शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election 2024: शेवटचा ‘मास्टर स्ट्रोक’! ‘सुपर संडे’साठी काँग्रेस अन् भाजप नेत्यांचा विदर्भात तळ
2
प्रचाराच्या आसमंतात हेलिकॉप्टरची भिरभिर; निवडणुकीच्या हंगामात होणार ५५० कोटींची उलाढाल
3
तोंडातून उसळे शब्दांचे हे बाण, वेडात प्रचारी वीर दौडले सात...
4
महाराष्ट्रातील आठ लाख नोकऱ्या गुजरातला गेल्या; प्रियांका गांधींचा महायुतीवर हल्ला
5
भारत-चीनमधील तणाव कमी होणे आवश्यक; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांचे मत
6
...म्हणूनच ‘बटेंगे तो कटेंगे’ची घोषणा; केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांची भूमिका
7
बहिणींना पैसे देताय, पण त्यांच्या सुरक्षेचे काय?, शरद पवार यांचा सरकारला सवाल
8
एक तरी आयकॉनिक प्रोजेक्ट दाखवा; देवेंद्र फडणवीस यांचे ठाकरेंना आव्हान
9
अमेरिकेतील सरकारी नोकऱ्यांमध्ये होणार कपात, रामास्वामींकडून संकेत
10
काँग्रेसने प्रसिद्ध केला मुंबईकरांसाठी स्वतंत्र जाहीरनामा; हाउसिंग सोसायट्यांना ६ महिन्यांत देणार ओसी
11
मतांच्या ढिगाऱ्यात चंगू, मंगू बुडाले पाहिजे; मुख्यमंत्री शिंदे यांची राऊत बंधूंवर टीका
12
मुंबईत तब्बल आठ हजार किलो चांदीचे घबाड केले जप्त; निवडणूक आयोगाची कारवाई
13
"लोकसभेत गुडघ्यावर आणले, आता महायुतीस पाताळात गाडणार"; उद्धव ठाकरेंचा इशारा
14
"मला हलक्यात घेतलं, त्याचे परिणाम आता दिसतायत"; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा राऊतांना इशारा
15
"केंद्र बिंदूच्या बुडाला आग लावायची वेळ आली"; उद्धव ठाकरेंचा ठाण्यातून महायुतीवर घणाघात
16
भविष्यात दोन ठाकरे एकत्र येऊ शकतात का? मनसेसोबत युती होऊ शकते का...? उद्धव ठाकरे म्हणाले...
17
...म्हणून उद्धव ठाकरे यांनी थेट फोनद्वारे घेतली सभा; "नाराज होवू नका एकत्र येवून..."
18
२०१४ ला भाजपाला त्यांची खरी ताकद कळली, अन् त्यानंतर वाढतच गेली!.. जाणून घ्या काय घडलं?
19
"साईबाबांच्या आशीर्वादामुळे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले, अन्यथा..."; दीपक केसरकरांचा पलटवार
20
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'महाराष्ट्रात पैशाच्या जोरावर सरकार चोरले, तुम्ही संविधानाच्या गोष्टी करता'; प्रियांका गांधींचा हल्लाबोल

शहर स्वच्छता मोहिमेत नागरिकांचेही योगदान आवश्यक - महापालिका आयुक्त

By अजित मांडके | Published: December 16, 2022 12:04 PM

सार्वजनिक ठिकाणी नियमांचे पालन न करणाऱ्या नागरिकांवर आकारण्यात येणाऱ्या जुन्या दंडाच्या रकमेत सुधारणा

ठाणे - ठाणे शहरातील स्वच्छतेमध्ये अधिक सुधारणा व्हावी यासाठी महापालिकेकडून मोहिम स्वरुपात विशेष प्रयत्न केले जात आहे. मात्र महापालिका आपली जबाबदारी पार पाडण्याचा प्रयत्न करीत असतानाच नागरिकांनी जर त्यात योगदान दिले नाही तर शहर स्वच्छ राखणे कठीण होवू शकते. ठाणे शहरातील नागरिक हे स्वच्छतेबाबत फार मोठ्या प्रमाणावर सजग आहेत, मात्र काही ठराविक नागरिक अजूनही स्वच्छतेविषयी आपल्या जबाबदारीचे पालन करताना दिसून येत नाही. शहर स्वच्छ राखण्यासाठी अशा व्यक्तींवर दंडात्मक कारवाई करण्याचा अप्रिय निर्णय घेणे आवश्यक ठरते.

ठाणे शहरात आजपर्यंत उघड्यावर कचरा टाकणे, उघड्यावर लघुशंका / शौच करणे, थुंकणे, पाळीव प्राण्याद्वारे अस्वच्छता याबाबत दंड लावण्यात आले होते. परंतु शहरात स्वच्छता मोहिम अधिक तीव्र स्वरुपात हाती घेण्यात आली असल्यामुळे दंडाच्या रकमेत सुधारणा करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला असल्याचे महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी नमूद केले.

संपूर्ण महापालिका नियमित स्वच्छता होत असून ही मोहिम व्यापक स्वरुपात सुरू राहणार आहे.  यामध्ये शहरे हागणदारी मुक्त करणे व शहराची साफसफाई, कचरा संकलन वाहतुक व विल्हेवाट शास्त्रोक्त पध्दतीने लावून शहर स्वच्छ ठेवण्याचे काम करण्यात येत आहे.  याचे पालन जे व्यक्ती/संस्था यांचेकडून होणार नाही. त्यांचेवर घनकचरा व्यवस्थापन व हाताळणी नियम 2016 अंतर्गत दंडात्मक कारवाई करण्याची तरतूद आहे. परंतु सदर दंडाची रक्कम कमी असल्यामुळे नागरिकांना दंड लावून देखील त्याबाबत गांभीर्याने घेत नसल्याने दंडाच्या रक्कमेत सुधारणा करण्याचा निर्णय घेण्यात आला असून त्याची अंमलबजावणी सुरू करण्यात आली आहे.  

त्यानुसार रस्ते/मार्गावर घाण करणे/कचरा फेकणे सध्याची दंडाची रु.180, सुधारित दंडाची रक्कम रु.500, सार्वजनिक ठिकाणी थुंकणे सध्याची दंडाची रु.150, सुधारित दंडाची रक्कम रु.500, उघडयावर लघवी/लघुशंका करणे सध्याची दंडाची रु.200, सुधारित दंडाची रक्कम रु.1000, उघडयावर शौच करणे सध्याची दंडाची रु.500, सुधारित दंडाची रक्कम रु.1000 व सार्वजनिक ठिकाणी पाळीव प्राण्यांद्वारे अस्वच्छता करणे सध्याची दंडाची रु.180, सुधारित दंडाची रक्कम रु.1000 असा बदल करणेचा निर्णय घेण्यात आला आहे.नागरिकांनी आपल्या कर्तव्याची जाणीव ठेवून वर्तणूक करणे अपेक्षित असते. स्वच्छतेमध्ये ठाणे शहरात आजपर्यंत जे सकारात्मक काम झाले ते शहरवासीयांच्या सहभागामुळेच होवू शकते. मात्र जे नागरिक आपल्या कृतीमधून या उद्देशाला हरताळ फासण्याचा प्रयत्न करतात त्यांच्या विरुद्ध दंडनीय कारवाई करणे आवश्यक ठरते, त्यामुळे हा निर्णय घेण्यात आला असून नागरिकांकडून सहकार्याची अपेक्षा आहे. 

टॅग्स :Thane Municipal Corporationठाणे महानगरपालिका