कल्याण : कल्याण डोंबिवली महापालिकेने शून्य कचरा मोहीम सुरू केली आहे. या मोहिमेला पूरक प्रशिक्षण वर्गात मुलांनी प्रबोधनात्मक सादरीकरण केले. घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपायुक्त रामदास कोकरे यांनी या मुलांना प्रोत्साहन देत त्यांचे कौतुक केले.
प्लास्टिक निर्मूलनाच्या मोहिमेस घरातील मुलांनी हातभार लावला असून सगळ्य़ांनी महापालिकेच्या शून्य कचरा मोहिमेस हातभार लावावा, असे आवाहन उपायुक्त कोकरे यांनी केले आहे. कोकरे हे अनेक संकल्पना राबवून कचरा निर्मूलन कसे करता येईल यासाठी मे २०२० पासून प्रयत्नशील आहेत. यातून त्यांनी माणुसकीची भिंत, कचरा वर्गीकरणाचे ठरवून दिलेले वार, कुंडीमुक्त प्रभाग, टाकून दिलेल्या कपड्यांपासून कापडी पिशव्या शिवणे आदी उपक्रम सुरू केले आहेत. त्याला चांगला प्रतिसाद मिळत आहे. यासाठी आता बच्चे कंपनीही पुढे आली आहे.
---------------------