शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसनं कोणत्या मार्गावर चालायला हवं? राहुल गांधींनी स्पष्टच सांगितलं, ओढली 'लक्ष्मणरेषा'!
2
"2012 पर्यंत हरी मंदिर होते...", संभलच्या शाही जामा मशिदीसंदर्भात भाजप आमदाराचा नवा दावा! शेअर केले PHOTO
3
"2019 मध्ये यांच्यासाठी जो 'चौकीदार' चोर होता, तो आता 'ईमानदार' झाला..."; असं का म्हणाले पीएम मोदी?
4
"प्रियांका गांधींच्या विजयानिमित्त वायनाडमध्ये निष्पाप गायीची हत्या"; धीरेंद्र शास्त्रींच्या पदयात्रेत रामभद्राचार्य यांचा आरोप!
5
EVM ऐवजी बॅलेट पेपरवर निवडणुका व्हाव्यात, काँग्रेसच्या बैठकीत प्रियंका गांधींची मागणी
6
Mumbai Indians फिरवली पाठ, Ishan Kishan ने ठोकले ९ षटकार, अवघ्या २७ चेंडूत जिंकवली मॅच
7
बायडेन यांच्यासारखी मोदींची स्मरणशक्ती हरवत चालली हे राहुल गांधींचे वक्तव्य दुर्दैवी; परराष्ट्र मंत्रालयाची प्रतिक्रिया
8
Eknath Shinde: एकनाथ शिंदेंचा प्रसारमाध्यमांशी बोलण्यास नकार, मूळ गावी पोहोचले, किती दिवसांचा मुक्काम...
9
₹6 च्या शेअरवर गुंतवणूकदारांची झुंबड, 600% नं वाढला भाव; या मोठ्या कंपनीनं 1600000 शेअरवर लावलाय 'डाव'!
10
IPL Auction 2025: Rishabh Pant वर लागली २७ कोटींची तगडी बोली, टॅक्स कापून हातात किती मिळणार?
11
चंपाई सोरेन यांची JMM मध्ये घरवापसी होणार? 'कोल्हन टायगर'ला हेमंत सोरेन यांची ऑफर..?
12
टीम इंडियाने लाँच केली नवी जर्सी, झाला महत्त्वाचा बदल; पहिल्यांदा कधी मैदानात कधी दिसणार?
13
वक्फ बोर्डच्या १० कोटींच्या निधीबाबत देवेंद्र फडणवीसांचे ट्विट; म्हणाले, "नवीन सरकार येताच..."
14
भारताचा जीडीपी कोसळला, दोन वर्षांच्या निच्चांकी पातळीवर; महागाई, वाढलेले व्याजदर कारण
15
मोठी बातमी! फोक्सवॅगनने १.४ अब्ज डॉलर कर चोरला; आधीच संकटात, त्यात भारताने पाठविली नोटीस : रिपोर्ट
16
शेअर असावा तर असा...! 4 वर्षांत दिला 10000% परतावा, गुंतवणूकदारांना केलं मालामाल; ₹1000 वर पोहोचला भाव
17
Ayush Badoni ची कॅप्टन्सी! प्लेइंग इलेव्हनमधील सर्वांनी गोलंदाजी करत सेट केला वर्ल्ड रेकॉर्ड
18
महाराष्ट्र निवडणुकीचे आकडे बदलणार...? काँग्रेसनं टाकला मोठा डाव; EC निर्णय घेणार!
19
जितेंद्र आव्हाडांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट! राजकीय वर्तुळात चर्चा
20
निकालानंतर मुख्यमंत्र्यांनी किती दिवसांत शपथ घेणे बंधनकारक आहे? काय सांगतो नियम? पाहा...

सेना नगरसेवकाच्या हट्टापायी नागरिक वेठीस

By admin | Published: March 30, 2017 6:25 AM

अंबरनाथमधील सर्वात महत्त्वाचा असलेल्या फातिमा रस्ता कामासाठी तीन महिन्यांपासून पूर्णत: बंद होता.

