डोंबिवली, दि. 18 - शहराच्या पूर्व भागातील 90 फीट रोडवर एका तीन वर्षाच्या मुलाचे अपहरण करण्याचा प्रयत्न नशाबाजाने केला होता. नागरीकांच्या सतर्ककतेमुळे हा प्रयत्न हाणून पाडण्यात आला. मात्र रामनगर पोलिसांनी अपहरणाचा प्रयत्न करणा:या नशाबाजाला व्हीआयपी ट्रीटमेंट देत जागरुक नागरीकांनी त्याच्या विरोधात तक्रार न देण्याचा अजब सल्ला दिल्याने जागरुक नागरीक ही चक्रावून गेले. अखेरीस रात्री उशिरा पोलिसांनी नशाबाजाच्या विरोधात पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अभिषेक भगत हे रेल्वेत कामाला आहेत. ते कामानिमित्त मध्यप्रदेशात असतात. त्यांचे राहते घर डोंबिवलीत आहे. त्यांना तीन व सात वर्षाचे दोन मुलगे आहेत. ते काल सुट्टीनिमित्त घरी आले होते. पत्नी व दोन मुलांसह ते काल रात्री घराबाहेर पडले होते. त्याच्या तीन वर्षाच्या मुलाला एका नशाबाजाने उचलून त्याचे अपहरण करण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी काही लोकांच्या लक्षात आले. त्यांनी आरडाओरडा केला. अभिषेक यांनी नशाबाज अपहरणकत्र्याचा पाठलाग केला. तेव्हा नशाबाजाने त्याच्याजवळ असलेल्या काठीने प्रहार करुन अभिषेकला प्रतिकार केला. नशाबाज नशेत असल्याने त्याला पळता येत नव्हते. अखेरीस नागरीकाच्या मदतीने त्याला पकडून चांगलाच चोप देण्यात आला. भगत यांच्या मदतीसाठी खाजगी कंपनीत कामाला असलेले किरण हर्डीकर व त्यांचे मित्र व सामाजिक कार्यकर्ते दीपक मेहता यांनीही धाव घेतली. पोलिसांनी भगत यांच्यासह मुलाला घेऊन पोलिस ठाण्यात जाण्याचा सल्ला दिला. मुलाला घेऊन पोलिस ठाण्यात गेल्यावर पोलिस एक तासानंतर नशाबाजाला घेऊन आले. भगत यांची मुले कंटाळून उपाशीच झोपली. मात्र तक्रारदाराची विचारपूस करण्याऐवजी पोलिसांनी नशाबाजाला फ्राईड राईस खाण्यास दिला.
नशाबाज फिर्यादीला पोलिस ठाण्यात धमकावित होता की, त्याचे पोलिस काहीच वाकडे करु शकत नाहीत. तर फिर्यादी काय करणार असा दम भरला. पोलिसांनी त्याला काही एक मज्जाव केला नाही. पोलिसांनी रात्री उशिरा नशाबाजाचा विरोधात गुन्हा दाखल करुन त्याचा नंबर केवळ फिर्यादीला दिला. नशाबाजाचे नाव सांगण्यास नकार दिला. पोलिस गुन्हा दाखल करुन घेण्यास टाळाटाळ करीत होते. तसेच सुज्ञ नागरीक असाल तर तक्रार देऊ नका. सारखे जबाब देण्यासाठी व नंतर न्यायालयात यावे लागेल. याल का असा प्रतिसवाल देऊन तक्रार देण्यापासून परावृत्त करीत होते. हा प्रकार पाहून फिर्यादी अजब झाले. तसेच मिडीयाकडे जाऊ नका असा अनाहूत सल्लाही पोलिस फिर्यादी व जागरुक नागरीकांना देत होते. या प्रकरणी पोलिसांकडे विचारणा केली असता त्यांनी फकडलेला आरोप मनोरुग्ण आहे.
त्यामुळे तो त्याचे नाव नीट सांगू शकत नाही. पोलिसांच्या मते तो मनोरुग्ण आहे. तर त्याने फिर्यादीला पोलिस माङो काहीच वाकडे करु शकत नाही असा दम कसा व कोणत्या हुशारीच्या आधारे भरला असा प्रश्न उपस्थित होते. काही दिवसापूर्वी कल्याण खडकपाडा परिसरात अशाच एका नशाबाज आरोपीला मुलीचे अपहरण करताना नागरीकांनी पकडून दिले होते. त्याचीच पुनर्रावृत्ती डोंबिवलीत घडली आहे. नागरीक गुन्हा रोखण्यासाठी स्वत:हून पुढे येत नाहीत. आले तर सतर्क नागरीकांना पोलिसांकडून चांगली वागणूक मिळत नाही. हेच पुन्हा एकदा डोंबिवलीच्या उपरोक्त घटनेतून उघड झाले आहे.