ठाणे: पूर्ववैमनस्यातून चॉपर आणि कोयत्याने चंदन गुप्ता (२२, रा. ठाणे) याच्यासह त्याच्या साथीदारावर चॉपर आणि कोयत्याने खूनी हल्ला करणाऱ्या टोळक्यापैकी जांग्या उर्फ सुनिल जाधव याच्यासह चौघांना चितळसर पोलिसांनी अटक केली. त्यांच्यापैकी जांग्याला १२ मेपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश ठाणे न्यायालयाने दिल्याची माहिती पोलिसांनी रविवारी दिली.
भावेश वाघुले याने काही दिवसांपूर्वी नौपाडा भागात मारहाण केली होती. याचा वचपा काढण्यासाठी सुनिल जाधव याने त्याच्या साथीदारांसह चंदन गुप्ता (२२) तसेच त्याचा मित्र मित्र धीरज याच्यावर ६ मे २०२२ रोजी सकाळी ८.३० ते ९ वाजण्याच्या सुमारास चितळसर मानपाडा येथील साईविहार हॉटेलसमोर खुनी हल्ला केला. हा हल्ला जांग्या याच्यासह किशोर कावळे, भावेश उर्फ साई वाघुले, खरब्या उर्फ अरबाज, नानू, नानुचा भाऊ, ॲडवीन, सोप्या, शुभम आणि प्रतिक शर्मा आदी दहा ते १२ जणांच्या टोळक्याने केल्याचा आरोप गुप्ता याने चितळसर पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीमध्ये केला आहे. गुप्ता तसेच धीरज यांच्या हातावर, पाठीवर आणि डोक्यावर या टोळक्याने चॉपरचे वार करून त्यांना गंभीर जखमी करीत त्यांना ठार मारण्याचा प्रयत्न केला. याप्रकरणी चितळसर पोलीस ठाण्यात खुनाचा प्रयत्न, शिवीगाळ करणे आणि धमकी देणे तसेच हत्यार कायदा कलम ४,२७ सह महाराष्ट्र पोलीस अधिनियम ३७ (१), १३५ प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.
चौघांना अटक, इतरांचा शोध सुरू
वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुलभा पाटील आणि पोलीस निरीक्षक राघवेंद्र भिलारे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक रुक्मागंद यांच्या पथकाने या हल्लेखोरांपैकी जांग्या उर्फ सुनिल जाधव याला शनिवारी (७ मे ) अटक केली. शाबाज खान (१८), प्रथमेश कांबळे उर्फ बाळ्या (२०) आणि किशोर कावळे (२०) या तिघांना रविवारी अट