डोंबिवली - मध्य रेल्वेच्या मार्गावरील कोपर स्थानक परिसरात रूळ ओलांडताना रविवारी बालकासह तिघांना जीव गमवावा लागला होता. या पार्श्वभूमीवर पाच मिनिटे उशीर झाला तरी चालेल; पण नाहक जीव धोक्यात घालू नका. पादचारी पुलाचा वापर करा, असे आवाहन करत मंगळवारी भाजपाच्या कार्यकर्त्यांनी प्रवाशांना चॉकलेटचे वाटप केले. यावेळी ज्येष्ठ नगरसेवक मुकुंद पेडणेकर यांनीही प्रवाशांची संवाद साधला.भाजपाच्या या उपक्रमात उपनगरी रेल्वे प्रवासी महासंघ आणि आरपीएफचे जवानही सहभागी झाले होते. भाजपा कार्यकर्ते आणि प्रवासी संघटनांचे पदाधिकारी सकाळपासून प्रवाशांना विनंती करत असल्याचे चित्र स्थानक परिसरात दिसत होते. प्रवाशांनी ही विनंती मान्य करताना लोकल पकडण्यासाठी ही जोखीम घ्यावी लागत असल्याचे सांगितले.आपले घरी कोणीतरी वाट बघत आहे, याची नेहमीच जाणीव ठेवावी. काही मिनिटे वाचवण्यासाठी जीव धोक्यात घालू नका. पादचारी पुलाचा वापर केल्यास सुरक्षित प्रवासाची हमी मिळते. कुणी रूळ ओलांडत असेल तर त्याना इतर प्रवाशांनी रोखावे. त्यामुळे अपघात कमी होतील, असा संवाद कार्यकर्त्यांनी प्रवाशांची साधला.सुरक्षा व्यवस्थेवरही प्रचंड ताण असतो, तो ताण कमी करण्यासाठी आपण सगळ्यांनी सहकार्य करण्याची आवश्यकता असल्याचे पेडणेकर म्हणाले. थानक परिसरात होर्डिंग लावूनही प्रवाशांना धोक्याची जाणीव करून देण्यात आली. ही जनजागृती मोहीम सातत्याने राबवली जाणार असल्याचे असल्याचे त्यांनी सांगितले. आरपीएफच्या जवानांनी आपत्कालीन परिस्थितीमध्ये तातडीने १८२ क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन प्रवाशांना केले. यावेळी पोलिसांनी १८२ या हेल्पलाइनचे फलक हातात घेऊ न जनजागृती केली. काही प्रवाशांनी ही हेल्पलाइन सुविधा नावाला असल्याची टीका केली. भाजपाचे पूर्व मंडल अध्यक्ष संजीव बीडवाडकर, अमित कासार, माजी नगरसेवक नरेंद्र पेडणेकर आदींसह प्रवाशांनी या उपक्रमाला सहकार्य केले.कोपर स्थानक सुविधांविनाकोपर स्थानक अनेक वर्षांपासून पाठपुरावा करूनही सोयी-सुविधांपासून दूर आहे. सरकता जिना, अपघात टाळण्यासाठी संरक्षक भिंत तसेच रूळांशेजारचे गवत काढण्याची पत्रव्यवहाराद्वारे मागणी करूनही विभागीय व्यवस्थापक, डोंबिवली स्थानक प्रबंधकांनी त्याकडे दुर्लक्षकेले आहे.
रूळ ओलांडणाऱ्यांना चॉकलेट वाटप, भाजपा, रेल्वे पोलिसांनी राबवली जनजागृती मोहीम
By ऑनलाइन लोकमत | Published: February 06, 2019 2:52 AM