अंबरनाथ : अंबरनाथमधील सर्वात महत्त्वाचा असलेल्या फातिमा रस्ता कामासाठी तीन महिन्यांपासून पूर्णत: बंद होता. या रस्त्यावरून वाहतूक मोठ्या प्रमाणात होत असल्याने ही सर्व वाहतूक दुसऱ्या मार्गावरून फिरवण्यात आली. मात्र, मागील आठवड्यात या रस्त्याचे काम पूर्ण झाले आहे. असे असतानाही पालिका प्रशासनाने हा रस्ता वाहतुकीसाठी खुला केलेला नाही. या रस्त्याचे उद्घाटन पालकमंत्र्यांच्या हस्ते व्हावे, हा राजकीय हट्ट सत्ताधारी शिवसेनेचा आहे. केवळ उद्घाटनाअभावी नागरिकांना वेठीस धरण्याचे काम शिवसेना आणि पालिका प्रशासन करीत आहे. बहुचर्चित फातिमा रस्ता पुन्हा वादात सापडला आहे. या रस्त्याचे काम करताना सर्व नियम धाब्यावर बसवल्यानंतर आता पुन्हा या रस्त्याचे काम पूर्ण झाल्यावर नव्याने वाद सुरू झाला आहे. कामासाठी हा रस्ता २८ डिसेंबरला वाहतुकीसाठी बंद केला. तीन महिने उलटले तरी रस्ता खुला झालेला नाही. या रस्त्यावरील पुलाच्या कामाला विलंब लागल्याने तो रस्ता होळीपर्यंत सुरू करण्याचे निश्चित केले होते. मात्र, रस्ता आणि पुलाचे काम होऊनही हा रस्ता खुला केला नाही. मागील आठवड्यात रस्त्याचे काम पूर्ण करून कंत्राटदाराने पुढील जबाबदारी पालिका प्रशासनावर सोपवली. मात्र, पालिका प्रशासन हा रस्ता सुरू करण्यासाठी चालढकल करत आहे. रस्त्याचे उद्घाटन पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्याच हस्ते व्हावे, हा हट्ट असल्याने उद्घाटन लांबणीवर पडत आहे. अधिवेशन सुरू असल्याने पालकमंत्र्यांना वेळ मिळत नाही. अंबरनाथमध्ये १०० कोटींवर सीसीरोडचे काम झाले आहे. असे असले तरी एकही रस्ता हा उद्घाटनासाठी बंद ठेवलेला नाही. फातिमा रस्ता रहदारीचा आहे. या रस्त्यावर शालेय विद्यार्थ्यांची रहदारी असते. या रस्त्यावर सात शाळा आहेत. (प्रतिनिधी)खासदारांचे आदेश धाब्यावररस्ता तयार असूनही तो खुला झाला नसल्याची दखल थेट खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी घेतली. पालकमंत्र्यांना उद्घाटनासाठी आठवडाभर वेळ नसल्याने त्या रस्त्याचे उद्घाटन खासदार यांच्या हस्ते करण्याचा चंग शिवसेनेच्या एका गटाने बांधला होता. उद्घाटनाअभावी नागरिकांचे हाल होत असल्याचे शिंदे यांच्या लक्षात येताच त्यांनी रस्ता खुला करण्याचे आदेश मुख्याधिकारी गणेश देशमुख यांना दिले. रस्ता खुला करण्याचा प्रयत्न प्रशासनाने केला. मात्र, एका शिवसेना नगरसेवकाने कंत्राटदाराला सांगून या रस्त्यावर खड्डा खोदण्यास सांगितले. कंत्राटदाराने नव्या रस्त्यावर खड्डा खोदून रस्ता पुन्हा बंद केला. शिवसेना नगरसेवकाच्या या कृतीपुढे आता खुद्द खासदार शिंदे हेही हतबल झाले आहेत. रस्त्याच्या श्रेयासाठी त्याचे उद्घाटन करण्याचा घाट स्थानिक नगरसेविका आणि त्यांचे पुत्र नगरसेवक करत आहेत. ज्या रस्त्यावरून वाद सुरू आहे, तो मुळात कोणत्याही नगरसेवकाच्या प्रभागातील नाही. तो रस्ता शहरातील महत्त्वाचा रस्ता असल्याने त्याला ३ कोटी ५० लाख रुपये निधी दिला आहे. मात्र, या नगरसेवकाने हा रस्ता आपल्या प्रभागाचा असल्याचे भासवत उद्घाटनाचा हट्ट सुरू केला आहे.काम पूर्ण झालेले असेल, तर रस्ता खुला होणे गरजेचे आहे. नागरिकांना वेठीस धरून कोणतेच काम करू नये. प्रशासनाची जबाबदारी असून त्यांनी हा रस्ता त्वरित खुला करणे गरजेचे आहे. - राजेंद्र वाळेकर, उपनगराध्यक्ष खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी हा रस्ता लागलीच सुरू करण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यानुसार, रस्ता सुरू करण्यात येणार होता. मात्र, काही लहान कामे शिल्लक राहिल्याने ते पूर्ण करून एका दिवसात सुरू करण्यात येईल.- गणेश देशमुख, मुख्याधिकारी