कल्याण : शहरातील आधारवाडी डम्पिंग ग्राऊंड बंद करून बारावे येथे शास्त्रोक्त भरावभूमी विकसित करण्याच्या निविदेस कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या स्थायी समितीने मंजुरी दिली आहे. या भरावभूमीच्या विरोधात बुधवारी बारावे येथील नागरिकांनी महापालिका मुख्यालयावर मोर्चा काढला.नगरसेविका रजनी मिरकुटे यांच्या नेतृत्वाखाली बारावे हिल रोड रेसिडेन्शीयल असोसिएशनतर्फे हा मोर्चा काढण्यात आला. त्यात भाजपाचे अर्जून भोईर, प्रेमनाथ म्हात्रे, असोसिएशनचे पदाधिकारी सुनील घेगडे, मनोज पाटील, सुभाष मिरकुटे व नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. भरावभूमीच्या प्रस्तावित जागेपासून लोकवस्तीपासून २०० मीटरवर आहे. तसेच या परिसरात वनी, पोतदार आणि ट्री हाऊस या शाळा आहेत. त्यामुळे विद्यार्थी आणि नागरिकांना दुर्गंधीचा त्रास होईल. त्यामुळे बारावे भरावभूमी विकसित करू नये, अशी मागणी नागरिाकंनी लावून धरली. महापालिका प्रवेशद्वाराजवळ त्यांनी महापालिकेच्या या निर्णयाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. ३५ वर्षांपासून सरू असलेल्या आधारवाडी डम्पिंग ग्राऊंडची क्षमता संपुष्टात आल्याने ते बंद करण्याचे आदेश उच्च न्यायालयाने महापालिकेस दिले. त्या आधारे महापालिकेने हे डम्पिंग शास्त्रोक्तपद्धतीने बंद करण्यासाठी २८ कोटी रुपयांची निविदी मंजूर केली आहे. आधारवाडी बंद केल्याने कचऱ्यासाठी शास्त्रोक्त भरावभूमी बारावे येथे विकसित करण्यासाठी १९ कोटी रुपयांच्या निविदेस स्थायी समितीने २२ फेब्रुवारीला मंजुरी दिली. परंतु, त्यास नागरिकांनी विरोध केल्याने या भरावीभूमीबाबचे भवितव्य अडचणीत आले आहे.सुरक्षारक्षकांकडून अडवणूकमहापालिकेच्या प्रवेशद्वारावरील सुरक्षारक्षकांनी नागरिकांच्या शिष्टमंडळास पालिका मुख्यालयात सोडले नाही. त्यामुळे नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त केला. पत्रकार विशाल वैद्य यांना सुरक्षारक्षकांनी धक्काबुक्की केली. शिवसेना पदाधिकारी व माजी परिवहन समिती सभापती रवींद्र कपोते यांनाही सुरक्षारक्षकांनी आडविल्याने ते प्रचंड संतप्त झाले. महापौर राजेंद्र देवळेकर आणि गनटेते रमेश जाधव यांनी त्यांची समजूत घातल्यानंतर प्रकरण निवळले. महाालिकेचा सगळा कचरा बारावे भराव भूमीवर टाकला जाणार नाही. अन्य ठिकाणीही भरावभूमी विकसित केली जाणार आहे. न्यायालयाच्या आदेशानुसार बारावे विकसित करण्ो महापालिकेस बंधनकारक आहे. तरीही नागरिकांच्या मागणीचा विचार केला जाईल. - राजेंद्र देवळेकर, महापौर, कल्याण डोंबिवली
बारावे डम्पिंगला नागरिकांचा विरोध
By admin | Published: March 10, 2016 2:11 AM