडणवीसांचा गौप्यस्फोट
2
"शरद पवारांच्या त्या पत्रामुळेच २०१९ मध्ये राष्ट्रपती राजवट लागू झाली", देवेंद्र फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
आधी ‘बटेंगे तो कटेंगे’ला विरोध, आता मोदींच्या सभेला दांडी, अजित पवारांच्या मनात चाललंय काय?  
4
IND vs SA: मालिका जिंकण्यासाठी मोठा निर्णय? Rinku Singh संघाबाहेर, 'या' स्टार खेळाडूला संधी
5
निवडणुकीनंतर पवार-शिंदे एकत्र आलेले दिसतील का?; 'लोकमत'च्या मुलाखतीत मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केली भूमिका
6
विशेष लेख: गणिते बिघडली, झोप उडाली.. युती की आघाडी?
7
पोलिसांनी शूटरलाच विचारले ‘कोणाला पाहिलं काय?’; बाबा सिद्दिकी प्रकरणातील धक्कादायक माहिती उघड
8
गजकेसरी योगात सूर्य-शनी गोचर: ७ राशींना अनुकूल, सकारात्मक काळ; लक्ष्मी कृपा अन् यश प्रगती!
9
आजचे राशीभविष्य - १५ नोव्हेंबर २०२४, प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल, नोकरीत वरिष्ठ खुश राहतील
10
तरुणीने बोलावले म्हणून लॉजवर गेला; मात्र नंतर तरुणासोबत घडला धक्कादायक प्रकार!
11
अग्निशमन दलातील माणसांचं वेदनादायी आयुष्य! 'अग्नी'चा ट्रेलर; जितेंद्र जोशी-सई ताम्हणकरची खास भूमिका
12
... म्हणून मोदी सरकारला आहे सरकारी कंपन्यांचा अभिमान, जाणून घ्या गेल्या ९ वर्षांत किती झाली प्रगती
13
Maharashtra Election 2024 Live Updates: 'लाडकी बहीण'सारख्या योजनांचे सरकारने नीट नियोजन केलं आहे- मुख्यमंत्री शिंदे
14
सोयाबीनला सहा हजाराचा हमीभाव देणार; PM मोदींची मोठी घोषणा
15
निवडणुकीसाठी मध्य रेल्वेच्या विशेष गाड्या; जाणून घ्या वेळापत्रक
16
Ola Electric CCPA Notice : Ola Electric विरोधातील तक्रारींच्या तपासाचे आदेश, कंपनीपुढील समस्या वाढणार का?
17
आजचा अग्रलेख: राज यांची टाळी, योग्य वेळी!
18
"एक माणूस म्हणून तो...", इब्राहिमसोबतच्या नात्यावर पलक तिवारीने केलं होतं भाष्य
19
विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी; निवडणुकीमुळे शाळांना तीन दिवस सुट्टी?
20
सिमकार्ड कंपनीच्या कर्मचाऱ्यांनीच मारला ३० हजार लोकांच्या डेटावर डल्ला; भारतातील अनेकांची कोट्यवधींची फसवणूक!

बालमहोत्सवात अवयवदानाची जाणीव

By admin | Published: December 07, 2015 12:40 AM

समन्वय प्रतिष्ठान आयोजित वसंत बालमहोत्सव हा कार्यक्रम शुक्रवारी दादोजी कोंडदेव स्टेडियमवर पार पडला. या महोत्सवात अवयवदान यासारख्या सामाजिक प्रश्नाविषयी कुमारवयीन मुलांना जाणीव करून

ठाणे : समन्वय प्रतिष्ठान आयोजित वसंत बालमहोत्सव हा कार्यक्रम शुक्रवारी दादोजी कोंडदेव स्टेडियमवर पार पडला. या महोत्सवात अवयवदान यासारख्या सामाजिक प्रश्नाविषयी कुमारवयीन मुलांना जाणीव करून देण्यासाठी विशेष प्रयत्न करण्यात आले. या वेळी वैशाली सामंत यांनी अल्बममधील गाणे गाऊन आपली उपस्थिती दर्शवली. त्यानंतर, इंडियाज गॉट टॅलेंंटमधील स्पर्धक अक्षत सिंग याने त्याच्या आवडत्या सल्लूभाईचे कौतुक करून आपल्याला पण सलमानभाईसारखे सुपरस्टार व्हायचे आहे, असे सांगितले. बजरंगी भाईजानमधील मुन्नी म्हणजेच हर्षली मल्होत्रा हिने बजरंगी भाईजानमधील हो किंवा नाही कसे केले, याचे प्रात्यक्षिकाद्वारे दाखविले. त्यानंतर, इंडियन आयडॉल ज्युनियर-२ मधील नित्याश्री व्यंकटरमन चेन्नईमध्ये पूरस्थिती असल्याने येऊ शकली नाही. मात्र, अनन्या नंदा हिने हर किसीको नही मिलता यहा प्यार जिंदगीने... आदी गाणी सादर केली. या वेळी मोती खान याच्या राजस्थानी गीतांनी रसिकांना खिळवून ठेवले. जय मल्हारमधील शनय भिसे याने सूत्रसंचालन करणाऱ्या डबिंग आर्टिस्ट मेघना एरंडे यांना डोरेमॉनच्या आवाजात गणपती बाप्पा मोरया बोलण्यास सांगितले. त्यानंतर त्यांनी पीकाचू, डोरेमॉन, चुलबुली आदी कार्टुन्सचे आवाज काढून लहान मुलांचे मनोरंजन केले. धारावीच्या मुलांनी रॉक बॅण्ड सादर केला. या वेळी खुलके बोल, दिलसे बोल, धारावी के संग तू बोल असे म्हणत रॉक बॅण्डची सुरुवात केली. धंपी हे पात्र रंगवून विशाखा सुभेदार यांनी मुलांचे मनोरंजन केले. अवयवदानासाठी प्रत्येक शाळेत जी आशापेटी ठेवली होती, त्यातून आलेले सर्व पैसे हे मुलांच्या पॉकेटमनीतील होते. मुलांना सामाजिक कार्यात हातभार लावण्याची सवय व्हावी, यासाठी या पेटीचे आयोजन केले होते. हे सर्व पैसे धनादेशाच्या स्वरूपात ज्यांना अवयव प्रत्यारोपणाची गरज आहे, अशा विद्यार्थ्यांना दिले. या वेळी कन्येचे अकाली निधन झाल्यानंतर तिच्या अवयवांचे दान करणाऱ्या मुंबईच्या माजी महापौर निर्मला सावंत-प्रभावळकर यांचा विशेष सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाला राष्ट्रवादी नेते वसंत डावखरे, पालकमंत्री एकनाथ श्ािंदे, खा. श्रीकांत शिंदे, माजी पालकमंत्री गणेश नाईक, पोलीस आयुक्त परमवीर सिंग, सहपोलीस आयुक्त व्ही.व्ही. लक्ष्मीनारायण, महापौर संजय मोरे आदी मान्यवर उपस्थित होते.