जागतिक चिमणी दिन विशेष
लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे - याआधी आपल्यापैकी अनेकांच्या घरासमोर किंवा ग`लरीत सहज ऐकू येणारा चिमण्यांचा चिवचिवाट गेल्या काही वर्षात काहीसा कमी झाला होता. वाढते शहरीकरण आणि औद्योगिकरणाचा सर्वात मोठा फटका बसला आहे तो पक्ष्यांना विशेष करून चिमण्यांना.यासाठी विविध संस्थांनी चिमण्या वाचवा अशी जनजागृती सुरू केली होती. पक्षीतज्ज्ञ, निरीक्षकांनी त्यावर अभ्यास सुरू केला आणि या सगळ्याचा सकारात्मक परिणाम सध्या दिसत असून ठाण्यात काही प्रमाणात का असेना चिमण्यांचा चिवचिवाट वाढतो आहे. मात्र ही वाढती संख्या अजूनही म्हणावी तितकी समाधानकारक नाही, असे मत पक्षीतज्ञ व्यक्त करतात.
या चिमण्यांनो परत फिरा रे.. अशा भावगीतांपासून ते चिऊताई चिऊताई दार उघड... अशा बालगीतांपासून सर्वानाच चिमणी परिचित आहे. पूर्वी अगदी सहजपणो दिसणाऱ्या चिमण्या आता अभावानेच दिसतात. सिमेंट-काँक्रिटच्या टोलेजंग इमारती उभारताना मोठया प्रमाणात होणाऱ्या वृक्षतोडीचा परिणाम चिमण्या, कावळे, मैना अशा पक्ष्यांच्या निवाऱ्यावर होतो आहे. चिमण्यांची संख्या गेल्या पाच-सहा वर्षात अगदीच रोडावली होती. मात्र चिमण्यांची संख्या वाढावी आणि त्यांचे संवर्धन व्हावे या उद्देशाने गेल्या काही वर्षांपासून २० मार्च हा दिवस जागतिक चिमणी दिन म्हणून साजरा केला जातो. अनेक संस्था, शाळांमध्ये चिमण्या वाचविण्याबाबत, त्यांना निवारा निर्माण करण्याबाबत जनजागृती केली जाते. त्यानंतर गेल्या एकदोन वर्षात चिमण्यांची संख्या सुमारे २५-३० टक्य्याने वाढली आहे.
--------------
ग्लोबल होणाऱ्या ठाणे शहरात जरी चिमण्या नजरेस पडत नसल्या तरी उपवन, कोर्टनाका, चेंदणी कोळीवाडा, नौपाडा, येऊर या परिसरात चिमण्यांची संख्या वाढते आहे. मुळात आपण किडे, मच्छर, कीटक यांसाठी वापरणार्या पेस्ट्रीसाईडचा दुष्परिणाम चिमण्यांवर होतो. या पेस्ट्रीसाईडमुळे त्यांची प्रजनन प्रक्रिोत दोष निर्माण होतो. परिणामी चिमण्यांची संख्या समाधानकारक गतीने वाढत नाही, हे खरे.
- डॉ.शशीकुमार मेनन, डायरेक्टर, इन्स्टिट्यूट फॉर अ`डव्हान्स रिसर्च इन इंटर डिस्प्लिनरी सायन्सेस.
जरी ही परिस्थिती असली तरी उपवन,येऊर,टेकडी बंगला हा जंगली,हिरवळ परिसरात मात्र चिमण्या हमखास पाहायला मिळतात.पर्यावरण दक्षता मंचाच्यावतीने फेब्रुवारीमध्ये झालेल्या पक्षीनिरीक्षणात शहराच्या तुलनेत या परिसरात चिमण्या मोठया संख्येने आढळल्या.