शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदी काेण? दिल्ली दरबारी अडीच तास खलबते; २ डिसेंबरला शपथविधी!
2
उत्तरेतील वारे, महाराष्ट्र गारठला; अनेक शहरांचा पारा आला १५ अंश सेल्सिअसखाली 
3
पदवी अभ्यासक्रम अवधी कमी-जास्त करता येणार; विद्यार्थ्यांसाठी UGC ची नवीन योजना काय?
4
कुजबुज! निकाल लागले, आचारसंहिता संपली तरीही विजयी मिरवणूक नाही, कारण... 
5
नव्या ‘एलएनजी’ बस मुंबईत धावणार की नाशिकमध्ये?; प्रतिगाडी ५.१५ लाखांचा खर्च अपेक्षित
6
कोस्टल रोडचा खर्च १३०० कोटींनी वाढला; एकूण खर्च गेला १४ हजार काेटींवर
7
समुद्रतळातून काढला तब्बल ३०० किलो प्लास्टिक कचरा; भारतातील पहिलाच प्रयोग मालवणमध्ये यशस्वी
8
जमीन व्यवहारातील फसवणूक आता टळणार; राज्यात 'ॲग्रिस्टॅक' योजना राबवणार
9
"घुमटात मंदिराचे अवशेष..., तळघरात आजही गर्भगृह विद्यमान"; अजमेर शरीफ दर्ग्यासंदर्भात हिंदू सेनेनं केले आहेत मोठे दावे
10
कलादिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाईंचा ND स्टुडिओ आता 'गोरेगाव फिल्मसिटी'च्या ताब्यात!
11
“भाजपा नेहमीच नवीन नेतृत्वाचा शोध घेत असते, राजस्थान-मध्य प्रदेशप्रमाणे...”: चंद्रकांत पाटील
12
"शिंदेनी मुख्यमंत्रीपदाचा दावा सोडलेला नाही", उदय सामंतांच्या विधानामुळे चर्चांना उधाण 
13
बाईकची टाकी फुल ठेवा, जास्त मायलेज मिळवा...! खरोखरच असे होते? तुम्हीही १००-२०० चेच भरता का...
14
IND vs PAK: भारताचा १३ वर्षीय वैभव सूर्यवंशी आता पाकिस्तानला चोपणार, सामना कधी?
15
पत्रकारानं थेट प्रश्न विचारला, अजित दादांनी मिश्किल उत्तर दिलं; म्हणाले, "मी काही ज्योतिष नाही..."! नेमकं काय घढलं?
16
मोठा दावा! एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री पदही स्वीकारणार नाहीत; शिंदे गटातून कोण होणार नेता...
17
बांगलादेशात 'इस्कॉन'च्या चिन्मय कृष्ण दास यांना अटक, शेख हसिना यूनुस सरकाविरोधात आक्रमक
18
भारतातील मोबाईल, फोन नंबर +91 ने का सुरु होतात? कोणी दिला हा नंबर...
19
... तर राजकारणातून निवृत्ती घेईन, शहाजीबापू पाटील यांचे मोठे विधान
20
७.८३ टक्के मतं कशी वाढली? नाना पटोलेंच्या आरोपांवर निवडणूक आयोग म्हणतं, "हे सामान्य आहे कारण..."

ठाण्यात पूर्ववैमनस्यातून तरुणावर तिघांनी केले चॉपरने वार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 07, 2019 10:16 PM

मुंबई- ठाणे पूर्व द्रुतगती मार्गावर नितीन कंपनीजवळ तिघांनी टेम्पोच्या पुढे मोटारसायकल आडवी उभी केली. त्यांच्यातील दोघांनी विकी राठोड याला बाहेर खेचून चॉपरने त्याच्या डोक्यात हल्ला केला. हा प्रकार ५ नोव्हेंबर रोजी घडला.

ठळक मुद्देमुंबई- ठाणे पूर्व द्रुतगती मार्गावर नितीन कंपनीजवळील घटना नौपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

लोकमत न्यूज नेटवर्कठाणे : पूर्ववैमनस्यातून विकी कुलचंद राठोड (२१, रा. बाळकुम, ठाणे) या तरुणावर सोनू कांबळे याच्यासह तिघांनी चॉपर आणि लोखंडी रॉडने प्रहार केल्याची घटना मंगळवारी रात्री घडली. याप्रकरणी नौपाडा पोलीस ठाण्यात तिघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.बाळकुम येथील बसथांब्यावर विकी राठोड हा ३ नोव्हेंबर रोजी रात्री ९ वाजण्याच्या सुमारास जेवणासाठी बसला होता. तिथे वागळे इस्टेट, अंबिकानगर येथील तिघेजण जेवणासाठी आले होते. त्यांना त्यावेळी विकीचा चुकून धक्का लागल्याने त्यांच्यापैकी एकाने चॉपर काढून विकीवर वार करण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी त्याने प्रतिकार केल्याने हा वाद मिटला. मात्र, ५ नोव्हेंबर रोजी पुन्हा विकी हा मावस भाऊ पंडित राठोड तसेच सचिन पाटील आणि सचिन कैपाले या मित्रांसह वैतीवाडीतील भंडाऱ्याचा कार्यक्रम संपवून रात्री ११.३० वाजता टेम्पोने घरी जात होता. तेव्हा मुंबई- ठाणे पूर्व द्रुतगती मार्गावर नितीन कंपनीजवळ तिघांनी त्यांच्या टेम्पोच्या पुढे मोटारसायकल आडवी उभी केली. त्यांच्यातील दोघांनी विकीला बाहेर खेचून चॉपरने डोक्यात वार केले. तर अन्य एकाने लोखंडी रॉडने त्याच्या पायावर आणि कड्याने डोक्यात प्रहार केला. तिघांपैकी सोनू कांबळे याने बांबूने त्याला मारहाण केली. या हल्ल्यात विकी गंभीर जखमी झाला असून त्याला ठाणे जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे. याप्रकरणी नौपाडा पोलीस ठाण्यात तिघांविरुद्ध विकीने ६ नोव्हेंबर रोजी गुन्हा दाखल केला आहे. याबाबत चौकशी सुरूअसल्याचे नौपाडा पोलिसांनी सांगितले.

टॅग्स :thaneठाणेCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस